Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एका डॉलरमध्ये कोणत्या क्रिप्टोकरन्सी मिळू शकतात?

crypto cryptocurrency

सध्या क्रिप्टो मार्केट (Crypto Market) घसरत आहे. या घसरत्या मार्केटमध्ये किमान एका डॉलरमध्ये कोणत्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) विकत घेता येतील, हे आपण जाणून घेणार आहोत.

मार्केटमध्ये आज जवळजवळ 20 हजार क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) उपलब्ध आहेत. यातील अनेक क्रिप्टो 1 डॉलरपर्यंत घसरल्या आहेत. अशा अस्थिर आणि पडत्या मार्केटमध्ये एका डॉलरमध्ये कोणत्या क्रिप्टोकरन्सी तुम्ही विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया, 5 सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी ज्या तुम्ही एका डॉलरमध्ये विकत घेऊ शकता.

कार्डानो (Cardano - ADA) 

2017 रोजी तयार करण्यात आलेली ही क्रिप्टोकरन्सी पियर-रीव्हीव्यूड (Peer-Reviewed ) ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने ही करन्सी सुरक्षित आहे. चार्ल्स हॉस्किन्सन (Charles Hoskinson) यांचे नेतृत्व आणि मोठ्या प्रमाणातील विकेंद्रीकरणामुळे या करन्सीने गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवला आहे. कार्डानोचे बाजारातील भांडवल 17 बिलियन डॉलर्स एवढे आहे. कार्डानोची आजची किंमत 0.48 डॉलर म्हणजेच 38.08 रुपये एवढी आहे.

रिप्पल (Ripple - XRP) 

2014 मध्ये तयार करण्यात आलेल्या रिप्पल कॉईनचा मुख्य उद्देश जागतिक बँकिंग व्यवस्थेस भेदणे हा आहे. 2018 मध्ये क्रिप्टोकरन्सी मार्केटने या कॉईनचे महत्त्व ओळखून याची किंमत थेट 3.50 डॉलर्सवर गेली. परंतु सेक (SEC - Securities and Exchange Commission ) द्वारे दाखल केलेल्या खटल्यामुळे रिप्पल कॉईनची किंमत घसरून 1 डॉलरच्या आसपास आली. आजही हा खटला सुरू आहे. त्यामुळे रिप्पल कॉईनची किंमत 1 डॉलरपेक्षा कमी झाली आहे. रिप्पल कॉईनचे बाजारातील भांडवल 16 बिलियन डॉलर्स एवढे आहे. रिप्पल कॉईनची आजची किंमत 0.37 डॉलर म्हणजेच 30.26 रुपये एवढी आहे.

डॉजकॉईन (Dogecoin - DOGE) 

डॉजकॉईन ही सर्वात महत्त्वाची आणि जगप्रसिद्ध मिमकॉईन (Meme coin) आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांसारख्या मोठ्या उद्योजकांचे समर्थन असणाऱ्या डॉजकॉईनने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित केला आहे. डॉजकॉईनचे बाजारातील भांडवल 9 बिलियन डॉलर्स एवढे आहे. डॉजकॉईनची आजची किंमत 0.071 डॉलर म्हणजेच 5.56 रुपये आहे.

बेसिक अटेंशन टोकन (Basic Attention Token -  BAT) 

बेसिक अटेंशन टोकन हे एक टोकन इकॉनॉमी क्रिप्टोकरन्सी (token economy cryptocurrency) आहे. जी ब्रेव्ह सॉफ्टवेअरद्वारे (Brave Software) तयार करण्यात आली आहे. 2017 रोजी तयार करण्यात आलेल्या या क्रिप्टोकरन्सीचे 50 कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. बेसिक अटेंशन टोकनचे बाजार भांडवल 591 मिलियन डॉलर्स एवढे आहे. बेसिक अटेंशन टोकनची सध्याची किंमत 0.42 डॉलर म्हणजे 30.81 रुपये एवढी आहे.

स्टेल्लर लुमेन्स (Stellar Lumens - XLM) 

मुक्त स्तोत्र व मोठ्या प्रमाणात विकेंद्रित असलेल्या या नेटवर्कचे उद्दिष्ट जागतिक वित्त व्यवस्थेत क्रांती आणणे हा आहे. स्टेल्लर लुमेन्सचे बाजारातील भांडवल 2 बिलियन डॉलर्स एवढे आहे. तर स्टेल्लर लुमेन्सची किंमत 0.13 डॉलर म्हणजे 9.39 रूपये एवढी आहे.

सध्या क्रिप्टो मार्केट मोठ्या प्रमाणात घसरत आहे. सर्वच कॉईन्सची किंमत कमी झाली आहे. वर दिलेले कॉईन्स भविष्यात फायदेशीर ठरू शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर ही चलनं भविष्यात फायदेशीर ठरतीलच याची हमी कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी स्व:अभ्यास करणे आवश्यक आणि भावनिक न होता गुंतवणूक करणे गरजेचे आहे.