Center for Cultural Resources and Training : दहा ते चौदा वर्षे वयोगटातील हुशार मुलांना आणि मान्यताप्राप्त शाळांशी संबंधित असलेल्या किंवा इतर पारंपारिक परफॉर्मिंग कलांचा सराव करणाऱ्या कुटूंबांना विशेष प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे संगीत, चित्रकला, नाटक, नृत्य, हस्तकला आणि साहित्यिक कला, इत्यादी सांस्कृतिक क्षेत्रातील मुलांना त्यांच्या कलागुणांचा विकास करण्यास वाव मिळतो.
Table of contents [Show]
दर दोन वर्षांनी नूतनीकरण
सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र मुलांना आधी ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी दिल्या जाते. त्यानंतर शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात घेऊन, दर दोन वर्षांनी त्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण केले जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्याला त्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होत पर्यंत किंवा वयाच्या वीस वर्षे वयापर्यंत घेता येते.
दरवर्षी 650 मुलांना शिष्यवृत्ती
कलेचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी CCRT टॅलेंट सर्च शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी वार्षिक आधारावर शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती ही राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती आहे. प्रत्येक वर्षी 650 मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्याअंतर्गत अनुसूचित जातीतील मुलांसाठी आदिवासी सांस्कृतिक कलांसाठी 100 शिष्यवृत्ती, पारंपारिक कला कुटुंबातील मुलांसाठी 125 शिष्यवृत्ती, दिव्यांग मुलांसाठी 20 शिष्यवृत्ती आणि सर्जनशील लेखन आणि साहित्य कला क्षेत्रात अर्ज करणाऱ्या मुलांसाठी 30 शिष्यवृत्ती निवडण्यात आली आहे. उर्वरित 375 शिष्यवृत्ती इतर सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी असेल.
पात्रता काय आहेत
- आदिवासी संस्कृतीतील किंवा अनुसूचित जमातीतील अशी मुले, ज्यांच्याकडे वैध असे जातीचे प्रमाणपत्र आहे.
- पारंपारिक कलांचा सराव करणाऱ्या कुटुंबातील किमान 03 पिढ्या ज्या कला प्रकारांचा सतत सराव करत असतील, अश्या कुटूंबातील मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार.
- ज्यांच्याकडे संबंधित प्राधिकरणाने जारी केलेले वैध अपंगत्व प्रमाणपत्र असेल, अश्या अपंग मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार.
- तसेच मुलांच्या पालकांचे मासिक उत्पन्नाचे निकष पडताळून आणि सर्व उमेदवारांसाठी प्रतिभा आणि क्षमतेचे निकष देखील विचारात घेतले जाते.
अर्ज कसा करावा
- सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज CCRT च्या अधिकृत वेबसाइट http://ccrtindia.gov.in/index.php वर उपलब्ध आहे.
- विद्यार्थ्याचे पालक CCRT कल्चरल टॅलेंट सर्च स्कॉलरशिपचा अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.
- फॉर्म भरल्यानंतर,त्यांना खाली दिलेल्या CCRT च्या अधिकृत पत्त्यावर सबमिट करावा लागेल -
- विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी,त्यांना मुलाखत आणि चाचणीसाठी बोलावले जाते.
- कट ऑफ आणि मेरिटच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय निवड समिती असते.
- प्रत्येक वर्षी मे-ऑगस्ट महिन्यात प्रादेशिक स्तरावर आयोजित केलेल्या मुलाखती आणि परीक्षेची तारीख,वेळ आणि ठिकाण याबद्दल फक्त निवडलेल्या उमेदवारांना पोस्टाद्वारे कळवले जात असते.
- CCRT शिष्यवृत्तीसाठी मुलाखती आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक तज्ज्ञ समिती सदस्याद्वारे 1 ते 10 च्या स्केलवर मूल्यांकन केले जाते आणि त्यांना मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली जाईल. ही निवड 'मेरिट'च्या क्रमाने आणि शिष्यवृत्तीच्या संख्येच्या उपलब्धतेच्या नूसार केली जाते.
शिष्यवृत्तीसाठी दिली जाणारी रक्कम
- विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 3600 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
- व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी लावलेल्या विशेष प्रशिक्षण वर्गासाठी देखील शिष्यवृत्तीच्या मूल्याव्यतिरिक्त शिकवणी फी दिली जाईल. परंतु, हे शिकवणी शुल्क 9000 रुपये प्रतिवर्ष पेक्षा जास्त नसावे.
- शिष्यवृत्तीची रक्कम NEFT/ECS/RTGS द्वारे शिष्यवृत्तीधारकांच्या अधिकृत पालकांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
- पात्र विद्यार्थ्यांच्या गुरु किंवा शिक्षकांनी रीतसर स्वाक्षरी केलेली पेमेंट पावतीही CCRT ला पाठवावी लागेल.
सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या तारखा एप्रिल ते मे महिन्यात निघतात. मुलाखत घेण्याचे आणि प्रशिक्षण प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे काम मे ते जून महिन्यात केले जाते. निकालाची अंतिम निवड यादी जून महिन्यात सादर केली जाते.