आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar card) महत्त्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो. कोणत्याही ठिकाणी ओळखीचा पुरावा मागितला तर हमखास आधार कार्ड पुढे केले जाते. पण तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता असल्याचे खुद्द सरकारने व्यक्त केली असून, त्याबाबत सरकारने आधार कार्ड डाऊनलोडबाबत अलर्ट जारी केला आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, नागरिकांनी फक्त मास्क आधार (Masked Aadhaar) शेअर करण्यास सांगितले आहे. नागरिकांनी कोणत्याही कामासाठी आधार कार्डची फोटोकॉपी देऊ नये. कारण अशा फोटोकॉपीचा काही लोकांकडून गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी आधारच्या फोटोकॉपीऐवजी मास्क आधार देण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली आहे.
मास्क आधार कार्ड म्हणजे काय? (What is Mask Aadhaar Card?)
मास्क आधारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुमचा पूर्ण 12 अंकी आधार क्रमांक दिसत नाही. आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर रोखता येईल. हे मास्क आधारकार्ड कसे ऑनलाईन डाउनलोड करता येते.
आधार कार्ड देताना थोडं सावध राहा!
सरकारी किंवा खाजगी कामानिमित्त तुम्ही तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी देत असाल तर थोडं सावध राहा. अन्यथा तुम्हाला याचा आर्थिक किंवा इतर माध्यमातून फटका बसू शकतो. सध्या आधार कार्डचा वापर करून काही मंडळी तुमची माहिती चोरू शकतात किंवा तुमची आर्थिक फसवणूकही होऊ शकते. याबाबत केंद्र सरकारने नोटीफिकेशून काडून नागरिकांना आधार कार्डच्या फोटोकॉपीऐवजी मास्क आधार वापरण्याचा सल्ला दिला आहे.
खाजगी संस्थांना आधार कार्ड प्रत ठेवण्याची परवानगी नाही
हॉटेल, पर्यटन किंवा इतर कारणांसाठी तुम्ही सर्रासपणे आधार कार्डचा वापर करत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा. हॉटेल्स किंवा सिनेमा हॉल व तत्सम खाजगी संस्थांना आधार कार्डची प्रत घेण्याची आणि ठेवण्याची परवानगी नाही. असे केले गेल्यास ते आधार कार्ड कायदा 2016 (The Aadhaar (Targeted Delivery of Financial and other Subsidies, benefits and services) Act, 2016 ))चे उल्लंघन आहे.
सार्वजनिक वाय-फायपासून दूर रहा
आधार कार्ड धारकांनी कोणत्याही इंटरनेट कॅफे, किंवा सार्वजनिक संगणकावरून किंवा सार्वजनिक वाय-फाय सेवेवरून ई-आधार कार्ड डाऊनलोड करणे टाळावे. काही कारणास्तव तुम्ही सार्वजनिक वाय-फाय किंवा संगणाकाचा वापर करत असाल तर, संगणकावरून ई-आधार कार्ड डाऊनलोड केल्यानंतर त्या संगणकामधून डाऊनलोडमधून तुमचे ई-आधार कार्ड डिलिट करण्यास विसरू नका.
मास्क आधार कसे डाउनलोड करणार (How to download Masked Aadhar)
- https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून OTP ने लॉगिन करा.
- त्यानंतर आधार कार्ड डाऊनलोड' या पर्यायावर क्लिक करा.
- Do you want a Masked Aadhaar हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचे मास्क आधार डाऊनलोड करा.
आपल्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून मास्क आधार वापरणे गरजेचे आहे.