Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO : सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज म्हणजे काय? देशाबाहेर जाणाऱ्यांसाठी हे का आवश्यक आहे? ते ऑनलाइन कसे मिळवावे?

EPFO

सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज (CoC – Certificate of Coverage) हे असे प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) किंवा विमा पॉलिसी अंतर्गत, कोणत्या गोष्टींसाठी विमा उतरवला जातो आणि कोणत्या गोष्टींसाठी नाही हे सांगितले जाते.

तुम्ही कामासाठी परदेशात जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. वास्तविक, कामासाठी परदेशात जाणाऱ्यांना सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज (CoC – Certificate of Coverage) बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे असे प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) किंवा विमा पॉलिसी अंतर्गत, कोणत्या गोष्टींसाठी विमा उतरवला जातो आणि कोणत्या गोष्टींसाठी नाही हे सांगितले जाते.

इपीएफओकडून मिळवा कव्हरेजचे प्रमाणपत्र

इपीएफओने (EPFO - Employees' Provident Fund Organisation) जारी केलेल्या इंटरनॅशनल वर्कर्सवरील माहितीपत्रकानुसार, सेटलमेंट झालेल्या देशात काम करण्यासाठी जाणारे भारतीय कामगार भारतातील कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीममध्ये (contributory pension scheme) योगदान देत असल्यास EPFO कडून कव्हरेजचे प्रमाणपत्र मिळवू शकतात. सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज अशा कामगारांना त्या देशातील सामाजिक सुरक्षा योगदानाच्या पेमेंटपासून सूट देईल. मात्र, इतर देशांमध्ये, त्या देशाच्या कायद्यानुसार तुम्हाला सामाजिक सुरक्षा निधीमध्ये योगदान द्यावे लागेल.

अशी आहे प्रक्रिया

तुम्ही सर्टिफिकेट ऑफ कव्हरेजसाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO त्यांच्या 'इंटरनॅशनल वर्कर्स पोर्टल' (International Workers Portal) वर सुविधा उपलब्ध करून देते. ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रक्रिया सांगितली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि यामुळे कागदी कामाच्या औपचारिकतेची गरज पडत नाही.

कव्हरेजचे प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवायचे?

  • सर्वप्रथम 'इंटरनॅशनल वर्कर्स पोर्टल' (International Workers Portal) वर जा. 'Application for CoC' निवडा.
  • आता UAN आणि Password ने लॉगिन करा आणि Membar ID निवडा.
  • यानंतर डिटेचमेंटचा तपशील टाका आणि पासपोर्टची स्कॅन कॉपी अपलोड करा.
  • तुमचा अर्ज आयडब्ल्यू पोर्टलवर पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी तुमच्या नियोक्त्याकडे ऑनलाइन जाईल.
  • यानंतर, सत्यापित (Verified) आणि साक्षांकित (Attested) अर्ज संबंधित EPFO च्या प्रादेशिक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो.
  • मंजुरी मिळाल्यानंतर, कर्मचारी 'इंटरनॅशनल वर्कर्स पोर्टल'वरून त्याचा CoC डाउनलोड करू शकतो.