CCB Scholarship: नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून आपल्या आवडत्या कोर्सला अॅडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना हव्या त्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही. अशा वेळी कम्बाइन्ड कौउन्सलिंग बोर्डची (CCB) स्कॉलरशीप मदतीला येऊ शकते. या स्कॉलरशीपद्वारे विद्यार्थ्यांना विविध कोर्सेससाठी 60 हजार ते 2,50,000 रुपयापर्यंत स्कॉलरशीप मिळू शकते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
कम्बाइन्ड कौउन्सलिंग बोर्ड काय आहे?
कम्बाइन्ड कौउन्सलिंग बोर्ड हे एक नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या ट्रस्टद्वारे विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि मार्गदर्शन पुरवले जाते. (How to apply for CCB scholarship) देशभरातील 200 पेक्षा जास्त सरकारी कॉलेजच्या 85 हून अधिक कोर्ससला प्रवेश घेतल्यास अडीच लाखापर्यंत स्कॉलरशीप मिळू शकते. अनेक राज्यातील सरकारी विद्यापीठांसोबत मिळून CCB काम करते.
कोणत्या कोर्ससाठी स्कॉलरशीप मिळू शकते?
विद्यार्थ्याला दहावी-बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशीप मिळते. यामध्ये फार्मसी, पॅरा मेडिकल कोर्सस, कृषी, डिप्लोमा, अभियांत्रिकी, कॉम्प्युटर कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, आर्ट, कॉमर्स शाखेतील विविध कोर्ससचा समावेश आहे. कोर्सची यादी येथे चेक करा.
तुम्ही CCB च्या संकेतस्थळावर जाऊन कोर्ससची माहिती पाहू शकतो. (How to apply for CCB scholarship) काही दूरशिक्षण (डिस्टंस लर्निंग) कोर्सेससाठीही स्कॉलरशीप मिळते. तुम्हाला आवडता अभ्यासक्रम निवडून ऑनलाइन स्कॉलरशीप फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरताना राज्य सिलेक्ट करावे लागते. नाव, मोबाइल नंबर, कोर्सचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, शिक्षण अशी बेसिक माहिती भरावी लागते. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
कौऊंन्सलिंग राऊंड
ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर CCB कडून विद्यार्थ्याशी संपर्क साधला जातो. कौउन्सलिंग या पुढील टप्प्यासाठी विद्यार्थ्याला बोलावले जाते. मेसेज, मेलद्वारे सहसा संपर्क साधण्यात येतो. तसेच पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाते.
विद्यार्थ्याने निवडलेला कोर्स, कॉलेज, पुढील प्रक्रिया, निवडलेल्या कोर्समधील करिअरच्या संधीबाबत समुपदेशन केले जाते. (What is CCB scholarship) यावेळी विद्यार्थी कोर्स बदलूही शकतो. या स्कॉलरशीपद्वारे विद्यार्थ्याला फक्त शैक्षणिक शुल्कासाठी आर्थिक मदत केली जाते. हॉस्टेल आणि इतर खर्चासाठी मदत मिळत नाही.
अॅडमिशन प्रक्रिया
कौउन्सलिंग राऊंड झाल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे अॅडमिशन प्रक्रिया. विद्यार्थ्याची जागा कॉलेजमध्ये आरक्षित केली जाते. 10% जागा CCB साठी कॉलेजमध्ये आरक्षित असतात. ही अॅडमिशन CCB स्कॉलरशीपद्वारे केली जातात. स्कॉलरशीपची रक्कम CCB स्वत: कॉलेजमध्ये जमा करते. किंवा विद्यार्थी चेक द्वारे पैसे कॉलेजमध्ये स्वत: जमा करू शकतो. अॅडमिशन घेताना होस्टेल, आणि मेसचे पहिल्या एक किंवा दोन महिन्याचे पैसे भरून होस्टेलमध्ये जागा आरक्षित करता येईल.