Saving Account: एका चांगल्या बॅंकेत आणि चांगल्या सोयीसुविधांसह सेव्हिंग अकाउंट सुरू करणे ही तुमच्या फायनान्शिअल जर्नीची चांगली सुरूवात ठरू शकते. कारण सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या बॅंका उपलब्ध आहेत. ज्या काही क्षणात तुमचे बचत खाते सुरू करून देतील. पण तुम्ही तुमचे बचते खाते ओपन करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
आपण कोणत्याही बॅंकेत बचत खाते ओपन करण्यापूर्वी पुढीलप्रमाणे 5 महत्त्वाच्या बाबी तपासून घेतल्या पाहिजेत.
Table of contents [Show]
बॅंकेकडून मिळणारा व्याजदर
बॅंकेकडून बचत खात्यावर दिला जाणार व्याजदर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण बॅंकेत खाते सुरू केल्यानंतर त्यात जमा होणाऱ्या रकमेवर बॅंक व्याज देते. त्यामुळे तुमच्या बॅंकेतील रकमेत वाढ होते. त्यामुळे मार्केटमधील जी बॅंक चांगला व्याजदर देते. त्या बॅंकेत सेव्हिंग अकाउंट ओपन करणे फायद्याचे ठरू शकते.
फी आणि इतर चार्जेस
सेव्हिंग खाते ओपन करण्यासाठी तसा खूप खर्च येत नाही. काही बॅंका तर फ्री-ऑफ कॉस्टमध्ये खाते सुरू करून देतात. तर काही खाते ओपन करताना एक ठराविक रक्कम खात्यात जमा करण्यासाठी सांगतात. पण या व्यतिरिक्त बॅंकेत अकाउंट ओपन केल्यानंतर खाते मेन्टेंन ठेवण्यासाठी, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खात्यात मिनिमम बॅलेन्स नसेल तर काही बॅंका त्यावर चार्जेस आकारतात. यामुळे तुमच्या खात्यातील जमा रकमेतून पैसे कट होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅंक कोणत्या प्रकारची फी आणि चार्जेस आकारते आणि खात्यात मिनिमम बॅलन्स किती असायला हवा. याची माहिती घेऊनच खाते सुरू करण्याचा निर्णय घेणे योग्य ठरू शकते.
बॅंकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा
बचत खात्यातून तुम्ही पैसे कधी आणि कसे ट्रान्सफर करू शकता. म्हणजे ते खाते हाताळण्यासाठी तुम्हाला कितपत योग्य आहे. हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. जसे की, ती बॅंक ऑनलाईन बॅंकिंग सेवा देते का किंवा बॅंक 24/7 ग्राहकांना सेवा पुरवते का? बॅंकेची पुरेशी एटीएम आहेत का? तसेच त्यातून कितीवेळा पैसे काढता येऊ शकतात. त्याचे चार्जेस किती. अशा सर्व प्रकारच्या सुविधा आणि त्यावर आकारले जाणारे शुल्क याची वेगवेगळ्या बॅंकांसोबत तुलना करून बचत खात्याची निवड केली पाहिजे.
अकाउंटवर मिळणाऱ्या सुविधा आणि निर्बंध
सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यापूर्वी त्या खात्यावर खातेधारकाला कोणत्या सोयीसुविधा मिळणार आहेत आणि कोणत्या सुविधा मिळणार नाहीत. याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. जसे की, काही खात्यांमध्ये किमान रक्कम ठेवणे गरजेचे असते; ती नसेल तर खातेधारकाकडून दंड वसूल केला जातो. तर काही खाती झिरो अकाउंटची सुविधा देतात. त्याचबरोबर काही बॅंकांमध्ये पैसे भरण्याची आणि काढण्यासाठी संख्या ठरलेली असते. ती संख्या ओलांडली तर त्यावर खातेधारकाकडून दंड आकारला जाऊ शकतो. हे चार्जेस टाळण्यासाठी योग्य खात्याची निवड करणे गरजेचे आहे.
बँकेचे मार्केटमधील रेप्युटेशन
बॅंकेकडून ग्राहकांना कशाप्रकारची सुविधा मिळते, हा खाते ओपन करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच संबंधित बँकेबद्दल ग्राहकांचे काय मत आहे. मार्केटमध्ये त्या बँकेचे रेप्युटेशन काय आहे. हे पाहणे गरजेचे आहे. कारण आपण ज्या बँकेत खाते ओपन करणार आहे. ती मार्केटमध्ये किती दिवस टिकू शकते. लोकांचा त्यावर कितपत विश्वास आहे किंवा ग्राहकांना ज्या सेवा दिल्या जातात. त्यावर ग्राहक संतुष्ट आहेत का. या गोष्टींची माहिती घेऊन सेव्हिंग खाते सुरू करणे योग्य ठरू शकते.
अशाप्रकारे बँकेकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा, व्याजदर, बँकेची मार्केटमधील पत अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन, त्याची तुलना करून आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमची गरज काय आहे. हे समजून त्या बँकेत खाते ओपन करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.