TDS Required For ITR Filing: साधारणपणे, कंपन्या जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करतात. याचा अर्थ ज्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 प्राप्त झाला आहे ते इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) भरू शकतात. फॉर्म 16, फॉर्म 16A आणि फॉर्म 16B ही सर्व विविध स्त्रोतांवरील उत्पन्नावर कर कपात (टीडीएस) प्रमाणपत्रे आहेत. तेव्हा आयटीआर भरताना लागणारी कर कपात प्रमाणपत्रे म्हणजेच टीडीएसचे प्रकार किती? आणि त्यांचा उपयोग काय? हे सविस्तर जाणून घेऊया.
ज्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 प्राप्त झाला आहे, ते इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात . फॉर्म 16, फॉर्म 16A आणि फॉर्म 16B ही सर्व विविध स्त्रोतांवरील उत्पन्नावर कर कपात (TDS) प्रमाणपत्रे आहेत. टीडीएस म्हणजे Tax Deducted at Source (स्रोतावर होणारी कर कपात).
Table of contents [Show]
वेतन प्रमाणपत्र (TDS)
टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स च्या प्रमाणपत्राला 'वेतन प्रमाणपत्र' असेही म्हणतात. कंपन्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र देतात. त्यात कंपनीने आर्थिक वर्षात कर कपात केलेल्या (टीडीएस) तपशीलांचा समावेश असतो. कंपनी प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याला पगार देते. जर कर्मचार्याचे एकूण उत्पन्न करपात्र असेल, तर कंपनी त्याचा कर कॅल्क्युलेट करतो आणि दर महिन्याला तो कापून घेतल्यानंतर कर्मचार्याला पगार देतो. पगार हाच इनकम सोर्स असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म 16 हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
फॉर्म 16 मध्ये अनेक प्रकारची माहिती असते. यामध्ये PAN, TAN आणि कंपनीचे नाव आणि पत्ता यांचा समावेश असतो. तसेच यामध्ये कर्मचाऱ्याचा पॅन नंबर, नाव आणि पत्ता समाविष्ट असतो. त्यात टीडीएसच्या रकमेचा तपशील आणि तो सरकारकडे जमा केल्याचा तपशीलही असतो.
फॉर्म 16 म्हणजे काय?
पगारदार कर्मचारी ज्यांना मासिक पगार मिळतो, अशा व्यक्तींसाठी फॉर्म 16 हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. या फॉर्ममध्ये कर कपातीबाबतची माहिती, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मासिक पगार आणि वार्षिक उत्पन्न, टॅक्स डिडक्टेड सोर्स यासारखी माहिती असते. ज्या कर्मचाऱ्याच्या पगारातून टॅक्स कापण्यात आला आहे,अशा प्रत्येक कामगाराला फॉर्म 16 देण्याची कंपनीची जबाबदारी असते.
फॉर्म 16A म्हणजे काय?
फॉर्म 16A हा वेतनाव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर लागू होणाऱ्या करावर लागू होतो. जसे की, तुम्ही मुदत ठेवींवरील व्याजाच्या रकमेवर बँक कर कपात करू शकते. त्याचप्रमाणे, भाडे, विमा कमिशन यांसारख्या इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्त्रोतावर कर कपात करण्यासाठी फॉर्म 16A जारी केला जातो. त्यात कर्मचाऱ्याचे नाव आणि पत्ता असतो. त्यात पॅन आहे. कर कपात आणि जमा केल्याचा तपशील आहे.
फॉर्म 16B म्हणजे काय?
फॉर्म 16B हे एक प्रमाणपत्र आहे, जे रिअल इस्टेटच्या विक्रीवर कर कपात (TDS) दर्शवते. त्यात नमूद असते की, खरेदीदाराची टीडीएस रक्कम आयकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. स्थावर मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीने विक्रेत्याला दिलेल्या रकमेच्या 1% TDS कापून घेणे आवश्यक आहे. आयकर विभागाकडे 1% रक्कम जमा करणे आणि विक्रेत्याला फॉर्म 16B प्रदान करणे ही खरेदी करणाऱ्याची जबाबदारी आहे.