Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wedding Saving Account: लग्न करण्याचा विचार करताय, मग वेडिंग सेव्हिंग अकाउंटबद्दल माहिती करून घ्या!

What is Wedding Saving Account

Image Source : www.express.co.uk

Wedding Saving Account: लग्नाचे नियोजन करणे ही तशी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असते. पण ते नियोजन सत्यात उतरवण्यासाठी तेवढीच आर्थिक तरतूद असणे गरजेचे आहे. वेडिंग सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही तुमच्या बजेटनुसार खर्चाचे प्लॅनिंग आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद म्हणून बचत करू शकता.

Wedding Saving Account: पूर्वी कुटुंबात लग्नं ठरलं की, संपूर्ण घर त्या लग्नाच्या तयारीत हरवून जायचे. नातेवाईकांची यादी,  सामानाची यादी, संपूर्ण लग्नाच्या जमा-खर्चाचे नियोजन अशी एक ना अनेक कामे मागे लागायची. पण आता काळ बदलला आहे; या सगळ्यांची जागा वेडिंग प्लॅनरने घेतली. त्यांना पैसे दिले की, आपण निवांत. पण यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे सर्वांत महत्त्वाचे काम पार पाडावे लागणार आहे.

लग्नाचे नियोजन करणे ही तशी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असते. पण ते नियोजन सत्यात उतरवण्यासाठी तेवढीच आर्थिक तरतूद असणे गरजेचे आहे. या आर्थिक तरतुदीमुळेच बऱ्याच जणांवर ताणसुद्धा येतो. हा ताण कमी करण्यासाठी आणि लग्नाचे नियोजन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी Wedding Saving Account हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. वेडिंग सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही तुमच्या बजेटनुसार खर्चाचे प्लॅनिंग आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद म्हणून बचत करू शकता.

वेडिंग सेव्हिंग अकाउंट हे बचत खातेच आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या लग्नाच्या खर्चाची रक्कम जमा करू शकता. इतर बचत खात्याप्रमाणेच हे खाते असते. फक्त या खात्यामध्ये जमा होणारा निधी हा स्पेसिफिक लग्नासाठी वापरला जाणार आहे. तसेच या खात्यातून इतर कामांसाठी निधी वापरला जाणार नाही.

तुमचे नियमित सेव्हिंग खाते (Saving Account) या वेडिंग सेव्हिंग खात्याशी लिंक केले तर, तुम्हाला या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला नियमित पैसे ट्रान्सफर करता येतील आणि या खात्यातून तुम्हाला लग्नाचा खर्च करता येईल.

वेडिंग सेव्हिंग खात्यातून कोणता खर्च भागवला जाऊ शकतो?

वेडिंग सेव्हिंग खात्यातून वेगवेगळ्या प्रकारचे खर्च भागवता येऊ शकतात किंवा तसे नियोजन करता येऊ शकते. जसे की लग्नातील काही खर्च खूप मोठे असतात. त्यातमध्ये हॉल-डेकोरेशनचे भाडे, फोटोग्राफी, कॅटरर्स, रिटर्न गिफ्ट आणि हनिमूनसाठी परदेशात किंवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी जाणार असेल तर त्याचा खर्च खूप असतो. हा सर्व खर्च या खात्यातून ऑनलाईन व नेटबँकिंगने करता येऊ शकतो. यामुळे तुमच्या वैयक्तिक खात्यातील खर्च आणि लग्नासाठी होणारा खर्च हा वेगवेगळा राहण्यास मदत होईल.

वेडिंग सेव्हिंग खात्यामध्ये पैसे गुंतवताना लग्नासाठी एकूण किती खर्च अपेक्षित आहे. तो जमा करण्यासाठी कधीपासून सुरूवात केली पाहिजे आणि यासाठी प्रत्येक महिन्यात किती रुपये त्यात खात्यात जमा करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन काटेकोरपणे होऊ शकते.

लग्नासाठी लागणारे पैसे कुठे साठवू शकता?

