मॅक्सिमम रिटेल प्राईस ही मॅनिफॅक्चरर (manufacturer) ने मोजलेली किंमत आहे. मॅनिफॅक्चररने एखाद्या वस्तूची विक्री जास्तीतजास्त किती किंमतीला करायची हे ठरवून दिलेली किंमत म्हणजे एमआरपी. यामध्ये वस्तूचे प्रॉडक्शन, स्टोअर करणे ,हाताळणी,दुकानदाराचा नफा यांचा समावेश असतो.
Table of contents [Show]
MRP ची किंमत कोण ठरवते?
1990 मध्ये नागरी पुरवठा मंत्रालय, कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, मानके वजन आणि माप कायदा (पॅकेज केलेल्या वस्तूंचे नियम) मध्ये सुधारणा करून लागू करण्यात आली.
MRP मध्ये कशी मोजली जाते?
वस्तूच्या मागील बाजूला ही एमआरपी लिहिली असते. त्याच्याच खाली किंवा बाजूला Inclusive of all taxes असं लहान अक्षरात लिहिलेलं असतं. आता हे इन्कलुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस मध्ये नेमका कशाचा समावेश असतो आणि त्यावरून कशी एमआरपी काढली जाते हे पाहुयात. उत्पादनाची वास्तविक किंमत (Actual cost of product) + नफा मार्जिन (Profit margin) + CNF मार्जिन (Cost & freight) +वितरक मार्जिन(Distributor Margin) + किरकोळ विक्रेता मार्जिन (Retailer Margin) +GST + वाहतूक (Transportation) + इतर खर्च =कमाल किरकोळ किंमत (मॅक्सिमम रिटेल प्राईस MRP)
MRP पेक्षा जास्त पैसे आकरल्यास काय करावे?
कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा 2009 नुसार, दुकानदाराने जर MRP पेक्षा जास्त किंमतीला प्रॉडक्ट विकल्यास किंवा पूर्वीपासून असलेल्या वस्तूवर छापील किंमतीवर नवीन किंमतीचा टॅग लावून विकले तर दंड किंवा तुरुंगवास या कायदेशीर शिक्षा होऊ शकते. दिलेल्या MRP पेक्षा जास्त किंमतीला वस्तूची विक्री करणे हा गुन्हा आहे कारण त्यामुळे ग्राहकाचे शोषण होते. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे.
MRP पेक्षा जास्त पैसे घेतले? तर त्यावर उपाय काय?
दुकानदाराने आकारलेल्या अवाजवी दाराविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.जर दुकानदाराने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर दिलेल्या किंमतीची पावती (bill) घ्या आणि पावतीवरील दुकानाचे नाव,पत्ता व GST नंबर तपासून पाहा,लक्षात ठेवा पावती घेणे आवश्यक आहे.
झालेल्या फसवणुकीची खालीलप्रमाणे तक्रार करावी.
- हेल्पलाईन नंबर (Helpline Number ) सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता, सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत 1800114000 किंवा 18001114404 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करू शकता .
- SMS 8130009809 या संपर्क क्रमांकावर पाठवून तक्रार नोंदवू शकतो.
- consumerhelpline.gov.in या ऑनलाईन पोर्टलचा वापर करून तक्रार नोंद केली जाऊ शकते.
- NCH(National Consumer Helpline) आणि UMANG या दोन मोबाईल अँपचा वापर करून तक्रार दाखल करता येईल.
MRP किंमतीपेक्षा जास्त पैसे कोण घेऊ शकतात?
- थिएटर्स व हॉटेल मधील काही किरकोळ विक्रेत्यांना कायदेशीर रित्या पाणी बॉटल व पॅकिंग प्रॉडक्ट MRP पेक्षा जास्त किमतीला विकण्याची परवानगी आहे.
- भारतीय सुप्रीम कोर्टाने १२ डिसेंबर २०१७ रोजी फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट अससोशिअन ऑफ इंडिया (Federation of Hotel and Restaurant Association of India) ने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला आहे की, ते मेट्रोलोजी कायदा २००९ अंतर्गत येत नाही.
- थिएटर्स व हॉटेल फक्त प्रॉडक्ट विकत नाहीत तर ते त्यासाठी योग्य वातावरण तयार करतात. हॉटेलमध्ये जेवताना किंवा मुव्हीज पाहताना त्याचा आनंद घेता यावा यासाठी टेबल, खुर्ची, AC व इत्तर सोयी-सुविधा उपलब्ध करून देतात.
एमआरपीचे फायदे (Benefits of MRP)
ग्राहक जागरूकता निर्माण करते, टॅक्स चुकवणाऱ्यांवर प्रतिबंध बसतो, ग्राहकाला प्रॉडक्टसाठी जास्त किंमत आकारून फसवणाऱ्या पुरवठादारांच्या संभाव्यतेला आळा घालते, ब्लॅक-मार्केटिंग नाही, ग्राहकांचा विश्वास निर्माण करणे आणि खरेदीदार-विक्रेता संबंध मजबूत करणे. एकसमान किंमत तयार करणे हे MRP चे उद्दिष्ट आहे. मॅनिफॅक्चररने निश्चित केलेली MRP हा निश्चित आणि कायदेशीर दर असतो. जो संपूर्ण देशात लागू आहे. MRP ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करते, विशेषत: दुर्गम किंवा ग्रामीण भागात.सर्व पॅकेज केलेल्या वस्तूंवर करासह एमआरपी छापली जाते, त्यामुळे ग्राहकांकडून जास्त किंमत आकारल्याच्या तक्रारी कमी आहेत.
एमआरपीचे तोटे (Disadvantage of MRP)
एखाद्या प्रॉडक्टची एमआरपी ठरवण्यात सरकारची भूमिका कमी असल्याने, मॅनिफॅक्चरर त्या प्रॉडक्टची एमआरपी म्हणून अयोग्य रक्कम ठरवू शकतात. एमआरपीमुळे बाजारात अकार्यक्षमता निर्माण होऊ शकते. मॅनिफॅक्चरर त्यांच्या प्रॉडक्टची एमआरपी ठरवत असल्याने, त्यांना जास्त किंमती आकारण्याची संधी मिळते ज्याचा परिणाम अनेक लहान-मोठ्या किरकोळ दुकानदारांवर होतो आणि त्यामुळे त्यांच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींमुळे त्यांचा ग्राहकांचा विश्वास गमावू शकतो. दुर्गम भागातील किरकोळ दुकानदारांना जास्तीचा वाहतूक खर्च सहन करावा लागतो आणि तो खर्च भरून काढण्यासाठी ते MRP पेक्षा जास्त किंमत आकारू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे नुकसान होते. मॅनिफॅक्चरर कोणत्याही प्रॉडक्टचा MRP दर निश्चित करण्यापूर्वी, भारतातील कोणत्याही राज्याद्वारे उत्पादनावर आकारला जाणारा सर्वोच्च टॅक्स दर विचारात घेतो. त्यामुळे, तुमच्या राज्यातील टॅक्सचे दर कमी असले तरीही, तुम्हाला कदाचित जास्त किंमत मोजावी लागेल कारण इतर राज्यांमध्ये टॅक्सचे दर जास्त असू शकतात.