Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय?

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय?

फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या इंट्राडे ट्रेडिंग Intraday Trading बद्दल

शेअर बाजारात गुंतवणूकदार (Investors) आणि व्यापारी (Traders) असे दोन गट असतात. दोन-पाच वर्षांपूर्वीपर्यंत बाजारात गुंतवणूकदार जास्त होते; पण कोविड संक्रमणानंतरच्या काळात ट्रेडर्सची संख्याही वाढताना दिसत आहे. शेअर बाजारातील घडामोडी आणि त्यातील खाचाखोचा कळणारी व्यक्ती सहजपणे डे टेड्रींग करु शकतो.

डे ट्रेडर शेअर बाजार सुरु झाल्यापासून दिवसभरात अनेकदा शेअर्स खरेदी करतात आणि विकतात. याला इंट्राडे ट्रेडिंग असेही म्हटले जाते. हे सर्व व्यवहार एका दिवसासाठीचे असतात. शेअर बाजार सुरू झाल्यापासून म्हणजेच 9.15 पासून ते 3.30 वाजता बाजाराचे कामकाज बंद होईपर्यंतच ते संपवावे लागतात.

आजकाल बहुतांश ब्रोकर्स इंट्राडेसाठी ट्रेडर्सना मार्जिन उपलब्ध करुन देतात. म्हणजेच तुम्ही जरी 10 हजार रुपये गुंतवले असतील तरी तुम्हाला इंट्राडेच्या माध्यमातून अगदी 50 हजार रुपयांपर्यंतचे शेअर्स खरेदी करुन ते विकता येऊ शकतात. मार्जिन किती असावे याबाबत प्रत्येक ब्रोकरचे नियम वेगळे आहेत.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मार्जिन मिळत असल्यामुळे अनेक जण हुरळून जातात. पण यातील सर्वांत मोठा धोका म्हणजे आपण घेतलेल्या शेअर्सचे मूल्य वधारले नाही तर जे नुकसान होईल तेही आपल्यालाच सोसावे लागते. उदाहरणार्थ, आपण 50 हजारांचे मार्जिन मिळत असल्याने 200 रुपये भाव असणार्‍या एखाद्या कंपनीचे 250 समभाग खरेदी केले असतील आणि ते दिवसभरात आपल्या अंदाजाला हुलकावणी देत वधारण्याऐवजी 20 रुपयांनी घसरुन 180 रुपयांवर आले तर यामध्ये 5000 (250 गुणिले 20) रुपयांचे नुकसान आपल्या मूळ रकमेतून ब्रोकर्स वजा करुन घेत असतात. याउलट या समभागांचे मूल्य 200 रुपयांवरुन 230 रुपयांवर गेले तर मिळणारा 7500 रुपयांचा नफा (250 गुणिले 30) आपल्या मूळ भांडवलात वर्ग केला जातो. या नफ्यातून कर आणि ब्रोकरेज चार्जेस वजा केले जातात.

साधारणतः ही इंट्राडे ट्रेडिंगची कार्यपद्धती आहे. यामध्ये झटपट नफा मिळवण्याच्या जशा संधी आहेत, तशाच प्रकारे नुकसानही तितक्याच वेगाने होऊ शकते, हे विसरु नये. काही वेळा आपण गुंतवलेली मूळ रक्कमही हातातून जाऊ शकते. उदाहरणार्थ आपण 10 हजार रुपये गुंतवले आणि त्यावर मिळालेल्या 50 हजारांच्या मार्जिनमधून 100 रुपयांचे 500 शेअर्स विकत घेतले असतील आणि काही कारणास्तव या समभागात अचानकपणाने घसरण होऊन तो 75 रुपयांवर आला तर होणार्‍या नुकसानीचा आकडा 12500 रुपयांवर जातो. अशा वेळी आपणास 2500 रुपये तात्काळ भरावे लागतात. यावरुन यातील जोखीम किती मोठी आहे हे लक्षात येईल. ती पेलण्याची क्षमता प्रत्येकाकडे असतेच असे नाही. 

इंट्राडे ट्रेडिंगच्या मोहाला बळी पडण्यापूर्वी शेअर बाजाराचा परिपूर्ण अभ्यास करणे आवश्यक ठरते. तसा न केल्यामुळे हजारो जणांनी यामध्ये कोट्यवधी रुपये घालवले आहेत, याची नोंद घेतलेली बरी! याचा अर्थ इंट्राडेमध्ये यशस्वी होता येत नाही असा बिलकूल नाही. पण त्यासाठी स्टॉपलॉससारखे काही नियम समजून घेतले पाहिजेत आणि अत्यंत अभ्यासपूर्वक, संशोधनपूर्वक इंट्राडेसाठी शेअर्सची निवड केली पाहिजे.