National Scholarship Portal: देशभरातील विद्यार्थ्यांना सर्व स्कॉलरशीप योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तुम्हाला केंद्र, राज्य आणि विविध मंत्रालयांद्वारे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशीप योजनांची माहिती मिळेल. तसेच अप्लाय करता येईल. गरजू विद्यार्थ्यांसोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप योजनांचा लाभ घेता येईल.
नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी
सर्वप्रथम विद्यार्थ्याला NSP पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता, राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधारसह शिक्षणासंबंधित प्रमाणपत्रक आणि गुणपत्रक लागेल. आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. नोंदणी केल्यावर अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड एसएमएसद्वारे मिळेल. गुगल प्ले स्टोअरवर NSP चे अॅपही उपलब्ध आहे.
स्कॉलरशीप योजनांच्या कॅटेगरी किती?
या पोर्टलवर स्कॉलरशीप दोन कॅटेगरीत विभागल्या आहेत. पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशीप आहेत. केंद्र, राज्य, आणि मंत्रालयाच्या विविध योजनांसाठी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येईल.
पोस्ट मॅट्रिक ही दुसरी कॅटेगरी आहे. (How to apply for Scholarship on NSP) यामध्ये दहावीनंतरच्या पुढील शिक्षणाचा समावेश आहे. ITI, BSc, B.com B tech, मेडिकल, IIT, IIM आणि इतर मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेसचा समावेश आहे. या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपसाठी अप्लाय करता येईल.
विविध मंत्रालयांच्या स्कॉलरशीप योजना एकाच ठिकाणी पाहता येतील?
अल्पसंख्याक मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय, सामाजिक न्याय, कामगार, गृह, उच्च शिक्षण विभागाच्या योजना पाहता येतील. तसेच ऑनलाइन अप्लाय करता येईल. विविध राज्य सरकारच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनाही या पोर्टलवर देण्यात आल्या आहेत.
स्कॉलरशीप मंजूर झाल्यास थेट खात्यात पैसे जमा
सर्वप्रथम विद्यार्थ्याला स्कॉलरशीप योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पात्रतेनुसार स्कॉलरशीप योजनेला अप्लाय करावे लागेल. या सर्व अर्जांची छानणी होते. अर्ज मंजूर झाल्यास थेट विद्यार्थ्याच्या खात्यात पैसे पाठवले जातात. (How to apply for Scholarship on NSP) अर्जाचा स्टेटसही ऑनलाइन तपासता येईल.
नवे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी करून तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्ही आधीच पोर्टलवर नोंदणी केली असेल तर नोंदणी रिन्यू करू शकता.