Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Arbitrage Funds: अस्थिरतेतही करायची आहे कमाई? आर्बिट्रेज फंडात करा 6 महिन्यांसाठी गुंतवणूक, जाणून घ्या...

Arbitrage Funds: अस्थिरतेतही करायची आहे कमाई? आर्बिट्रेज फंडात करा 6 महिन्यांसाठी गुंतवणूक, जाणून घ्या...

Image Source : www.tapioview.com

Arbitrage Funds: अस्थिरतेतही कमाई करायची असेल तर एक उत्तम पर्याय म्हणजे आर्बिट्रेज फंड... आर्बिट्रेज फंड्समध्ये सध्या प्रचंड इन्फ्लो दिसत आहे. ही एक हायब्रीड स्कीम आहे. मागच्या काही महिन्यांत प्रचंड इन्फ्लो असल्यानं ही कमाईची चांगली संधी असल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे.

आर्बिट्रेज फंडात गुंतवणूक (Arbitrage Funds investment) करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. मागच्या काही महिन्यांतली आकडेवारी पाहता यात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात हायब्रीड फंड प्रकारामध्ये एकूण 6092 कोटींचा नेट इन्फ्लो होता. तर केवळ आर्बिट्रेज फंड प्रकारामध्ये 6640 कोटींची जबरदस्त गुंतवणूक नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात याच प्रकारात 3716 कोटी रुपयांचा नेट इन्फ्लो होता. त्यामुळे जेव्हा बाजारात अस्थिरता असते तेव्हा आर्बिट्रेज फंडात कमाई करण्याची चांगली संधी असते, असं आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. झी बिझनेसनं हे वृत्त दिलं आहे.

कालावधी किती असावा?

ब्रोकरेज फर्म असलेल्या शेअरखाननं त्यांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये याविषयी सविस्तर दिलं आहे. एखाद्या गुंतवणूकदारानं 6 महिन्यांचा विचार करून गुंतवणूक करण्याचं ठरवलं तर आर्बिट्रेज फंड हा एक त्यांच्यासाठी चांगला पर्याय असल्याचं यात म्हटलं आहे. जेव्हा बाजारात अनिश्चितता असते तेव्हा या फंडात कमाई करण्याची अधिक संधी असते. अस्थिरता जितकी जास्त तितकी कमाईची संधी जास्त, असा थोडक्यात याचा अर्थ आहे.

कशी होते आर्बिट्रेज फंडात कमाई?

रुंगटा सिक्युरिटीजचे सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर हर्षवर्धन रुंगटा यांनी आर्बिट्रेज फंडात नेमकी कशी कमाई होते, याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले, की हा फंड इक्विटी प्रकारात येतो. आर्बिट्रेज फंडाची कमाई म्हणजे रोख आणि डेरिव्हेटिव्हच्या किमतींमधला फरक होय. सामान्य भाषेत समजून घेतल्यास, रोख बाजारात जितके शेअर्स विकत घेतले जातात, तितकेच शेअर्स डेरिव्हेटिव्हजमध्ये जास्त किंमतीला विकले जात असतात. किंमतीतला हाच फरक कमाई म्हणून गणला जातो. अस्थिर बाजारात या फंडाची कामगिरी अधिक चांगली असते. जर कोणत्याही गुंतवणूकदारांना जास्त जोखीम घ्यायची नसेल तर त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

(टीप - माहिती 16 जूनपर्यंतच्या कामगिरीवर आधारित. स्रोत - एएमएफआय)

एएमएफआयच्या वेबसाइटवर यासंदर्भातली माहिती उपलब्ध आहे. या माहितीनुसार, या फंडांनी 1 वर्षात 7 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 1 वर्षाच्या कालावधीत सर्वोच्च कामगिरी करणारे आर्बिट्रेज फंड कोणते आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आर्बिट्रेज फंडांची एकूण AUM 90 हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. बाजार सध्या ऑल टाइम हायवर आहे. अशा परिस्थितीत वरच्या पातळीवर अस्थिरता जास्त असणार आहे. त्यामुळे हे फंड चांगलं काम करू शकतात.

टॉप 5 आर्बिट्रेज फंड

  1. इन्वेस्को इंडिया आर्बिट्रेज फंड (Invesco India Arbitrage Fund) - (डायरेक्ट प्लानचा 1 वर्षाचा परतावा 6.90 टक्के)
  2. एसबीआय आर्बिट्रेज अपॉर्च्युनिटीज फंड (SBI Arbitrage Opportunities Fund) - (डायरेक्ट प्लानचा 1 वर्षाचा परतावा 6.62 टक्के)
  3. कोटक इक्विटी आर्बिट्रेज फंड (Kotak Equity Arbitrage Fund) - (डायरेक्ट प्लानचा 1 वर्षाचा परतावा 6.49 टक्के)
  4. डीएसपी आर्बिट्रेज फंड (DSP Arbitrage Fund) - (डायरेक्ट प्लानचा 1 वर्षाचा परतावा 6.40 टक्के)
  5. एचडीएफसी आर्बिट्रेज फंड (HDFC Arbitrage Fund) - (डायरेक्ट प्लानचा 1 वर्षाचा परतावा 6.28 टक्के)

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)