क्रिप्टोकरन्सी मार्केट हे प्रचंड अस्थिर (Volatile) मार्केट आहे; हे सर्वांनाच माहिती आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) इतर मार्केट्प्रमाणे ठराविक वेळेत काम करत नाही. त्यामुळे 24 तास सुरु असणाऱ्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केटमधील अनेक संधींवर पाणी सोडावे लागते. याच अडचणींवर उपाय म्हणून क्रिप्टोकरन्सी बॉट्स (Cryptocurrency Bots) तयार करण्यात आले. मुळतः यामध्ये एका रोबोटला नियम व अल्गोरिदम सांगितले जातात. त्याप्रमाणे तो रोबोट मार्केटमधील ट्रेड (शेअर्सची खरेदी-विक्री) पार पाडतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर, क्रिप्टोकरन्सी बॉट्स (Cryptocurrency Bots) हे गुंतवणूकदारांसाठी कार्य करणारं स्वयंचलित ट्रेडिंग सिस्टिम (Automated Trading System) आहे. यामध्ये आपण सेट केलेली ठराविक परिस्थिती जेव्हा मिळून येते; तेव्हा ट्रेड पूर्ण केली जाते. आणखी सोप्या शब्दात सांगायचं झाले तर रोबोट क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग सोपी करतात. सामान्य गुंतवणूकदारांप्रमाणे या बॉट्सना भावना नसल्याने मार्केटमध्ये खरेदी-विक्री करताना भावुक होऊन रोबोटकडून शक्यतो चूक होत नाही. क्रिप्टो मार्केटच्या अस्थिरतेमुळे हे बॉट्स क्रिप्टो मार्केटमध्ये सर्वात जास्त उपयोगी ठरतात. क्रिप्टो मार्केटमध्ये 70 ते 80 टक्के व्यवहारांमध्ये या बॉट्सचा सहभाग दिसून येतो.
Table of contents [Show]
क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये बॉट्सचा वापर
डेटा अनालिसिस (Data Analysis)
क्रिप्टोकरन्सी बॉट्स मार्केटमधील संपूर्ण डेटा वेगवेगळ्या स्त्रोतांमधून मिळवून तो स्कॅन करतात आणि त्यानुसार खरेदी किंवा विक्री करायची, हे ठरवितात. अनेक बॉट्स वापरकर्त्यांना ठराविक डेटा कोणत्या प्रकारचा असावा, हे ठरविण्याची सुविधा देखील पुरवितात.
जोखीम अंदाज (Risk Analysis)
क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग बॉट्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मार्केटमधील जोखमीचा अंदाज लावू शकतात. मार्केटमधील माहितीचा (Data) वापर करून बॉट्स गुंतवणूक केव्हा करायची याचा निर्णय घेतात.
क्रिप्टो अससेट्सची खरेदी विक्री (Buy and Sell of Crypto Assets)
क्रिप्टोकरन्सी बॉट्स एपीआय की (Application Program Interface- API Key)चा वापर करतात. ज्यामुळे असेट केव्हा खरेदी करायचे व केव्हा विकायचे असे निर्णय ते घेऊ शकतात. या ‘एपीआय की’ (API Key) एका पासवर्डप्रमाणे काम करतात. ट्रेडिंग बॉट ही ‘एपीआय की’ प्राप्त झाल्यानंतरच काम करण्यास सुरुवात करतो.
क्रिप्टोकरन्सी बॉट्सचे प्रकार (Types of Crypto Bots)
क्रिप्टोकरन्सी बॉट्स हे आपण हवे तसे कस्टमाईझ करू शकतो. आपण अल्गोरिदम आपल्या गरजेप्रमाणे सेट करू शकतो.
आर्बिट्रेज बॉट्स (Arbitrage Bots)
हे बॉट्स वेगवेगळ्या एक्सचेंज्समधील क्रिप्टोच्या किमतींची तुलना करतात आणि या किमतीतील विसंगतीचा फायदा उचलून हे बॉट्स नफा मिळवितात.
ट्रेंड ट्रेडिंग बॉट्स (Trend Trading Bots)
हे बॉट्स ठराविक असेटच्या हालचालींचा अभ्यास करतात व त्यानंतर खरेदी-विक्रीचा निर्णय घेतात.
कॉईन लेन्डिंग बॉट्स (Coin Lending Bots)
हे बॉट्स मार्जिन ट्रेडर्सना कॉईन्स, कर्ज स्वरूपात देण्यात मदत करतात.
क्रिप्टो ट्रेडिंग बॉट्स हे केवळ मार्केटमधील ट्रेडिंग पद्धत स्वयंचलित करण्यात मदत करतात. बॉट्स हे प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी सोयीचे ठरतातच, असे नाही. त्यामुळे जर तुम्ही बॉट्स घेण्याचा विचार करत असाल तर पूर्ण अभ्यास केल्यानंतरच त्याची खरेदी करा.