ज्येष्ठ नागरिकांसाठीची जास्त व्याज दर देणारी एचडीएफसी बँकेची (HDFC bank) विशेष मुदत ठेव (Special fixed deposit) योजना लवकरच समाप्त होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, ही योजना उद्या म्हणजेच 7 जुलै 2023 रोजी संपणार आहे. पाहू या योजनेचा किती फायदा तुम्हाला होणार आहे...
सिनियर सिटीझन केअर एफडी स्कीम
सीनियर सिटीझन केअर एफडी योजनेच्या माध्यमातून मुदत ठेवींवर अतिरिक्त 0.75 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. ही योजना 18 मे 2020 रोजी सुरू झाली होती. पात्र ठेव कालावधी 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे असा आहे. तर ही ऑफर अनिवासी भारतीयांसाठी लागू नसणार आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जे ज्येष्ठ नागरिक 5 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवी 5 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी यात गुंतवू इच्छितात त्यांना 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम आकारला जाईल (आताच्या 0.50 टक्के प्रीमियमपेक्षा जास्त). ही योजना 18 मे 2020 ते 7 जुलै 2023पर्यंत असणार आहे.
सिनियर सिटीझन केअर एफडी व्याज दर
या स्पेशल सीनियर सिटीझन केअर एफडीवर 7.75 टक्के व्याजदर दिला जात आहे. सीनियर सिटीझन केअर एफडी योजना बंद झाल्यानंतर, बँक वेगवेगळ्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना व्याज देणं सुरूच ठेवणार आहे. बँक 7 ते 29 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के व्याजदर आणि 30 ते 45 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4 टक्के व्याजदर देत आहे. एचडीएफसी बँक 46 ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवलेल्या ठेवींवर 5 टक्के व्याजदर आणि 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवलेल्या ठेवींवर 6.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
'या' कालावधीत सर्वाधिक व्याज
- 9 महिने, 1 दिवस ते 1 वर्षाच्या मुदत ठेवींवर 6.50 टक्के दराने व्याज देईल
- 1 वर्ष ते 15 महिन्यांत मुदतपूर्ती झालेल्या ठेवींवर 7.10 टक्के दरानं व्याज देईल.
- 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 7.60 टक्के
- 18 महिने ते 4 वर्षे आणि 7 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 7.50 टक्के व्याज दर दिला जाईल.
- 2 वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या कालावधीसाठी बँक 7.70 टक्के व्याजदर देते.
- 4 वर्षे 7 महिने ते 55 महिन्यांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.75 टक्के व्याजदर बँकेमार्फत दिला जातो.