देशातील स्थानिक बाजारापेठेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या महत्त्वाच्या बँका असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. स्थानिक बाजारापेठेमध्ये या सर्वात महत्त्वाच्या बँका असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट (D-SIBs) बँका निवडण्यासाठी आरबीआयने नियमावली तयार केली आहे. यामध्ये फक्त तीन बँकांचा आरबीआयने समावेश केला आहे.
2014 साली आरबीआयने महत्त्वाच्या बँका निवडीसाठी नियमावली जारी केली होती. त्यानुसार आरबीआयला सिस्टिमॅटिक इम्पॉर्टंट स्कोर जाहीर करावा लागतो. त्यानुसार बँकांची वर्गवारी करण्यात येते. त्यानुसार 2015 साली आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेचा या यादीत समावेश केला होता. तर 31 मार्च 2017 साली एचडीएफसी बँकेचा या यादीत समावेश करण्यात आला होता. 31 मार्च 2022 पासूनच्या आकडेवारीनुसार आरबीआयने बँकांची यादी जाहीर केली आहे.
एखाद्या परदेशी बँकेची भारतात शाखा असेल तर त्या बँकेस ग्लोबल सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक (G-SIB) असे म्हटले जाते. ती यादीही आरबीआयद्वारे तयार करण्यात येते. एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या भारतातील महत्त्वाच्या बँका असून त्यांचे बाजार मूल्यही जास्त आहे. या बँकाद्वारे प्राधान्यक्रम क्षेत्रांना जास्त कर्ज पुरवठा करण्यात येतो.