Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bitcoin Dominance : बिटकॉईन डॉमिनन्स म्हणजे काय?

Bitcoin Dominance

Bitcoin Dominance : बिटकॉईन डॉमिनन्सचा वापर क्रिप्टो मार्केटमध्ये चांगल्या आणि स्ट्रॉंग ट्रेण्डची निवड करण्यासाठी तसेच इतर ट्रेण्डसवर मात करण्यासाठी सुद्धा होतो.

क्रिप्टोकरन्सी म्हटले की पहिले आठवते ते बिटकॉईन (Bitcoin). क्रिप्टोकरन्सी या संकल्पनेची सुरुवातच बिटकॉईनमुळे झाल्याने क्रिप्टोकरन्सीच्या नावाला बिटकॉईनचे नाव अगदी घट्ट चिकटले आहे. सर्वात जास्त बाजार भांडवल असणारे बिटकॉईन 2009 पासून मार्केटमध्ये आहे. शून्यातून सुरु झालेल्या या बिटकॉईनने जवळजवळ 70 हजार डॉलर्सचा आकडा काही वर्षात पार केला होता. बिटकॉईन हे नाव क्रिप्टो मार्केटमध्ये खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे. या कॉईनचा क्रिप्टोमार्केटमध्ये दबदबा आहे. जेव्हा बिटकॉईनची किंमत घसरते तेव्हा संपूर्ण मार्केटवर त्याचा परिणाम दिसून येतो. यावरून बिटकॉईनचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल. 

बिटकॉईनचा क्रिप्टोमार्केटमध्ये असलेल्या याच दबदब्यामुळे इतर क्रिप्टो कॉईन्स वर चांगला किंवा वाईट परिणाम होताना दिसतो. बिटकॉईनच्या याच डॉमिनन्सचा बरोबर उपयोग केला तर त्याचा एक ट्रेडिंग टूल प्रमाणे वापर होऊ शकतो. आज आपण बिटकॉईन डॉमिनन्स म्हणजे काय? आणि ट्रेडिंग करताना त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे पाहणार आहोत.


बिटकॉईन डॉमिनन्स म्हणजे काय? What is Bitcoin Dominance?

बिटकॉईन डॉमिनन्स हा बिटकॉईन आणि बिटकॉईन व्यतिरिक्त मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व क्रिप्टोकरन्सीजच्या बाजार भांडवलीकरणाचे प्रमाण (Ratio) आहे. या प्रमाणाचा (रेशोचा) वापर ट्रेडिंगमध्ये प्रामुख्याने केला जातो. या बिटकॉईन डॉमिनन्समुळे म्हणजेच रेशोमुळे इतर क्रिप्टोकरन्सींच्या तुलनेत बिटकॉईनच्या मूल्याची जाणीव होते आणि त्यामुळे इतर निर्णय घेणे शक्य होते. बिटकॉईन डॉमिनन्स रेशो काढण्यासाठी बिटकॉईनच्या बाजार भांडवलीकरणाला क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील इतर क्रिप्टोकरन्सीच्या भांडवलासोबत भागले जाते. 

बिटकॉईन डॉमिनन्स      =  बिटकॉईन मार्केट कॅप / क्रिप्टोकरन्सीज मार्केट कॅप
(Bitcoin Dominance)  =  (Bitcoin Market Cap) / (Cryptocurrency Market Cap)

उदाहरणार्थ जर बिटकॉईनचे बाजारातील भांडवल 55 मिलियन डॉलर्स आहे आणि एकूण क्रिप्टोकरन्सी मार्केटचे भांडवल 100 मिलियन डॉलर्स असेल तर बिटकॉईन डॉमिनन्स हा 55 टक्के आहे, असे मानले जाते.

ट्रेडिंगमध्ये बिटकॉईन डॉमिनन्स कसे वापरतात?

बिटकॉईन डॉमिनन्सचा वापर ट्रेडिंग करताना अनेक प्रकारे होऊ शकतो. क्रिप्टोकरन्सीमध्ये साधारणतः दोन भाग असतात एक बिटकॉईन (Bitcoin) आणि दुसरा ऑल्टकॉइन (Altcoin). बिटकॉईन डॉमिनन्सचा वापर या दोन्हीमधील चांगल्या ट्रेण्डची निवड करण्यासाठी आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये वापर केला जातो. बिटकॉईन डॉमिनन्सचा वापर बिटकॉईन आणि ऑल्टकॉईनमधील चांगल्या आणि स्ट्रॉंग ट्रेण्डची निवड करण्यासाठी केला जातो. बिटकॉईन डॉमिनन्सचा वापर इतर ट्रेण्डसवर मात करण्यासाठी सुद्धा होतो.

क्रिप्टोकरन्सी मार्केट हे प्रचंड अस्थिर व अत्यंत किचकट मार्केट समजले जाते. त्यामुळे क्रिप्टोमार्केटमध्ये ट्रेडिंग करताना एक किंवा दोन इंडिकेटर्सवर विश्वास ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. बिटकॉईन डॉमिनन्स या इंडिकेटरचा वापर ट्रेण्ड ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो.