Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Utilization Ratio म्हणजे काय? जाणून घ्या क्रेडिट स्कोअरवर काय होतो परिणाम

Credit Utilization Ratio म्हणजे काय? जाणून घ्या क्रेडिट स्कोअरवर काय होतो परिणाम

Image Source : www.experian.com

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तुम्हाला त्याचे जास्त फायदे घेता येतात. याचा फायदा तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी देखील करता येतो. मात्र, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक हा तुमचा CUR आहे. वित्तीय जाणकारांच्या मते तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा 30% पर्यंत असावा. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही.

आर्थिक व्यवहार करत असताना अनेक शब्द आपल्या वापरात किंवा ऐकण्यात येतात. मात्र, त्याचा नेमका अर्थ बहुतांश जणांना माहिती नसतो. यामध्ये क्रेडिट स्कोअरबाबत अनेकांना माहिती असते. त्याच प्रमाणे क्रेडिट युटिलायझेशन रेशो (credit utilization ratio- CUR) हा शब्द अनेकांच्या ऐकण्यात आला असेल.. विशेषत: क्रेडिट कार्ड वापर करणाऱ्यांशी याचा वारंवार संबध येतो. आज आपण क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे काय?

तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार तुम्हाला कर्जाची रक्कम ठरवली जाते. त्याच्याच आधारावर तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट देखील ठरवले जाते. त्याच प्रमाणे एका महिन्यात तुमच्या क्रेडिट कार्डवर दिलेल्या लिमिटचा किती वापर केला जातो याचे प्रमाण निश्चित करणारी टक्केवारी म्हणजे तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) होय. क्रेडिट युटिलायझेशन रेशो तुमच्या क्रेडिट वापराची स्थिती दर्शवते आणि याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. क्रेडिट कार्डचा जितका वापर अधिक तितकाच क्रेडिट रेशो देखील अधिक वाढतो.

रेशो किती असावा?

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तुम्हाला त्याचे जास्त फायदे घेता येतात. याचा फायदा तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी देखील करता येतो. मात्र, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक हा तुमचा CUR आहे.  वित्तीय जाणकारांच्या मते तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा 30% पर्यंत असावा. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही. रेशो 30 % पेक्षा जास्त असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.

क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो?

तुमचा क्रेडिट कार्डचा वापर हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतो. कारण तुमच्या क्रेडिटचा तुमचा मर्यादित वापर केला तरच तुमचा क्रेडिट रेशा हा कमी राहण्यास मदत होते. मात्र, तुम्ही क्रेडिटच्या मर्यादा ओलांडली किंवा कर्जाची परतफेड व्यवस्थित नाही केल्यास तुमचा क्रेडिट रेशो हा 30% पेक्षा जास्त होतो. परिणामी तुम्ही 30% रेशोची मर्यादा ओलांडल्यास त्याचा थेट  परिणाम क्रेडिट स्कोअर कमी होण्यावर होतो. त्यामुळेच वित्तीय संस्था क्रेडिट स्कोअर प्रमाणेच तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो देखील तपासत असतात. एक प्रकारे क्रेडिट युटिलायझेशन रेशो तुमची खर्च करण्याची मर्यादा आणि परतफेडीची क्षमता सिद्ध करते. त्यामुळेच जर तुमचा CUR जास्त वाढत गेला तर ते तुमचा credit scores कमी होण्यास  कारणीभूत ठरू शकते.