Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lottery Fraud चे प्रकार कोणते आणि तो कसा होतो?

Lottery Fraud

Lottery Fraud : फसवणूक करणाऱ्या व्यक्ती नेहमी आपली वैयक्तीक किंवा आर्थिक माहिती (Personal & Financial Information) विचारतात. प्रत्यक्षात खऱ्या Lottery विजेत्याकडून कधीही आर्थिक माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशा लोकां पासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Lottery Fraud मध्ये साधारणत: Fraud करणारी व्यक्ती टोकन अमाऊंट किंवा बॅंक खाते कन्फर्म करण्याच्या नावाने ई-मेलद्वारे पैसे Transfer करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतात. बहुतेकवेळा ज्यांच्यासोबत असे Fraud होतात. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरूवातील त्यांच्या खात्यात काही रक्कम ट्रान्सफर केली जाते. जेणेकरून त्यांचा या लॉटरी प्रकरणावर विश्वास बसतो. एकदा का विश्वास बसला की, खातेधारक संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी आपले बॅंक डिटेल्स आणि इतर गोपनीय माहिती शेअर करतात. याचाच फायदा घेत ते त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेतात आणि नंतर गायब होतात.

लॉटरी फ्रॉड किंवा ई-मेलद्वारे लोकांची फसवणूक होते कशी?

• ई-मेलद्वारे मॅसेज पाठवला जातो की, तुम्ही लाखो डॉलर्सची lottery जिंकली; 
• परदेशातून पैसे भारतीय चलनात Transfer करण्यासाठी मदत हवी आहे;
• काही प्रकरणांमध्ये, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने ई-मेल पाठवून पैशांची मदत मागितले जाते;

स्पॅम ई-मेलद्वारे पैशांची मागणी!

बहुतेकवेळा फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती सरसकट सर्वांना ई-मेल पाठवून त्याला रिप्लाय देण्यास सांगतात. हे ई-मेल परदेशातून किंवा आपल्या देशातूनच पण परदेशातील आयपीवरून पाठवले जातेत. या ई-मेलद्वारे एकतर Off Shore खात्यांमध्ये किंवा भारतातीलच काही खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी सांगितले जाते. Lottery Fraud आणि ई-मेलद्वारे फसवणुकीचे प्रामुख्याने दोन प्रकार प्रचलित आहेत.

Fake Win Lottery Fraud पासून वाचायचे कसे?

तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की, एखादी व्यक्ती लॉटरी खेळते की नाही हे त्यांना कसे कळते. तर गुन्हेगारांचा हा फक्त अंदाज असतो. त्यात बरेचजण फसतात. या अशा फ्रॉडपासून सुटका करून घ्यायची असेल तर हा प्रकार कसा चालतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गुन्हेगार सर्वांनाच ई-मेल पाठवून तुम्हाला लॉटरी लागली असून पैसे पाठवण्यासाठी बॅंक खात्याची माहिती मागवतात किंवा खाते चेक करण्यासाठी थोडीफार रक्कम खात्यात ट्रान्सफर करतात. इथेच बहुतेक जण फसतात आणि आपल्या बॅंकेशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करतात. तर अशावेळी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जसे की, कोणतीही माहिती ऑनलाईन शेअर करण्यापूर्वी शक्य असेल तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा. त्याच्याकडून पुराव्यांची मागणी करा. ते जर तो देण्यास नकार देत असेल तर अशा व्यक्तींशी संपर्क टाळा. त्याला ई-मेलवर ब्लॉक करा आणि सायबर सेल ऑफिसकडे याची तक्रार दाखल करा.


‘खेळा आणि जिंका’चे आमिश दाखवणाऱ्या Scams Website  पासून सावधान!

खेळा आणि जिंका, अशा अनेक प्रकारच्या lottery websites आज digital पद्धतीने खेळल्या जातात. त्यातल्या काही खऱ्या असू शकतात. पण बऱ्यापैकी बनावट असण्याची शक्यता अधिक असते. Scams Websites मधून कोणालाही टार्गेट केले जाऊ शकते. त्यामुळे अशा साईटवर जाताना आपल्या ऑनलाईन बॅंक खात्याची माहिती देणे शक्यतो टाळा किंवा अशा लॉटरी वेबसाईटसाठी वेगळे खाते ठेवा. ज्यात गरजेपुरते पैसे असतील.

लॉटरी फ्रॉड किंवा ई-मेलद्वारे होणारी फसवणूक कशी ओळखायची!

  • खऱ्या-खुऱ्या लॉटरीच्या बक्षिसांमध्ये अनेक प्रकारचे टॅक्स समाविष्ट असतात. जे आपण लॉटरी Tax Calculator द्वारे पडताळू शकतो किंवा मोजू शकता. हा टॅक्स जिंकलेल्या बक्षिसातून वजा केला जातो. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही लॉटरीद्वारे जिंकलेले पैसे मिळवण्यासाठी काही फुटकळ रक्कम मागत असेल तर तो फ्रॉड आहे. हे लक्षात घेऊन अशा व्यक्तींशी संपर्क टाळावा किंवा त्याची सायबर सेलकडे रीतसर तक्रार दाखल करावी.
  • प्रत्यक्षात कोणतीही बॅंक, खऱ्या लॉटरी संस्था Email, Telephone  किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे बॅंक खात्याची किंवा क्रेडिट कार्डची माहिती विचारत नाही.
  • सरकारने मान्याता दिलेल्या किंवा ऑफिशिअल वेबसाईटवरून लॉटरी खेळावी. अशा काही ठराविक websites आहेत; ज्या Government च्या सर्व नियमांचे पालन करून Online Lottery खेळण्याचा पर्याय देतात. त्यामुळे अशा अधिकृत वेबसाईटची माहिती घ्या आणि मगच त्याला भेट द्या.
  • अनोळखी ई-मेलवरून आलेली एखादी Unknown Link किंवा File डाऊनलोड करणं टाळा. कारण, अशा लिंकमधून गुन्हेगार आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधून त्यांना हवी असलेली माहिती चोरू शकतात. त्यामुळे माहित नसलेल्या व्यक्तीकडून SMS  किंवा Email द्वारे आलेल्या  कोणत्याही Link वर क्लिक करू नका.