Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI payment: UPI द्वारे केलेले पेमेंट जर दुसऱ्याच्या खात्यात गेले तर काय करावे?

UPI payment

UPI payment: UPI पेमेंट आता खूप सामान्य झाले आहे. मात्र, यात चूक झाली तर मोठा गोंधळ होतो. जर चुकीच्या खात्यात पैसे भरले गेले असतील तर पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेच पैसे परत मिळवण्यासाठी काय करू शकाल? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

UPI payment: UPI पेमेंट आता खूप सामान्य झाले आहे. मात्र, यात चूक झाली तर मोठा गोंधळ होतो. जर चुकीच्या खात्यात पैसे भरले गेले असतील तर पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. अनेक लोकांसोबत असे घडते की,  UPI पेमेंट चुकीच्या खात्यात जाते आणि काही लोक ते मान्य सुद्धा करीत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की चुकून दुसऱ्या खात्यात गेलेले पैसे परत मिळतात का? तर हो  काही बाबींचा अवलंब करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. अशी परिस्थिती तुमच्यावर कधी आली तर तुम्ही काय करावे आणि तुम्हाला कुठे तक्रार करावी लागेल आणि त्याची प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊया.

तुम्ही चुकून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवले तर (Sent money to another account by mistake)

शक्य तितक्या लवकर आपल्या बँकेशी संपर्क करणे हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. उशीर न करता, कस्टमर केअर नंबरवर (Customer Care Number) कॉल करा. बँक तुम्हाला यासंबंधीची सर्व माहिती ईमेलवर विचारू शकते. ईमेलमध्ये सर्व पुरावे जोडताना, व्यवहार क्रमांक, रक्कम (transaction number, amount) कोणत्या खात्यातून पैसे कापले गेले, कोणत्या खात्यात पैसे चुकून ट्रान्सफर झाले, व्यवहाराची तारीख आणि वेळ (Date and time of transaction) इत्यादी सर्व माहिती सांगावी लागेल. तुम्ही जितके अधिक डिटेल्स  द्याल तितके चांगले. अकाऊंट स्टेटमेंट आणि स्क्रिनशॉटही  (Account statement and screenshot) एकत्र देऊ शकतात.

तुमचे पैसे किती दिवसात परत मिळू शकतात? (How many days can you get your money back?)

ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्स्फर झाले असतील, ते जर तुमच्याच शाखेतील असेल तर कदाचित काहीशी सोय होऊ शकते. तुमच्या विनंतीवर बँक संबंधित खातेदाराशी संपर्क साधेल आणि समोरच्या व्यक्तीने सहमती दर्शवल्यास तुम्हाला तुमचे पैसे सात दिवसांत परत मिळू शकतात. जर प्रकरण दुसर्‍या शाखेशी संबंधित असेल तर तुम्हाला त्या शाखेत जाऊन स्वतः मॅनेजरशी बोलावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेला दोन महिने लागू शकतात.

बँक जबाबदारी घेत नाही (Bank does not take responsibility)

तुमच्या चुकीच्या पेमेंटसाठी बँकेची कोणतीही जबाबदारी (Responsibility) नाही, त्यामुळे बँक पैसे परत करण्याची हमी देत ​​नाही. सर्व काही आपल्या कृतीवर अवलंबून असेल. तुम्ही न्यायालयाकडून नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई (legal action)देखील करू शकता, परंतु यासाठी बँका दोषी नाहीत, असे रिझर्व्ह बँकेचे नियम सांगतात. कारण तुम्ही स्वतः सर्व माहिती भरता, त्यामुळे सर्व जबाबदारीही तुमचीच असते. IFSC कोडवरून पेमेंट केल्यावर, अनेक बँका थोडी थोडी रक्कम घेऊन जोखीम संरक्षण देतात. तुम्ही पैसे पाठवण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकता, दुसरा मार्ग खूप सोपा आहे. आधी एक रुपया पाठवा, चेक करा आणि नंतरच पूर्ण पेमेंट करा.