Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग म्हणजे काय?

What is Rupee Cost Averaging in SIP

What is Rupee Cost Averaging: म्युच्युअल फंडमध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग याचा साधासरळ अर्थ म्हणजे, वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूकदाराने दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा फायदा होय.

म्यु्च्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये म्युच्युअल फंडमधील एसआयपी (Systematic Investment Plan-SIP) या पद्धतीला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. तसे पाहायला गेले तर एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. पण यातील सर्वांत महत्त्वाचा आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देणारा घटक आहे; तो म्हणजे रुपी कॉस्ट एव्हरजिंग (Rupee Cost Averaging). या रुपी कॉस्ट एव्हरजिंगमुळे गुंतवणूकदाराला दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते.

रुपी कॉस्ट एव्हरजिंग म्हणजे काय?

म्युच्युअल फंडमध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग याचा साधासरळ अर्थ म्हणजे, वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूकदाराने दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा फायदा होय.

रुपी कॉस्ट एव्हरजिंगचा परिणाम मार्केटमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात अस्थिरता असते. तेव्हा दिसून येतो. जसे की, शेअर मार्केटमध्ये काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात घसरण होते. तेव्हा अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळतात. तेव्हा त्याचा परिणाम म्युच्युअल फंडवरही होतो. तेव्हा म्युच्युअल फंडची एनएव्ही (Net Asset Value - NAV) खाली येते. अशाचप्रकारे जेव्हा मार्केटमध्ये जोरदार खरेदी होते किंवा मार्केट तेजीमध्ये असते. तेव्हा म्युच्युअल फंडची एनएव्ही वाढते. त्याची किंमत वाढते. अशाप्रकारे जेव्हा मार्केटमध्ये घसरण होते. तेव्हा एनएव्ही कमी होतो. अशाप्रकारे एनएव्ही कमी किंवा वाढल्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराच्या युनिट्समध्येही चढ आणि उतार होत असतात.


उदाहरणार्थ एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आहे. त्याने गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडची एनएव्ही 100 रुपये आहे आणि त्याबदल्यात त्याला 100 युनिट्स मिळाले. तसेच पुढील महिन्यातही एनएव्हीची किंमत तेवढीच राहिली आणि पुन्हा त्याला 100 युनिट्स मिळाले. पण त्याच्या पुढील महिन्यात मात्र मार्केटमध्ये घसरण झाल्यामुळे एनएव्ही 100 रुपयांवरून 90 रुपयांवर येतो. तेव्हा त्या गुंतवणूकदाराला 111.11 युनिट्स मिळतात. त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या महिन्यात एनएव्ही 90 रुपयांवरून 110 रुपये होतो. तेव्हा गुंतवणूकदाराला 90.9 युनिट्स मिळतात. त्याच्या पुढच्या महिन्यात मार्केट आणखी खाली आल्याने एनएव्ही 110 रुपयांवरून 98 रुपये होतो. त्या बदल्यात गुंतवणूकदाराला 102 युनिट्स मिळतात. तसेच त्याच्या पुढच्या महिन्यात एनएव्ही पुन्हा 100 रुपयांवर येतो आणि त्या बदल्यात गुंतवणूकदाराला 100 युनिट्स मिळतात. अशाप्रकारे त्या गुंतवणूकदाराने सलग सहा महिन्यात 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीच्या बदल्यात त्याला म्युच्युअल फंड एकूण 604.01 युनिट्स मिळाले आणि त्याच्या एनएव्हीची एव्हरेजिंग कॉस्ट 598 रुपये झाली. म्हणजे या सहा महिन्यात गुंतवणूकदाराने केलेल्या 60 हजारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 60,401 रुपये झाले. यावरून हे स्पष्ट होते की, एकत्रित गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीमधून केलेल्या गुंतवणुकीवर रुपी कॉस्ट एव्हरजिंगद्वारे चांगला परतावा मिळू शकतो.

अशाप्रकारे एसआयपीमधील रुपी कॉस्ट एव्हरजिंग (Rupee Cost Averaging) ही गुंतवणुकीची एक लोकप्रिय आणि चांगला परतावा मिळवून देणारी पद्धत म्हणून ओळखली जाते.