Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto AirDrop म्हणजे काय? नवीन टोकन्स कसे जमा होतात!

Crypto AirDrop

Crypto AirDrop : एअर ड्रॉप ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील मार्केटिंगची एक् स्ट्रॅटेजी मानली जाते. या एअर ड्रॉपमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन जमा होत असतात.

Customer Satisfaction बद्दल तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. कोणत्याही धंद्यात जर ग्राहक (Customer) खुश असेल तर तो धंदा एकदम जोरात धावतो, असे म्हटले जाते. तसे पाहिले तर आपण सर्वच कस्टमर आहोत. आपल्याला खूश करण्यासाठी व्यावसायिक काही ना काही आयडिया लढवत असतात. पण जर तुम्हाला खूश करण्यासाठी एखाद्या बिझनेसमॅनने तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले तर तुम्ही खुश व्हाल? खुश होण्याआधी तुमच्या मनात विचार येईल की, हे असे झाले कसे? तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. यामागे काही काळे-बेरे आहे का? पण क्रिप्टोमार्केटमध्ये हे शक्य आहे आणि तिथे असे वरचेवर होत असते. क्रिप्टोमार्केटमधली ही स्ट्रॅटेजी आहे. मार्केटिंगच्या या स्ट्रॅटेजीचा उपयोग क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नव्या टोकन्स द्वारे होतो आणि त्याला क्रिप्टो एअर ड्रॉप (Crypto AirDrop) असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊयात क्रिप्टो एअर ड्रॉप  नक्की आहेत तरी काय?

एअर ड्रॉप म्हणजे काय? What is AirDrop?

क्रिप्टोकरन्सी मार्केट भरपूर मोठे आहे. या मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीज आहेत. तसेच वेळोवेळी नवनवीन क्रिप्टोकरन्सीज देखील तयार होत असतात. अशावेळी क्रिप्टो मार्केटमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सी येतात किंवा लॉन्च होतात. तेव्हा बऱ्याच जणांना याची माहितीसुद्धा नसते. अशावेळी काही कंपन्या मार्केटिंग आणि जाहिरातींवर जोर देतात. तेव्हा कुठे नवीन क्रिप्टोकरन्सी लोकांच्या नजरेत येतात. पण सर्व जण त्या विकत घेतीलच असे नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी कंपन्या एअर ड्रॉपचा वापर करतात. क्रिप्टोकरन्सी एअर ड्रॉप ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. ज्यामध्ये लोकांना क्रिप्टोकरन्सी टोकन्स (Cryptocurrency Token) दिले जातत. क्रिप्टो मार्केटमध्ये नव्याने आलेल्या क्रिप्टोकरन्सीज काही टोकन्स क्रिप्टो वॉलेट्समध्ये (Crypto Wallets) पाठवतात. जे लोक ब्लॉकचेन कॉम्युनिटीचे अॅक्टिव्ह मेंबर असतात त्यांना या एअर ड्रॉपमध्ये सामील केले जाते. जे लोक क्रिप्टोकरन्सी कंपनीने पाठवलेल्या ईमेल्सना स्वतःच्या अकाउंटवरून ट्विट करतात. त्यांनादेखील बक्षीस म्हणून क्रिप्टोकरन्सी एअर ड्रॉप मध्ये सहभागी केले जाते व टोकन्स दिले जातात. क्रिप्टोकरन्सी  मार्केटमध्ये लोकांचे लक्ष वेधण्यासाठी व मार्केटमध्ये, “अपनी एन्ट्री हुई है” हे सांगण्यासाठी अशा स्ट्रॅटेजीचा वापर करतात. एअर ड्रॉपबद्दलच्या घोषणा विशेषकरून वेबसाईट्स किंवा सोशल मिडिया हॅन्डल्सवर केल्या जातात.

एअर ड्रॉप  कोणत्याही गुंतवणूकदाराला (Investor) दिले जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला पात्र (Qualify) व्हावे लागते. एअर ड्रॉपसाठी पात्र होण्यासाठी तुमच्या वॉलेटमध्ये ठराविक रकमेचे क्रिप्टोकरन्सी कॉईन्स असणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर तुम्हाला काही टास्क कंपनीसाठी करावे लागतात जसे की, सोशल मिडिया फोरमवर क्रिप्टोकरन्सी कॉईन्सविषयी पोस्ट करणे, ब्लॉकचेन प्रकल्पाच्या विशिष्ट सदस्यांशी कनेक्ट करणे किंवा ब्लॉग पोस्ट लिहिणे यांचा समावेश असतो. 

क्रिप्टो एअर ड्रॉपचे प्रकार (Types of Crypto AirDrop)

Types of crypto airdrops

स्टॅण्डर्ड एअर ड्रॉप (Standard Airdrop)

स्टॅण्डर्ड एअर ड्रॉपमध्ये ज्यांना एअर ड्रॉप मध्ये सहभागी व्हायचे असते. त्यांना स्वतःचा इंटरेस्ट दाखवून एअर ड्रॉपमध्ये ऑर्डर टाकावी लागते. लोकांना त्यांचे वॉलेट अॅड्रेस द्वावे लागतात. याशिवाय इतर कोणतीही माहीती घेतली जात नाही. स्टॅण्डर्ड एअर ड्रॉपमध्ये लोकांना किती किमतीचे टोकन्स दिले जाणार आहेत, हे ठरलेले असते.

बॉउंटी एअर ड्रॉप (Bounty Airdrop)

बाऊंटी एअर ड्रॉपमध्ये लोकांनी कंपनीने दिलेले टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना एअर ड्रॉपमध्ये सामील केले जाते. कंपनीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हे टास्क तयार केलेले असतात. त्यात सोशल मिडियावर पोस्ट टाकणे, ट्विट करणे असे सोपे टास्क असतात. इतर युझर्सना या एअर ड्रॉपबद्दल सांगून त्यांनादेखील यात सामील करून घेणाऱ्यांना रेफरल बोनस दिला जातो. जेवढे टास्क पूर्ण तेवढा मोठा एअर ड्रॉप हे साधं गणित बाऊंटी एअर ड्रॉपमध्ये असते.

होल्डर एअर ड्रॉप (Holder Airdrop)

ज्या व्यक्तीकडे आधीपासून क्रिप्टोकरन्सी असते. त्यांना या एअर ड्रॉपमध्ये सहभागी केले जाते. ज्यांच्या वॉलेटमध्ये सर्वांत जास्त क्रिप्टोकरन्सी असते. त्यांना या एअर ड्रॉपमध्ये पहिले सामील केले जाते. या एअर ड्रॉपचा तोटा एकच असतो, ज्यांना फुकटची क्रिप्टोकरन्सी नको असते. त्यांच्या अकाऊंटमध्येही एअर ड्रॉपमुळे क्रिप्टोकरन्सी जमा होते.

एअर ड्रॉप ही फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. ज्यामध्ये तुम्हाला नव्या क्रिप्टोकरन्सीज दिल्या जातात. ही स्ट्रॅटेजी केवळ लोकांना क्रिप्टोकरन्सीकडे आकर्षित करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे त्याचे महत्त्व फार नाही.  पण याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे; कारण उद्या जर तुमच्या वॉलेटला एअर ड्रॉप आलाच तर तुमची झोप उडायला नको.