Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? काय असतो फरक?

डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? काय असतो फरक?

शेअरबाजारात गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट DEMAT आणि ट्रेडिंग अकाऊंट Trading Account मधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

शेअरबाजारात गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट असणे गरजेचे असते. त्याशिवाय आपल्याला इक्विटी (Equity) मार्केटमध्ये पैसा टाकता येत नाही. डिमॅट खाते उघडण्यासाठी केवायसी (KYC) असणे गरजेचे आहे. आपल्या सर्वसाधारण खात्यासारखेच हे डिमॅट अकाऊंट असते. मात्र ट्रेडिंग अकाऊंट आणि डिमॅट अकाऊंटमध्ये फरक असतो.

ट्रेडिंग खाते म्हणजे काय?

जर कोणी खरेदीदार शेअर विकत घेत असेल तर त्यासाठी ट्रेडिंग अकाऊंट असणे आवश्यक ठरते. हे खाते ग्राहकाला शेअर खरेदी आणि विक्रीची सुविधा उपलब्ध करून देते. हे खाते शेअर बाजाराशी जोडलेले असते. ज्याठिकाणी शेअरची खरेदी- विक्री केली जात असते. आपले ट्रेडिंग खाते हे बँक खात्याशी जोडणे अनिवार्य ठरते. त्यामुळे शेअर्श खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आपल्या बँक खात्यातील रक्कम ट्रेडिंग खात्यात जमा करावी शकते. 

ट्रेडिंग अकाऊंट हे शेअर बाजार, बँक खाते आणि डिमॅट खाते यांच्यात दुवा साधण्याचे आणि मध्यस्थाची भूमिका बजावत असते. दररोज आपण खरेदी-विक्री केलेल्या शेअर्सची माहिती ट्रेडिंग खात्यात जमा होते. यामध्ये झालेला नफा-तोटा हे देखील या खात्यात लागलीच समजू शकते. तसेच आपण घेतलेल्या शेअर्सचे आजचे एकत्रित मूल्य किती आहे, त्याचीही माहिती आपल्याला केव्हाही, कोणत्याही क्षणी ट्रेडिंग अकाउंटच्या अॅपवरुन मिळू शकते.

डिमॅट खाते म्हणजे काय?

शेअर खरेदी करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे आहे. हे डिमॅट अकाउंट आपल्या एखाद्या बँक लॉकरप्रमाणे असते. त्याठिकाणी आपण पैसे ठेवून बाजारातील स्थितीप्रमाणे शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो. याखेरीज म्युच्युअल फंड (Mutual Fund), बाँडस् (Bonds) हेदेखील इलेक्ट्रॉनिक स्वरुपात डिमॅट खात्यात साठवून ठेवले जातात. डिमॅट अकाउंट आपण ब्रोकरमार्फत सुरू करू शकतो किंवा अनेक बँकांनीही डिमॅट अकाउंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. 

सेबी (SEBI)च्या नियमानुसार इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ग्राहकाला डिमॅट खाते असणे जरुरी आहे. अनेक बँका किंवा दलाल ग्राहकाला डिमॅटबराबेरच ट्रेडिंग अकाऊंट सुरू करण्याचीही सोय उपलब्ध करून देतात. डिमॅट अकाउंट देखील बँक खात्याला जोडलेले असते आणि त्यातून डिमॅटमध्ये पैसे ऑनलाइन माध्यमातून जमा करता येतात. आपण जोडलेल्या खात्यातूनच डिमॅटमध्ये व्यवहार करू शकतो.

ट्रेडिंग खात्यावरुन खरेदी केलेले शेअर्स डीमॅट खात्यात येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. याला T+2 असे म्हणतात. आता हा कालावधी कमी करुन एक दिवसांवर आणण्यात येणार आहे. त्याला T+1 म्हटले जाते.