Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cost Inflation Index म्हणजे काय? गुंतवणुकीवरील परताव्यातून करबचत कशी होते, उदाहरणासह समजून घ्या

Cost Inflation Index

Cost Inflation Index: एखाद्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्यावर किती कर आकारला जावा हे ठरवण्यासाठी Cost Inflation Index आधार मानला जातो. दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) CII दर जाहीर करते. परताव्यावर कर आकारताना महागाई विचारात घेतली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारास करलाभ मिळतो, यास इंडेक्सेशन बेनिफिट असे म्हणतात.

Cost Inflation Index: तुम्ही जर एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. म्हणजेच तुम्ही गुंतवणुकीतून जो नफा कमावला आहे त्यावर कर द्यावा लागतो. येथे एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की, जेव्हा तुम्ही गुंतवणूक केली होती तेव्हाचा महागाई दर आणि सद्यस्थितीतील महागाई दर सारखा नसेल. नक्कीच महागाई वाढलेली असेल.

दीर्घकाळ गुंतवणुकीच्या परताव्यावर कर आकारताना महागाई विचारात घेतली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारास करलाभ मिळतो, यास इंडेक्सेशन बेनिफिट असे म्हणतात. (what is indexation benefit on investment) नुकतेच सरकारने डेट म्युच्युअल फंड आणि काही ठराविक एक्सचेंज ट्रेडेट फंड (ETF) यावरील इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतले. म्हणजे या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त करलाभ मिळणार नाही. सोने, स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीवर अद्यापही इंडेक्शेशन बेनिफिट मिळते.

हे इंडेक्सेशन बेनिफिट Cost Inflation Index वर अवलंबून असते. त्यामुळे आधी कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे काय हे समजून घेवूया.

एखाद्या दीर्घकालीन गुंतवणूक परताव्यावर किती कर आकारला जावा हे ठरवण्यासाठी Cost Inflation Index आधार मानला जातो. दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) हा दर जाहीर करते. एप्रिल 2023 मध्ये चालू आर्थिक वर्षासाठी CII दर 348 इतका आहे. 2022 आर्थिक वर्षासाठी हा दर 331 इतका होता. दरवर्षी जशी महागाई वाढते तसा हा दरही वाढवला जातो.

2002 आर्थिक वर्षात सर्वात प्रथम CII इंडेक्स जारी करण्यास सरकारने सुरुवात केली. तेव्हा हा इंडेक्स 100 इतका ठेवण्यात आला होता. 2013 हा इंडेक्स 200 च्या पुढे गेला. तर 2021 साली या इंडेक्सने 300 अंकांचा टप्पा ओलांडला.

CII इंडेक्स का महत्त्वाची आहे? (Cost Inflation Index)

एखाद्या मालमत्तेचे प्रत्येक वर्षी सरासरी मूल्य किती वाढले हे या इंडेक्सद्वारे समजून येते. जेव्हा तुम्ही एखादी गुंतवणूक करता तेव्हाचे तिचे मूल्य आणि काही वर्षानंतर विक्री करताना किंवा परतावा मिळतो त्यातील जो फरक आहे त्यावर कर आकारताना CII इंडेक्स विचारात घेतला जातो. जेव्हा तुम्ही गुंतवणूक केली होती तेव्हाचे मालमत्तेचे मूल्य महागाई विचारात न घेता नफा काढला तर तुम्हाला खूप जास्त कर द्यावा लागेल. त्यामुळे महागाई विचारात घेता नक्की किती नफा झाला हे समजते.

मालमत्ता खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक जेवढा मोठा तेवढा जास्त कर गुंतवणूकदाराला भरावा लागेल. इंडेक्सेशनमुळे कर कमी होण्यास मदत होते. किती वर्ष एखादी गुंतवणूक करता यावरही कराची रक्कम अवलंबून असते. सोने आणि बाँडमध्ये जर तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट मिळते. स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीसाठी इंडेक्सेशन लाभ दोन वर्षानंतर मिळतो. तर इक्विटी गुंतवणुकीवर 1 वर्षानंतर मिळतो.

CII इंडेक्सच्या आधारे परताव्यावरील कर कसा मोजला जातो?

समजा तुम्ही 2012 साली 50 लाख रुपयांना घर खरेदी केले होते. आणि 2023 साली 1 कोटी रुपयांना घर विकले. प्रथमदर्शनी तुम्हाला 50 लाख रुपयांचा नफा झाला असे दिसते. या 50 लाखांवर जर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मोजला तर तुम्हाला जास्त कर द्यावा लागेल. मात्र, इंडेक्सेशन बेनिफिटद्वारे महागाई विचारात घेतली तर एवढा कर द्यावा लागणार नाही. 

2012 साली CII इंडेक्स 184 अंक होता. 
2023 साली CII इंडेक्स 331 अंक होता.

ज्या वर्षी तुम्ही घर खरेदी केले होते त्या रकमेला त्या वर्षातील CII इंडेक्स दराने गुणा आणि नंतर मालमत्ता ज्या वर्षी विक्री केली त्या वर्षातील CII दराने भाग द्या. 
(50 लाख X 184) / 331 = ही रक्कम 90 लाख 43 हजार रुपयांच्या जवळ येते.

1 कोटी विक्री किंमत - 90 लाख 43 = 9.57 लाख लाख रुपये.

त्यामुळे इंडेक्सेशन बेनिफिटमुळे 50 लाख नफ्यावर नाही तर फक्त 9.57 लाख रुपयांवर कर आकारला जाईल.