Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Chat GPT: चर्चेत असलेले हे चॅट जिपीटी आहे तरी काय? त्यातून कसे पैसे कमावले जातात?

Chat-GPT

Chat GPT: चॅट जिपीटी हे एक एआय टुल आहे. ज्याद्वारेआपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही क्षणात जाणून घेऊ शकतो. तसेच, आपली काही कामेही हे टूल करू शकते. या टुलला अल्पावधीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे हे चर्चेत आले आहे, यावर अमेरिकेत बंदीही घालण्यात आली आहे. नेमके हे चॅट जिपीटी काय आहे ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

AI tool Chat GPT: सध्या इंटरनेटच्या जगात दिवसागणिक बदल होत आहेत, रोज कोणते ना कोणते अपडेट्स येत आहेत. त्यात सध्या एआयचा बोलबाला आहे. एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI: Artificial Intelligence) या तंत्रज्ञानाच्या साहय्याने अनेकांनी वेबसाईट्स, अॅप डेव्हल्प केले आहेत. ज्याचा वापर करून आपण भाषांतर, लिप्यंतर, व्हिडीओ, इमेज एडिटींग आदी गोष्टी करू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून चॅट जिपीटी या एआय वेबसाईटविषयी खूप चर्चा होत आहे. हे एआय गुगलपेक्षा तल्लख आहे, याच्या साहाय्याने विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करत आहेत, मार्केटींगमध्ये काम करणारे पूर्ण मार्केटींग प्लॅन लिहून घेत आहेत, काँटेंट रायटर लेख लिहून घेत आहेत, स्पर्धा परिक्षांची तयारीसाठी याची मदत घेत आहेत. तर, अनेक फ्रिलान्सिंग करणाऱ्या व्यक्ती याच्य सहाय्याने चांगली कमाई करत आहेत. यासर्व बाबी लक्षात आल्याने, तसेच अमेरिकेत हे टूल बॅन झाल्यामुळे याची ऑनलाईन ते ऑफलाईन सर्वत्र चर्चा झाली.

चॅट जिपीटी (Chat GPT) या एआय (AI: Artificial Intelligence) चॅट बॉट (Chat bot) काही काळापूर्वीच ओपन एआयमार्फत लाँच करण्यात आले होते. या एआय वेबसाईटला इंटरनेट युजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हे एआय टूल कमी वेळात, विचारलेल्या प्रश्नाचा योग्य भावार्थ समजून, सोप्प्या भाषेत उत्तर देते, म्हणून हे टूल अल्पावधीतच जगप्रसिद्ध झाले.

शिक्षण विभागाची चॅट जिपीटीवर बंदी (Education department bans chat GPT)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर चालणाऱ्या चॅट बॉटवर न्युयॉर्क शहराच्या शिक्षण विभागाने बंदी 
घातली आहे. विभागाने तात्काळ झालेल्या प्रभावाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी चॅट बॉट ब्लॉक केले आहे. खरेतर, चॅट बॉट मुलांच्या आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी चांगले नाही, असे मत शिक्षण मंडळाचे आहे, कारण ते प्रत्येक प्रश्नाची झटपट उत्तरे देत असल्याने मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विभागाचे म्हणणे आहे की हे मुलांना गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये तयार करण्यापासून प्रतिबंधित करते, जे भविष्यासाठी आवश्यक आहे. वास्तविक, ही गोष्ट बर्‍याच अंशी खरी देखील आहे कारण या चॅट बॉटवर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काही सेकंदात कळू शकते. तसेच मुले अभ्यासही त्या चॅट बॉटकडून करून घेतात, सर्व गृहपाठ काही वेळात चॅट बॉटवर होत असल्याने मुले स्वत:च्या मेंदूचा वापर करत नाहीत, त्यांच्यातील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल डेव्हल्प होत नाही, मेहनत घेण्याची सवय लागत नाही, वाचन - चिंतन करण्याची सवय लागत नाही, या सर्व बाबी विचारात घेऊन बंदी घालण्यात आलेली आहे.

चॅट-जीपीटी ह्युमन रिप्लेसमेंट आहे? (Is Chat-GPT a Human Replacement?)

जर तुम्ही ब्लॉगर असाल जो त्याच्या वेबसाइटवर दैनंदिन ब्लॉग लिहित असेल, तर तुम्ही चॅट बॉटला एसइओ फ्रेंडली ब्लॉग लिहायला सांगितल्यास, तो तुम्हाला काही मिनिटांत ब्लॉग लिहून देईल, एवढेच नाही तो ब्लॉग प्लेझरिझम फ्रीदेखील असेल. यामुळे अनेक व्यक्ती काँटेंट रायटींगचे ऑनलाईन फ्रिलान्सिंग काम घेऊन त्याचे पैसे आकारतात. यासह, त्यावरून युपीएससीचा कुठलाही प्रश्न विचारलात तर त्याचेहीही काही सेकंदात उत्तर मिळते. तोच प्रश्न गुगलवर टाकल्यासही, त्याचे झटपट आणि नेमके उत्तर मिळणार नाही. मात्र, हा चॅट बॉट नेमके उत्तर देईल. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे असूनही, त्यावर विविध भाषांमध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे. तथापि, चॅट जिपीटीच्या काही कमतरता आहेत ज्या वेळेनुसार सुधारू शकतात. मात्र सध्या याचा वापर कोट्यावधी व्यक्ती करत आहेत.

चॅट जिपीटीच्या साहय्याने व्यक्ती काँटेंट रायटर, मार्केटींग प्लॅनर, स्क्रिप्ट रायटर, क्वेश्चन सॉल्व्हर आदी कामे करतात. फ्रिलान्सर्स या पद्धतीची कामे घेऊन ती या टुलवरुन पूर्ण करून त्याचे पैसे आकारतात. साधारण यामधून महिन्याला 30 ते 40 हजारांपर्यंत पैसे कामवले जातात.  तसेच काही लघु उद्योजक किंवा ऑन्थ्रोप्रिन्यॉर याच्या वापराने आपला व्यवसाय वाढवत आहेत, याद्वारे ते लेबर कॉस्ट वाचवत आहेत. याचाच अर्थ, हे चॅट बॉट ह्युमन रिप्लेटमेंटप्रमाणे काम करते. ओपन एआयने या चॅट बॉटबद्दल हेच म्हटले होते की हे बॉट ह्युमन रिप्लेसमेंट ठरू शकते. मात्र कम्युटरलाही त्याकाळी ह्युमन रिप्लेसमेंट म्हटले जात होते, मात्र तसे झाले नाही तंत्रज्ञान माणसाप्रमाणे काम करू शकेल पण माणसाप्रमाणे बुद्धी वापरू शकणार नाही. मात्र या बॉटचे भविष्य काय ते काळच ठरवेल.

चॅट जिपीटी कंपनीविषयी (About Chat-GPT Company)

चॅट जिपीटी ओपन एआयने विकसित केले आहे. ओपन एआय ही आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील संशोधन कंपनी आहे, जी एलोन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. पण नंतर एलोन मस्क या कंपनीपासून वेगळे झाले. चॅट जीपीटी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती आणि एका  आठवड्यात 10 लाख ट्रॅफिक दिसले. गुगल, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, नेटफ्लिक्स इत्यादींना एवढा मोठा ट्रॅफिक आणायला महिने लागले.