Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Scholarship Scheme : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभ मिळतात? जाणून घ्या

Post-Matric Scholarship Scheme

Image Source : www.studyingram.com

Post-Matric Scholarship Scheme : इतर मागास वर्ग, भटके विमुक्त जाती व जमाती, आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) 2003 पासून लागू करण्यात आली. याबाब अधिक माहिती जाणून घेऊया.

Post-Matric Scholarship Scheme : इतर मागास वर्ग, भटके विमुक्त जाती व जमाती, आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) 2003 पासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविले जातात.

योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क (Tution Fee), परीक्षा शुल्क (Exam Fee) आणि देखभाल भत्ता (Maintenance Allowance) यांचा लाभ फक्त इतर मागास वर्ग (OBC), भटके विमुक्त जाती व जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. 

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे फायदे 

शासकीय,अनुदानित,विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा 50 टक्के लाभ मिळतो. शासकीय, अनुदानित संस्थेतून व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा 100 टक्के लाभ देण्यात येईल.

खाजगी, विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा 50 टक्के परतावा आणि देखभाल भत्त्याचा 100 टक्के लाभ देण्यात येईल. शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्क रक्कमेच्या फक्त एक तृतीयांश रक्कमेचा परतावा प्राप्त होईल. खाजगी विना-अनुदानित संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय अनुदानित संस्थेतील शुल्क संरचनेवर आधारित शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.

अर्जदार विशिष्ट व्यावसायिक, बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असेल, आणि त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्याच शैक्षणिक वर्षात काही कारणास्तव विद्यार्थ्याने वर्तमान व्यावसायिक, बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून घेतल्यास, त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. बी.एड आणि डी.एड अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 100 टक्के लाभ देण्यात येईल. शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता इत्यादी.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता

  • पालकांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • अर्जदार हा इतर मागासवर्गीय श्रेणीतील असावा.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांनी शालान्त पूर्व श्रेणीमध्ये शासनाकडून मंजूर केलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा पाठपुरावा केला पाहिजे.
  • जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल. 
  • परंतु पुढील उच्च श्रेणीत त्याला बढती मिळत नाही. तोपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
  • केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंडच्या (Cap Round) माध्यमातून येणे आवश्यक आहे.
  • एकाच पालकाची जास्तीत जास्त 2 मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
  • शिष्यवृत्ती, वेतनरोख स्विकारल्यास या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

कोणत्या परिस्थितीत शिष्यवृत्ती मिळणार नाही? 

अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केले आणि नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यानंतर, एम.ए. अभ्यासक्रमासाठी अर्जदाराला शिष्यवृत्तीसाठी परवानगी दिली जाणार नाही. पण बी.एड. नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश केल्यानंतर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. विशेष व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

  • जात प्रमाणपत्र 
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका 
  • पालक नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड 

अर्ज कुठे करायचा? 

या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला आपले सरकार महाडीबीटीच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्या वेबसाइटवरील पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

Source : obcadhikarikarmacharisangh.com