• 27 Mar, 2023 06:31

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Joint Life Insurance Policy: संयुक्त जीवन मुदत विमा पॉलिसी म्हणजे काय?

What is Joint Life Insurance Policy

Joint Life Insurance Policy: जॉईंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, नावाप्रमाणेच पती आणि पत्नी दोघांनाही एकाच पॉलिसीच्या अंतर्गत लाईफ-कव्हर प्रदान करते. पॉलिसीधारकांपैकी एकाचे निधन झाल्यास, संयुक्त जीवन पॉलिसीसारखा टर्म प्लॅन घराची आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करतो.

अहो बाबा, माझी स्वतःची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहेच. शिवाय मला माझ्या कंपनीकडून आणि आता मीराला देखील तिच्या कंपनीकडून लाईफ इन्शुरन्स कव्हर दिला गेलेला आहेच. मग आम्हाला जॉईंट लाईफ इन्शुरन्स प्लॅनची गरज आहे काय?

निश्चितच, सिद्धार्थ. तू सिंगल होतास, तेव्हा टर्म इन्शुरन्स प्लॅन (Term Insurance Plan) घेणे योग्यच होते. मात्र आता तुझे लग्न झाले आणि तुम्ही दोघेही नोकरी करता, शिवाय रोजचे ट्रॅव्हल, ड्रायव्हिंग तर आहेच. तेव्हा तुमच्या भविष्याची आर्थिक स्थिरता तुम्हा दोघांवरही अवलंबून असणार आहे. तुमच्या दोघांचे स्वतंत्र टर्म प्लॅन्स असणे तुमच्या भविष्यासाठी केव्हाही चांगलेच! परंतु ते किफायतशीर असू शकत नाही. पण जॉईंट लाईफ इन्शुरन्स आवश्यक कव्हरेज तर देईलच आणि शिवाय तुम्हा दोघांना वेगवेगळे प्रीमिअमचे हप्ते देखील भरायला नाही लागणार. 

संयुक्त जीवन विमा पॉलिसी म्हणजे काय?

जॉईंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, नावाप्रमाणेच पती आणि पत्नी दोघांनाही एकाच पॉलिसीच्या अंतर्गत लाईफ-कव्हर प्रदान करते. पॉलिसीधारकांपैकी एकाचे निधन झाल्यास, संयुक्त जीवन पॉलिसीसारखा टर्म प्लॅन घराची आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करतो. जॉईंट लाईफ पॉलिसीचा प्रीमियम, हा इतर टर्म इन्शुरन्स प्लॅनप्रमाणेच नियमित अंतराने भरला जाणे, आवश्यक असते. पॉलिसी-टर्ममध्ये, जोडीदारांपैकी एकाचे निधन झाल्यास, सहजोडीदार लाईफ-इन्शुरन्सची संपूर्ण रक्कम मिळविण्यासाठी क्लेम दाखल करू शकतो. जॉईंट लाईन इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर्ड  झाल्यानंतर कोणतेही सर्व्हायव्हल बेनिफिट्स मिळत नाहीत.

जॉईंट लाईफ इन्शुरन्स प्लॅनची वैशिष्ट्ये  

सध्या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये विविध इन्शुरन्स कंपन्यांची स्पर्धा चालू असल्याने, अनेक इन्शुरर्स संयुक्त जीवन विमा पॉलिसीच्या अंतर्गत पॉलिसीधारकाच्या जोडीदारासाठी एकूण विमा रकमेच्या (Sum Assured) अगदी  50% पर्यंत लाईफ कव्हरेज प्रदान करतात. पॉलिसी कालावधीमध्ये प्राथमिक विमाधारकाचा (Primary Policyholder) मृत्यू झाल्यास, इन्शुरन्स कंपनी विम्याची रक्कम हयात जोडीदाराला संयुक्त जीवन पॉलिसीच्या अटींनुसार देते. मात्र पॉलिसी सक्रिय राहते. काही पॉलिसींमध्ये पॉलिसीधारकाचा (Primary Policyholder) मृत्यू झाल्यानंतर हयात असलेल्या भागीदारावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रीमियम माफ (Waiver of Premium ) केला जातो. तर काही प्रकरणांमध्ये दोन्ही पॉलिसीधारकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर पॉलिसीची रक्कम पॉलिसीधारकाच्या लाभार्थ्यांना किंवा कायदेशीर वारसांना दिली जाते.

जॉईंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे

1. जॉईंट लाईफ पॉलिसीचा प्रीमियम कमी खर्चिक असणे आणि त्यामुळे होणारी खर्चाची बचत हा सर्वांत महत्त्वाचा व्यावहारिक फायदा आहे. दीर्घकालीन खर्चाचा विचार करता, किफायतशीर असणाऱ्या पॉलिसीज् जोडप्यांना परवडतील, अशा किमतीत ड्युअल लाईफ कव्हरचा (Dual Life Cover) लाभ घेऊ शकतात.

2. पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या घटनेत, लाभार्थी-व्यक्तीला एकरकमी किंवा मासिक पे-आऊट पद्धतीने उत्पन्नाचा नियमित प्रवाह चालू होतो.

3. जॉईंट लाईफ पॉलिसीमधून भरलेला प्रीमियम इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सवलत तर देतोच. पण सह-पॉलिसीधारकाला किंवा नॉमिनीला दिला जाणारा डेथ पे-आऊट देखील इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहे.

जॉईंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कोणी आणि का खरेदी करावी?

संयुक्त जीवन विमा (Joint Life Insurance) केवळ विवाहित जोडप्यांसाठीच उपयोगी आणि डिजाईन केलेला आहे, असे अजिबात नाही. याचा लाभ अगदी व्यावसायिक भागीदार (Business Partners) देखील घेऊ शकतात. पालक देखील त्यांच्या मुलांसह संयुक्त जीवन विमा पॉलिसीमध्ये सह-मालक म्हणून निवड करू शकतात. म्हणजेच, एखाद्या दुर्दैवी घटनेमध्ये, पालकांचा अकाली मृत्यू झाल्यास मुलांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण करता येणे शक्य होते. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे त्यांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी आणि अगदी त्यांच्या रोजच्या देखभालीच्या वाढत्या खर्चासाठी खूप उपयुक्त आणि त्याचबरोबर सन्मानाचे ठरू शकतात.

सध्याचे जॉब-कल्चर, करिअरमधील उपलब्ध संधी, वाढती महागाई, उंचावलेली लाईफ-स्टाईल आणि सिंगल इन्कमसोर्सच्या मर्यादांमुळे एकूणच वर्क-फोर्समध्ये, एम्प्लॉयमेंटमध्ये महिलांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. वाढते तणावपूर्ण जीवन, करिअरमधील स्पर्धा, दिवसेंदिवस जिकिरीचे होत चाललेला प्रवास यामुळे पती-पत्नी दोघांसाठी लाईफ इन्शुरन्स कव्हर असणे, अनिवार्य झाले आहे. दोघांसाठीचा इन्शुरन्स कव्हर घराच्या, कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेचे रक्षण तर करतोच, पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे देखील आर्थिक भविष्य सुरक्षित करतो, विशेषकरून मुलांचे. संयुक्त जीवन विमा योजना ही केवळ विवाहित जोडप्यांपुरती मर्यादित नसून त्यांच्या अपत्यांचेदेखील भविष्य सुनिश्चित करते.