Conveyance Deed: घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं लाखो रुपये खर्च करून अपार्टमेंट(Apartment) किंवा सोसायटीमध्ये(Society) घर खरेदी करतात. मात्र, घर खरेदी केल्यानंतर ती जागा मात्र बिल्डरच्याच नावावर राहते, हे बऱ्याच लोकांना माहीतच नसते. त्यामुळे प्रत्येक अपार्टमेंटधारकांने साेसायटीची कन्व्हेन्स डीड(Conveyance Deed) करून घेणे गरजेचे आहे असे मत अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
एखाद्या इमारतीमध्ये फ्लॅट(Flat) खरेदी करणे किंवा दुकान खरेदी करणे ही स्वतःची वैयक्तिक जबाबदारी असली, तरीही आपण ज्या इमारतीमध्ये किंवा कॉम्प्लेक्समध्ये राहतो त्याच्या जागेसंबंधीची चौकशी करणे गरजेचे असते. कारण काही विकासक इमारती बांधण्यासाठी जागा स्वतःच्या नावे खरेदी करतात तर काहीजण जागेच्या मूळ मालकाबरोबर भागीदारीचा व्यवहार करतात, अशावेळी जागेचा खरा मालक(Owner) कोण? असा प्रश्न उपस्थित नक्कीच होऊ शकतो. अनेकांना हे माहीतच नसते की घर जरी आपल्या नावावर असले तरीही घराची जागा मात्र संबंधित बिल्डरच्याच नावावर असते.
कन्व्हेन्स डीड म्हणजे नक्की काय?
कन्व्हेन्स डीड(Conveyance Deed) या प्रकारामध्ये आपण राहात असलेल्या इमारतीची जागा आणि इमारत ही आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होऊ शकते. सोसायटीच्या नावाने ज्यावेळी जमिनीची मालकी होते, त्यालाच ‘कन्व्हेन्स डीड(Conveyance Deed)’ असे देखील म्हणतात. कन्व्हेन्स डीड घेण्यामागे सोसायटीचा फायदाच असतो.
विकासकाने नकार दिला तर...
एखाद्या वेळी इमारतीचा विकासक कन्व्हेन्स डीडसाठी(Conveyance Deed) परवानगी देत नसेल तर त्याच्याविरुद्ध उपनिबंधक सहकार न्यायालय, सिव्हिल कोर्ट(Civil Court) मध्ये खटला दाखल करता येऊ शकतो. कन्व्हेन्स डीड(Conveyance Deed) कमीत कमी 6 महिन्यांच्या कालावधीत मिळू शकते तर काही वादविवाद उत्पन्न झाल्यास न्यायालयाच्या तारखांवर तो कधी मिळेल ते समजते.
कन्व्हेन्स डीड घेण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अधिनियम मोफा 1963 कलम 13 अन्वये सरकारने एक कायदा बनवला असून या कायद्यांतर्गत प्रत्येक विकासकाला आपल्या विकल्या गेलेल्या इमारतीच्या सोसायटीचा कन्व्हेन्स डीड 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून द्यावा लागणार आहे. त्यांनी तसं न केल्यास त्यावर 3 वर्षाची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो.
कन्व्हेन्स डीडसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
- जागेच्या मूळ मालकाचे ना हरकत पत्र(No objection letter from the original owner of the premises)
- जागेच्या प्रॉपर्टीचे कार्ड(Property card of the premises)
- सातबारा उतारा(7/12 Document)
- जागेचा नकाशा(A map of the place)
- जागेचे क्षेत्रफळ दाखवणारे कागदपत्र(A document showing the area of the premises)