Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Winter: क्रिप्टो विंटर म्हणजे काय?

What is Crypto Winter

Image Source : www.cnbc.com

Crypto Winter: क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते.

भारतात एका वर्षात 3 ऋतू असतात आणि प्रत्येक ऋतू हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो. हे लहानपणापासून आपल्यला माहिती आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतुंमधील प्रत्येकाचा एक आवडीचा ऋतू (Favourite Season) नक्कीच असतो. वर्षातून काही वेळा जसे वातावरणात मोठमोठे बदल होत असतात. तसेच काहीसे बदल मार्केटमध्येही होत असतात. अनेकवेळा मार्केटमध्ये बुल्स किंवा बेअर्स इतके प्रभावी होतात की त्यांमुळे संपूर्ण मार्केट बुल्स किंवा बेअर्सचे धोरण स्वीकारते. इतर मार्केट्सप्रमाणे क्रिप्टो मार्केटमध्येही काहीसे असेच चित्र दिसून येते. साधारण वाटणारा हा काळ मार्केटमधील प्रत्येक इन्वेस्टरच्या मानसिकतेवर परिणाम करत असतो. त्यामुळे मार्केटमधील हे ऋतू समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये क्रिप्टो समर आणि क्रिप्टो विंटर (Crypto Summer & Crypto Winter) असे दोन ऋतू आहेत. ज्यापैकी आज आपण क्रिप्टो विंटरबद्दल (Crypto Winter) जाणून घेणार आहोत. 

क्रिप्टो विंटर म्हणजे काय? What is Crypto Winter?

क्रिप्टो विंटर क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील त्या वेळेला म्हटले जाते; ज्या वेळेत मार्केटचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खराब असतो. क्रिप्टो विंटर हे शेअर मार्केटमधील बेअर्स मार्केट प्रमाणेच असते. क्रिप्टो विंटरमध्ये मार्केट लाल रेषेत दिसते व अॅसेट्सचे मूल्य देखील खूप कमी होते. अनेक रिपोर्ट्स नुसार क्रिप्टो विंटरचा हा काळ इन्वेस्टर्सच्या मानसिकतेवर मोठा परिणाम करत असतो. क्रिप्टो मार्केटच्या इतिहासावरून व क्रिप्टो करन्सीजच्या कमी होत असलेल्या मूल्यावरून क्रिप्टो विंटरचा अंदाज लावणे शक्य आहे. 2022 मध्ये बिटकॉईन 70 टक्क्यांनी कोसळल्याने आपण सध्या क्रिप्टो विंटरच्या अगदी रेषेवर उभे आहोत. आतापर्यंत काही क्रिप्टो विंटर्स येऊन गेले आहेत. जसे की, 2017 ते डिसेंबर 2020 या काळात क्रिप्टो मार्केट मोठ्या प्रमाणात पडले व ते भरपूर वेळ त्याच परिस्थितीत राहिले. क्रिप्टो मार्केटमधील अस्थिरतेमुळे याच्या किमतींचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे. त्यामुळे क्रिप्टो विंटर कधी सुरु होईल व कधी संपेल हे सांगणे देखील अत्यंत कठीण आहे. 


क्रिप्टोचे विंटर्स टेन्शन! Crypto's Winter's Tension!

भारतातील शेअर मार्केट हे भरपूर जुने आहे आणि त्याबद्दल सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे यातील बेअर्स मार्केटचा अनुभव अनेकांनी भरपूर वेळा घेतलाय. त्यामुळे अशावेळी नक्की कोणती योग्य पाऊले उचलली पाहिजेत हे ठरवणे गुंतवणूकदारांना शक्य आहे. त्याउलट क्रिप्टोकरन्सी मार्केट हे नवे असल्याने त्याला तितकासा इतिहास नाही. त्यामुळे क्रिप्टो मार्केटमधील क्रिप्टो विंटर दरम्यान योग्य निर्णय घेणे कठीण होते. शेअर मार्केटमधील बेअर मार्केट कधी संपेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. पण क्रिप्टो मार्केटमधील क्रिप्टो विंटर कधी संपेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे.

क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये क्रिप्टो विंटर्सचा धोका तर आहे; परंतु या अवघड वेळेदरम्यान देखील तुमचे योग्य निर्णय तुम्हाला या विंटरच्या थंडीपासून वाचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.