Revenue Secretary appealed Filing ITR: 'गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत सुमारे 5.83 कोटी रुपयांचे आयकर रिटर्न नागरिकांनी भरले होते. 2022-23 च्या मूल्यांकन वर्षासाठी रिटर्न भरण्याचा हा शेवटचा दिवस होता. आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक रिटर्न भरण्याची अपेक्षा करत आहोत', असे वक्तव्य महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी केले.
वेळेत भरा आयटीआर
'आम्ही आयकर रिटर्न फाइल करणार्यांचे आभार मानू इच्छितो, कारण आयटीआर भरण्याची गती गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच वेगवान आहे. तसेच नागरिकांनी आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू नये', कारण अर्थ मंत्रालय मुदत वाढविण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे संजय मल्होत्रा यांनी सांगितले. तसेच आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै जवळ येत असल्याने नागरिकांना लवकरात लवकर आयकर भरण्याचा सल्ला त्यांनी दिला.
अधिक कर जमा होण्याची अपेक्षा
कर संकलन हे 10.5 टक्के वाढीच्या उद्दिष्टाशी कमी-अधिक प्रमाणात आहे. मल्होत्रा म्हणाले की, वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) वाढीचा विचार केला, तर तो आतापर्यंत १२ टक्के आहे. तथापि, दर कपातीमुळे, उत्पादन शुल्क आघाडीवर वाढीचा दर 12 टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकदा कर दर कपातीचा प्रभाव कमी झाला की, लक्ष्य गाठणे सोपे होईल, असेही ते म्हणाले. 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पानुसार, चालू आर्थिक वर्षात सरकारला एकूण 33.61 लाख कोटी रुपयांचा कर जमा होण्याची अपेक्षा आहे, असे वक्तव्य कर संकलनाच्या बाबतीत मल्होत्रा यांनी केले.