Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Funds: अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Active mutual fund

मुच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड या संज्ञा तुम्ही ऐकल्या असतील. दोन्ही पर्यायांमध्ये कशा पद्धतीने पैसे व्यवस्थापित केले जातात. फंड व्यवस्थापन कंपनीचा यामध्ये किती सहभाग असतो, या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.

जेव्हा गुंतवणूकीचा प्रश्न येतो तेव्हा म्युच्युअल फंड शेअर बाजार,सोने-चांदी असे अनेक पर्याय डोळ्यासमोर येतात. गुंतवणूकीच्या प्रत्येक पर्यायाची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय न घेतलेलाच चांगला. मुच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड या संज्ञा तुम्ही ऐकल्या असतील. दोन्ही पर्यायांमध्ये कशा पद्धतीने पैसे व्यवस्थापित केले जातात. फंड व्यवस्थापन कंपनीचा यामध्ये किती सहभाग असतो, या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.

अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड (Active mutual fund)

अॅक्टिव्ह म्युच्युअल हे असे फंड असतात ज्यामध्ये फंड मॅनेजर सतत चांगल्या स्टॉक्सच्या शोधात असतो. त्याबाबत विश्लेषण करून पैसे गुंतवत असतो. जे शेअर्स चांगला परतावा देत नाहीत त्याऐवजी चागंल्या शेअर्सची निवड करण्याची निरंतर प्रक्रिया अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड मॅनेजर करत असतो. बाजाराचा सखोल अभ्यास, कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचे निर्णय यावर बारकाईने नजर ठेवली जाते. मात्र, या फंडामध्ये गुंतवणूक करताना पॅसिव्ह म्युच्युअल फंडाच्या तुलनेत शुल्क जास्त आकारले जाते.

पॅसिव्ह म्युच्युअल फंड - (Passive mutual fund)

यामधील फंड मॅनेजर निफ्टी५०, सेन्सेक्स इंडेक्स मीडकॅप सारख्या बेंचमार्क इंडेक्स कंपन्यांमधील शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. स्वत: विश्लेषण न करता इंडेक्सनुसार निर्णय घेतले जातात. यामध्ये धोका कमी असतो. अशा प्रकारला फंड इंडेक्स किंवा इटिएफ म्हणजेच एक्सजेंच ट्रेडेड फंड असू शकतो. इंडेक्समध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य या फंडाद्वारे दिले जाते. उदाहरणार्थ, ,समजा एखादी कंपनी निफ्टी इंडेक्समधून बाहेर पडली तर तर फंड मॅनेजर या कंपनीच्या शेअर्समध्ये केलेले गुंतवणूक काढून घेईल आणि नव्याने निफ्टीमध्ये समाविष्ट झालेल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवेल. 

पॅसिव्ह म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीचे फायदे

यामध्ये फंड मॅनेजर स्वत:हा गुंतवणूकीचा निर्णय घेत नसून बाजारानुसार निर्णय घेतले जातात. त्यामुळे शुल्कही कमी आकारले जाते. दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणीवर हे शुल्क जास्त होईल. निफ्टी किंवा सेन्सेक्स इंडेक्समधील विविध क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, असे प्रत्येकवेळीच होईल असे नाही. कारण या फंडाद्वारे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते. या फंडामध्ये सहज सोप्या पद्धतीने स्वत: जास्त अभ्यास किंवा विश्लेषण न करता गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध होतो. दीर्घकाळासाठी तुम्हाला चिंता करावी लागत नाही. भारतामध्ये सध्या पॅसिव्ह म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक वाढत आहे. 

(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त केलेली मते ही महामनी डॉट कॉमची ही वैयक्तिक मते नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लांगारांची मदत घ्या.)