• 02 Oct, 2022 08:35

ITR-5 फॉर्म काय आहे आणि तो कसा फाईल करावा?

ITR FORM income tax

दरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे (ITR filing) असे म्हणतात. तसेच आयटीआर 5 म्हणजे काय (ITR 5 Means) आणि ते कसे फाईल करायचे ते पाहू.

इन्कम टॅक्स विभागाने वेगवेगळ्या करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax Return File) करताना सहजता यावी यासाठी उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार आणि स्लॅबनुसार वेगवेगळे असे एकूम 7 फॉर्म तयार केले आहेत. या 7 फॉर्मपैकी तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताशी कोणता फॉर्म संबंधित आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावर आधारित तुम्हाला रिटर्न फाईल करायचे आहे. आज आपण आयटीआर 5 या फॉर्मबद्दल (ITR 5 Form) जाणून घेणार आहोत.

 

 ITR 5 फॉर्म काय आहे आणि त्यासाठी कोण पात्र आहे? (ITR 5 is for Whom)

ITR-5 Form 2022-23

आयटीआर-5 हा फॉर्म (ITR 5 Form) एखादी फर्म, मर्यादित दायित्व भागीदारी असलेली कंपनी, असोसिएशन ऑफ पर्सन (AOP), बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स (BOI), आर्टीफिशिअल ज्युडिशिअल पर्सन (AJP), दिवाळखोरीत गेलेल्या मालमत्तेसंदर्भात, मृत व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात, गुंतवणूक निधी, बिझनेस ट्रस्ट, स्थानिक प्राधिकरण आणि सहकारी संस्था यांच्यासाठी ITR-5 फॉर्म दाखल करणे योग्य आहे. इथे नमूद केलेल्या श्रेणीतील कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ITR-5 दाखल करण्यासाठी पात्र आहे.

2020-21 या असेसमेंट वर्षासाठी ITR-5 फॉर्ममध्ये झालेले बदल (Changes in ITR 5 Form)

असेसमेंट वर्ष 2020-21 मधील ITR-5 मधील बदलांची माहिती इथे दिली आहे. टॅक्स लेखीपरीक्षण मर्यादा 5 कोटीवरून 10 कोटी रूपये करण्यात आली आहे. ही तरतूद जिथे रोख व्यवहार एकूण व्यवहारांच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तिथे लागू. असेसमेंट वर्ष 2021-22 पासून प्राप्तकर्त्याला मिळणारा लाभांश हा करपात्र असणार आहे. त्यासाठी आयटीआर फॉर्ममध्ये (ITR 5 Form) आवश्यक बदल करण्यात आले आहेत. कलम 194N अंतर्गत रोख पैसे काढण्यासाठी लागू झालेली टीडीएस कपात पुढील वर्षांपर्यंत नेता येणार नाही.

ITR-5 फॉर्मची रचना काय आहे? (ITR 5 Form Format/Structure)

आयटीआर-5 फॉर्म हा दोन भागांमध्ये आणि वेगवेगळ्या टाईमटेबलमध्ये विभागला आहे.

 • भाग A : सर्वसाधारण माहिती
 • भाग A-BS : 31 मार्च, 2019 रोजीपर्यंतचा ताळेबंद
 • भाग A : 2018-19 या आर्थिक वर्षातील उत्पादित खाते
 • भाग A : 2018-19 या आर्थिक वर्षातील व्यापारी खाते 
 • भाग A-P & L : 2018-19 या आर्थिक वर्षातील प्रॉफिट आणि लॉस खाते
 • भाग A-OI : इतर माहिती
 • भाग A-QD : इतर महत्त्वाचा तपशील


आयटीआर -5 दाखल करण्याचे प्रकार

आयटीआर -5 वैयक्तिक / एचयूएफ / कंपनी व्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी आणि आयटीआर-7 दाखल करणे आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे. आयटीआर -5 दाखल करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

 • आयटीआर-5 फॉर्म ऑनलाईन भरून इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर लॉगिन करून ऑनलाईन आयटीआर -5 दाखल करता येऊ शकतो.
 • इन्कम टॅक्स विभागाच्या एफिलिंग पोर्टलवर एक्सएमएल फाईल (XML File) अपलोड करून आणि त्यानंतर आयटी रिटर्नची शहानिशा करून किंवा आधार ओटीपी, बँक खाते किंवा डिमॅट खात्याद्वारे ई-पडताळणी करू शकता.
 • विभागाच्या वेबसाईटवर फॉर्म भरून आयटीआर-5 ची एक कॉपी स्वत:च्या सहीसह इन्कम टॅक्स विभागाच्या बंगळुरू ऑफिसला पोस्टाने पाठवावी लागते.
 • लेखापरीक्षणानुसार 44 44 AB / AD 44 AD अंतर्गत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत ऑडिट अहवाल वेगळ्या पद्धतीने अपलोड करावा लागेल आणि त्यानंतर आयटीआर -5 दाखल करावा लागेल.
 • लेखापरीक्षण निर्धारणासंदर्भात आयटीआर-5 मध्ये डिजीटल सही करुन अपलोड करावा लागेल. इथे ओटीपीद्वारे मॅन्युअली सही करण्यास परवानगी नाही.