Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Floater Mutual Funds: फ्लोटर म्युच्युअल फंड म्हणजे काय? या फंडातील गुंतवणुकीचे फायदे जाणून घ्या

Floater Mutual Funds

फ्लोटर म्युच्युअल फंड हे रेग्युलर डेट फंडपेक्षा वेगळे असतात. रेपो रेट, गव्हर्नमेंट सिक्युरिटी दर आणि इंटर बँक ऑफर रेट किती आहे? यानुसार फ्लोटर म्युच्युअल फंडाचा परतावा बदलतो. व्याजदरात वाढ होत असताना फ्लोटिंग फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरते. मुदत ठेवी आणि निश्चित कालावधीच्या बाँड्समधील गुंतवणुकीपेक्षा हा पर्याय चांगला ठरू शकतो.

Floater Mutual Funds: फ्लोटर म्युच्युअल फंड हे एक प्रकारचे डेट म्युच्युअल फंड असतात. ओव्हरनाईट म्युच्युअल फंड, लिक्विड फंड, डायनामिक फंड यासारखे डेट म्युच्युअल फंडाचे 16 प्रकार आहेत. त्यातील एक फ्लोटर म्युच्युअल फंड आहे. डेट म्युच्युअल फंड अशा रोखे आणि डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करतात ज्यामधून निश्चित परतावा मिळतो. मात्र, फ्लोटर म्युच्युअल फंड यापेक्षा वेगळे असतात. यामधून मिळणारा परतावा हा रेपो रेट आणि इतर व्याजदर वाढीशी संबंधित असतो.

फ्लोटर म्युच्युअल फंड रेग्युलर डेट फंडपेक्षा वेगळे कसे?

रेग्युलर डेट म्युच्युअल फंड अशा बाँड, डिबेंचर्स आणि सेक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात ज्यामधून निश्चित परतावा मिळतो. डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना व्याजदर निश्चित माहिती असतो. त्याच दराने तुम्हाला परतावा मिळतो. (Features of Floater Mutual Funds) मात्र, जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा कमी व्याजदर असताना घेतलेले डेट फंड आकर्षक राहत नाहीत. कारण त्यांच्यापेक्षा जास्त परतावा देणारे डेट फंड बाजारात आलेले असतात. मात्र, फ्लोटर म्युच्युअल फंडचे असे नाही. या फंडातील 65% रक्कम फ्लोटिंग बाँडमध्ये गुंतवलेली असते. ते बाजाराच्या स्थितीनुसार चढउतार होत असतात.

या बाँडाचा दर अर्थव्यवस्थेशी निगडीत असतो. म्हणजे रेपो रेट ,गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि इंटर बँकिंग ऑफर रेट नुसार फंडाचा व्याजदर बदलत असतो. व्याजदर वाढत असताना या फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरते. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा गुंतवणुकदाराला जास्त परतावा मिळतो. मात्र, व्याजदर खाली येतात, तेव्हा परतावा कमीही मिळू शकतो. अनेक अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे फ्लोटिंग बाँड गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

फ्लोटर फंडबाबत महत्त्वाची माहिती

  • फ्लोटिंग रेट बाँड व्याजदर वाढत असताना जास्त परतावा देतात. 
  • रेग्युलर फंडमध्ये निश्चित परतावा मिळतो. फ्लोटर फंडमध्ये मार्केटनुसार परतावा मिळतो.
  • जास्त क्रेडिट रेटिंग असलेल्या बाँड्समधील गुंतवणूक सुरक्षित राहते. 
  • कमी जोखीम घेण्याची क्षमता असल्यास फ्लोटर फंडमध्ये गुंतवणूक करावी. 
  • व्याजदर वाढत असताना मुदत ठेवी आणि रेग्युलर डेट फंडपेक्षा चांगला पर्याय ठरतात.  
  • रेपो रेट, सरकारी सेक्युरिटीज आणि इंटर बँकिंग ऑफर रेट कधी वाढतात हे समजून घ्या.  
  • कधीही गुंतवणूक करू शकता किंवा पैसे काढून घेऊ शकता.

गुंतवणूक कशी करता येईल?

फ्लोटर फंड हे ओपन एंडेड फंड असतात. (Investing in Floater Mutual Funds) म्हणजेच या फंडमध्ये कधीही गुंतवणूक करता येते तसेच पैसे काढूनही घेता येतात. फ्लोटर फंड सहसा चांगली क्रेडिट रेटिंग असलेल्या बाँड आणि डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करतात. मात्र, तरीही तुम्ही गुंतवणूक करताना फंडाबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

फ्लोटर फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी?

जर तुमची जास्त जोखीम घेण्याची क्षमता नसेल तर फ्लोटर फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. अर्थव्यवस्थेची स्थिती, आरबीआय दरवाढ कधी करते, व्याजदर कमी जास्त होण्याची शक्यता याचा अंदाज तुम्हाला योग्य बांधता येत असेल तर फ्लोटर फंडमध्ये गुंतवणूक करा. कारण व्याजदर वाढत असताना परतावाही वाढतो. (Advantages of Investing in Floater Mutual Funds) जेव्हा रेपो रेट, गव्हर्नमेंट सेक्युरिटी बाँडचे दर खाली येत असतात अशा वेळी फ्लोटर फंडमध्ये गुंतवणूक केली तर जास्त परतावा मिळणार नाही. एक वर्षांपेक्षा जास्त काळ पैसे फ्लोटिंग फंडमध्ये ठेवण्याची तयारी गुंतवणुकदारांनी ठेवावी, असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात.