Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Lottery Fraud? लॉटरी फ्रॉड म्हणजे काय?

What is Lottery Fraud

Lottery Fraud ही वेगवेगळ्या माध्यमाद्वारे लोकांची केलेली फसवणूक आहे. जसे की, email पाठवून एखाद्याला lottery किंवा बक्षीस जिंकले आहे, असे सांगून त्याच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते.

Lottery fraud ही concept आता लोकांसाठी काही नवीन नाही. पण तरीही आजच्या ह्या technology च्या युगात अनेक जण याचे बळी पडत आहेत. त्यावर आलेली एक web series म्हणजेच जामतारा (jamtara) अनेक phone calls, emails द्वारे केला जाणारा हा fraud मोठ्या संख्येने घडला जातो. कमी वेळात जास्त पैसे कमावणे हा प्रत्येकाचा हेतू असतो तोच काय तो हे scammer लक्षात घेतात आणि fraud करतात.

Lottery Fraud म्हणजे email द्वारे लोकांची केलेली फसवणूक होय. आपल्याला एखादी lottery लागली आहे किंवा बक्षीस जिंकले आहे असा एक email आपल्याला पाठवाला जातो. आणि त्यानंतर आपण lottery fraud चे शिकार होतो. अनेकदा लोकांना हेदेखील कळत नाही की, त्यांनी त्या लॉटरीत कधी भागच घेतलेला नसतो. Scammer बक्षिसाचा दावा करण्यासाठी आपल्याला advance money किंवा GST किंवा Tax भरण्यास सांगतात. आपल्या बँकेचे account details मिळवण्यासाठी  ते आपली personal information मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. पण प्रत्यक्षात, ते या माहितीचा उपयोग आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी करत असतात.


फसवणूक करणारे आपल्याला मोबाईलवर कॉल करण्यास किंवा sms किंवा बक्षिस मिळवण्यासाठी  online form भरण्यास सांगतात. E-mail किंवा Telephonic वर लोकांशी संवाद साधताना ते अतिशय normal पद्धतीने बोलतात. जेणेकरून समोरच्याला ते अगदी खरे वाटते. आणि त्यानंतर ते आपली माहिती गोळा करतात. माहिती घेताच आपल्याला एक sms पाठवतात आणि पैसे स्वतःकडे transfer करून घेतात. Lottery Fraud चे अनेक प्रकार आहेत; जसे की, phone call, email, etc. एखाद्या व्यक्तीस E-mail किंवा phone call करून lottery चे बक्षीस जिंकले आहे आणि त्यासाठी एक शुल्लक रक्कम आपल्यला भरावी लागेल, असे सांगितले जाते. 

E-mail Fraud म्हणजे हा एकतर वैयक्तिक फायद्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करण्यासाठी केलेली फसवणूक आहे. E-mail चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागताच, काही फ्रॉड लोक त्यांना फसवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर करू लागतात. E-mail फसवणूक ही "कॉन गेम" किंवा एखाद्या मोठ्या घोटाळ्याचे रूप घेऊ शकते. E-mail Fraud, इतर 'बंक स्कीम्स' प्रमाणे, सहसा भोळ्याभाबड्या व्यक्तींना लक्ष्य करते, जे लवकर श्रीमंत होण्याच्या योजनांवर विश्वास ठेवतात. यामध्ये लवकर पैसे मिळवा किंवा लोकप्रिय वस्तू लाखमोलाचा धनादेश  या प्रकारच्या ऑफरचा समावेश आहे. फसवणुकीमुळे अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी गेली आहे. त्यामुळे  अनेक जण पुन्हा अशा गुन्ह्याविरोधात तक्रार करण्यास माघार घेतात. आणि त्यामुळेच गुन्हेगारांना आणखीन वाव मिळतो. 

सध्या अशा फ्रॉड्सचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. जसे की, तुम्ही एखादे product जिंकले आहे किंवा तुमचे पोस्टाने एक parcel आले आहे, असे सांगितले जाते आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला बेसिक रक्कम भरण्यासाठी सांगितले जाते किंवा बॅंकेचे डिटेल्स मागितले जातात.