Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pan Card: पॅनकार्ड माहितीच्या आधारे तुमच्या नावाने कोणी कर्ज घेतले आहे का? कसे तपासावे

Pan Card

Pan Card: आधुनिक काळात सर्व महत्वाची कागदपत्रे मोबाईलमध्ये उपलब्ध असतात. यामुळे ओळखपत्र व इतर कागदपत्रांवरील माहितीच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. ही कागदपत्रे मिळवून विशिष्ट लोक गैरव्यवहार करत आहेत. याचप्रकारे पॅनकार्ड किंवा त्यासंदर्भातील माहिती मिळवून लोक पॅनकार्डधारकाच्या नावाने कर्ज घेत असतात. यामुळे पॅनकार्डधारकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

आधुनिक काळात सर्व महत्वाची कागदपत्रे मोबाईलमध्ये उपलब्ध असतात. यामुळे ओळखपत्र व इतर कागदपत्रांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे ही कागदपत्रे मिळवून लोक अनेकप्रकारचे गैरव्यवहार करत असतात. याचप्रकारे पॅनकार्ड किंवा त्यासंदर्भातील माहिती मिळवून लोक पॅनकार्डधारकाच्या नावाने कर्ज घेतात. यामुळे पॅनकार्ड धारकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुमच्या पॅनकार्डवरील माहितीच्या आधारे जर कोणी कर्ज घेतले असेल तर याची खालीलप्रकारे तुम्ही तपासणी करू शकता.

पॅनकार्डधारकाची फसवणूक कशी होऊ शकते?

ऑनलाइन कर्ज देणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, जे सुरक्षिततेशिवाय त्वरित आणि अल्प-मुदतीचे कर्ज देतात. भारताचा ‘Bull Dhani’ हे त्यापैकीच एक अॅप आहे. या प्रकारच्या अॅप्सद्वारे फक्त पॅन कार्ड नंबर किंवा पॅन कार्डची फोटोकॉपी देऊन झटपट कर्ज दिले जाते. कर्ज देताना एखाद्या व्यक्तीची ओळख जाणून घेण्यासाठी कोणतीही तपशीलवार पडताळणी केली जात नाही. त्यामुळे इतर कोणी तुमच्या पॅनकार्डची माहिती देऊन कर्ज घेऊ शकते.

फसवणूक करणारा तुमच्या पॅनकार्डची माहिती कशी मिळवतो?

पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे, आपण अनेकदा पॅनकार्डची फोटोकॉपी विविध ठिकाणी (जाणून किंवा नकळत) शेअर करतो. अशा प्रकारे शेअर केलेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. काही उदाहरणे आहेत जिथे तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर/फोटोकॉपी/ सॉफ्टकॉपी शेअर केली असेल ज्याचा गैरवापर होऊ शकतो.

  • तत्काळ रेल्वे बुकिंग करताना तुम्ही तुमचे पॅन कार्ड तपशील म्हणून देता. तुम्ही तुमचा आधार आणि पॅन तुमच्या IRCTC खात्याशी लिंक केला असेल तर येथे दिलेल्या तपशीलांचा चोरी करण्यासाठी गैरवापर केला जाऊ शकतो.
  • मोबाईल प्री-पेड कनेक्शन घेताना पॅन कार्डचे तपशील देखील तुमच्याद्वारे दिले जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये या अर्जांवर प्रक्रिया थर्ड पार्टी एजंटद्वारे केली जाते. एजंट किंवा या एजन्सींच्या असुरक्षित सर्व्हरकडून माहिती लिक होण्याची दाट शक्यता असते.
  • जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय करत असाल आणि Facebook द्वारे पेमेंट स्वीकारत असाल तर तुम्ही तुमच्या Facebook प्रोफाईलमध्ये पॅनकार्ड नंबर असतो.काहीवेळा तुम्ही तुमचा पॅन कार्ड फोटो एजंट/अज्ञात व्यक्तीसोबत विविध आर्थिक गरजांसाठी शेअर करता.
  • तुम्ही ट्रॅव्हल बुकिंगसाठी ट्रॅव्हल एजंटला तुमचा पॅन दिला असेल किंवा तुम्ही ऑनलाइन पोर्टलवर ट्रॅव्हल बुकिंगसाठी पॅनकार्ड देत असाल तर सावध राहा, तुमच्या पॅनकार्डवरील माहितीची चोरी होऊ शकते.

तुमच्या वतीने कोणी कर्ज घेतले आहे की नाही हे कसे तपासायचे?

तुमच्या वतीने एखाद्याने कर्ज घेतले आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट माहिती अहवाल / क्रेडिट स्कोअर अहवाल तपासावा लागेल. याव्यतिरिक्त, तुम्ही आयकर विभागाने जारी केलेल्या फॉर्म 26AS मध्ये तुमच्या पॅन माहितीच्या आधारे झालेल्या व्यवहाराचा तपशील देखील शोधू शकता. वर्षभरापूर्वी अभिनेता राजकुमार राव याच्या नावाने पॅनकार्ड माहितीचा गैरवापर करून 2500 रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. याचा राजकुमारच्या सिबिल स्कोअरवर परिणाम झाला होता. त्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.  

www.moneyexce.com