Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TDS on Fixed Deposit: कोणत्या मुदत ठेवींवर टीडीएस लागू होतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Which FD's are subject to TDS

TDS on FD: बॅंकेतील मुदत ठेवींवर जमा होणाऱ्या व्याजावर सरकार टीडीएस (Tax Deducted at Sources-TDS) स्वरूपात टॅक्स आकारते. पण त्याचवेळी सरकार पोस्टातील टाईम डिपॉझिट फिक्स डिपॉझिट (TDFD) आणि रिकरिंग डिपॉझिटवर टीडीएस लावत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या मुदत ठेवींवर टीडीएस लागू होतो आणि कोणत्या ठेवींवर लागू होत नाही.

TDS on FD: एखाद्या गुंतवणूकदाराने बॅंकेतील मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली असेल तर, त्या गुंतवणुकीवर सरकार स्लॅबनुसार टॅक्स आकारते. बॅंकेतील मुदत ठेवींवर जमा होणाऱ्या व्याजावर सरकार टीडीएस (Tax Deducted at Sources-TDS) स्वरूपात टॅक्स आकारते. पण त्याचवेळी सरकार पोस्टातील टाईम डिपॉझिट फिक्स डिपॉझिट (TDFD) आणि रिकरिंग डिपॉझिटवर टीडीएस लावत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या मुदत ठेवींवर टीडीएस लागू होतो आणि कोणत्या ठेवींवर लागू होत नाही.

फिक्सड् डिपॉझिट म्हणजे काय? What is Fixed Deposit?

फिक्सड् डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी ही एक बचत गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदार काही कालावधीसाठी फिक्सड् व्याजदरावर पैसे गुंतवतात. या गुंतवणुकीवर ग्राहकांना निश्चित असा व्याजदर दिला जातो. योजनेचा कालावधी पूर्ण झाला की, जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळालेले व्याज असे दोन्ही एकत्रितरीत्या गुंतवणूकदाराला परत केले जाते.

असा लावला जातो टीडीएस

बॅंकेतील मुदत ठेवींवरील (Fixed Deposit-FD) पैशांच्या व्याजावर वैयक्तिक इन्कम टॅक्सच्या स्लॅबनुसार, सरचार्ज, सेस आणि टॅक्स लावला जातो. एखाद्या गुंतवणूकदाराचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. तर तो गुंतवणूकदार 30 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येतो. त्याचबरोबर त्याला मुदत ठेवींवरील व्याजामधून 1 लाख रुपये मिळतात. तर त्याला त्या उत्पन्नावर 3,200 रुपये टॅक्स आणि 0.4 टक्के सरचार्ज द्यावा लागेल आणि संपूर्ण आर्थिक वर्षात त्याला 10,000 रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल तर त्याला त्यावर 10 टक्के टीडीएस (Tax Deducted at Sources-TDS) लागू होईल आणि गुंतवणूकदाराने बॅकेला आपले पॅनकार्ड सादर केले नाही तर त्याला 20 टक्के टीडीएस लागू शकतो.

एनआरओ (Non-Resident Ordinary-NRO) म्हणजे अनिवासी सर्वसाधारण खात्यातील मुदत ठेवींवर 30 टीडीएस आकारला जातो. तर एनआरई (Non-Resident External-NRE) आणि फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेन्ट (Foreign Currency Non-Resident-FCNR) खात्यातील मुदत ठेवींवर टीडीएस लागू होत नाही. या खात्यातील मुदत ठेवी या टॅक्स फ्री आहेत. बॅंका मुदत ठेवींवरील व्याजावर टॅक्स लावून जो टीडीएस कापतात. तो वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या इन्कम टॅक्स खात्यातील फॉर्म 26AS मध्ये दिसतो. पोस्ट ऑफिसद्वारे चालविल्या जाणाऱ्या टाईम डिपॉझिट मुदत ठेव आणि आवर्ती ठेव (Recurring Deposit-RD) योजनेतील व्याजावर कोणताही टीडीएस लावला जात नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांच्या मुदत ठेवींवर कोणताही टॅक्स लावला जात नाही. त्यामुळे प्रति वर्ष 50 हजार रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू होत नाही.

हे सुद्धा लक्षात ठेवा

  • जर बॅंकेकडून टीडीएस कापला आहे; आणि गुंतवणूकदार कमी टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर, तो गुंतवणूकदार आयटीआरद्वारे कापलेली रक्कम परत मिळवू शकतो.
  • जर गुंतवणूकदार 20 आणि 30 टक्क्याच्या स्लॅबमध्ये येत असेल आणि त्याच्या गुंतवणुकीवर टीडीएस लागला असेल तर, गुंतवणूकदाराला त्यावर टॅक्स भरावा लागतो.
  • बॅंक मुदत ठेवींवर जमा होणारे व्याज देण्यापूर्वीच टीडीएसची गणना करून घेते. त्यामुळे मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर वर्षाला टॅक्स भरला पाहिजे. यासाठी मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहू नये.

मुदत ठेवींवरील टॅक्सपासून अशी सुटका मिळवा

  • जर गुंतवणूकदाराचे वर्षातील एकूण उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल, तर गुंतवणूकदार 15G/15H फॉर्म भरून टीडीएसपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो.
  • बॅंकेत मुदत ठेवीचे खाते सुरू करण्याऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये ओपन केल्यास, त्या मुदत ठेवींवर टीडीएस लावला जात नाही.
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे मुदत ठेवी करता येऊ शकतात. यामुळे त्या व्यक्तीच्या स्लॅबनुसार त्याला टॅक्स लागू होतो.