लग्नासाठी लागणारा पैसा साठवून ठेवण्यासाठी Wedding Saving Account हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्या बचत खात्यातून तुम्ही कधीही तुमच्या सोयीप्रमाणे पैसे काढू शकता. तसेच त्यावर तुम्हाला चांगला व्याजदर मिळणार असेल आणि यासाठी बँकेला कमीतकमी शुल्क भरावे लागेल. ते तुमच्यासाठी बेस्ट वेडिंग सेव्हिंग अकाउंट ठरू शकेल. यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या बँकांच्या वेबसाईटवरून तुमच्यासाठी बेस्ट आणि सोयिस्कर बँक निवडू शकता.

वेडिंग सेव्हिंग खाते सुरू करताना काय पाहाल?

वेडिंग सेव्हिंग खाते सुरू करण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण अजूनपर्यंत बँकेत Wedding Saving Account या नावाने खाते सुरू करण्याची योजना सुरू झालेली नाही. पण लग्न करणारे जोडपे एकत्रित किंवा वैयक्तिक खाते ओपन करू शकतो. पण खास लग्नाचा खर्च भागविण्यासाठी खाते ओपन करताना काही बेसिक गोष्टी नक्कीच पाहायला हव्यात.

व्याजदर (Interest Rate)

बँकेमध्ये खाते ओपन करताना ती बँक सेव्हिंग अकाउंटवर व्याज किती देते. हे चेक केले पाहिजे आणि जी बँक सर्वाधिक जास्त व्याज देते त्या बँकेत खाते ओपन केले पाहिजे.

मेन्टेनन्स फी (Maintenance Charges)

प्रत्येक बँकेचे मासिक शुल्क आणि इतर बँकिंग शुल्क हे वेगवेगळे असतात. त्यामुळे जी बँक सर्वांत कमी शुल्क आकारते. त्या बँकेत खाते सुरू करणे योग्य ठरू शकते. याची माहिती बँकांच्या वेबसाईटवर उपलब्ध असते.

किमान डिपॉझिट रक्कम (Minimum Deposit)

बँकेत खाते ओपन करण्यासाठी बऱ्याच बँका किमान रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवण्यासाठी सांगतात. म्हणजे त्या खात्यात किमान तेवढी रक्कम असलीच पाहिजे. त्यापेक्षा कमी रक्कम असेल तर बँक खातेधारकाकडून दंड आकारते. त्यामुळे नवीन बचत खाते (Saving Account) सुरू करताना किमान डिपॉझिटची रक्कम किती हे जाणून घेणे गरजेचे आहे.

अ‍ॅक्सेस (Access)

तुम्ही जर या सेपरेट अकाउंटमधून लग्नासाठी पैशांची बचत करत असाल तर, तुम्हाला तो पैसा खर्चासाठी सहज उपलब्ध झाला पाहिजे. जसे काही पेमेंट ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे करता आले पाहिजे. तसेच डेबिट/एटीएम कार्डद्वारे रोख पैसे काढण्याची सोय सुद्धा असली पाहिजे. अशा बेसिक सुविधांची माहिती घेऊन खाते सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.

वेडिंग सेव्हिंग टीप्स (Wedding Saving Tips)

तुमच्या जवळच्या आर्थिक सल्लागाराशी किंवा घरातील ज्येष्ठांशी बोलून लग्नाच्या खर्चाचे बजेट निश्चित करा. त्यासाठी वेगळा निधी काढून ठेवता येईल का? खर्चाचे लिमिट निश्चित करता येईल का? आणि खरंच असे वेगळे वेडिंग सेव्हिंग अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे का? याचा सल्ला घ्या. 

लग्नाचा खर्च आटोक्यात राहण्यासाठी आणि वायफळ खर्च होऊ नये यासाठी नियोजन करा . नियोजनानुसारच खर्च करा. काही रक्कम वेगळी ठेवा. नियोजनात नसलेला खर्च भागविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.