Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Loan: डिजिटल लोन घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी माहिती हव्या

digital loan

Digital Loan: गेल्या काही वर्षात भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. हीच गोष्ट वित्तीय क्षेत्रालाही लागू आहे. कारण, सगळे व्यवहार आता क्लिकवर होत आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा पैशांची गरज आहे. त्यांना डिजिटल लोनमुळे सहज पैसे उपलब्ध होत आहेत. पण, ते घेण्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

Digital Loan: कोणत्याही महत्वाच्या कामासाठी पैसे लागत असेल तर सध्या डिजिटल लोनद्वारे सहज पैशांचा जम बसवता येत आहे. मात्र, कर्जदारांनी ते लोन घेण्याआधी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण, तसे न करता आपण डायरेक्ट लोन घेतल्यास, नंतर खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे जरी तुम्हाला पैसे क्लिकवर उपलब्ध होत असेल तरी लोन घेण्याआधी या महत्वाच्या गोष्टी नजरे खालून घालणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे.

लेंडरची माहिती काढा

मार्केटमध्ये मोठ्या बॅंका, फिनटेक, विविध लेंडर्स ऑनलाईन प्लॅटफाॅर्मद्वारे लोन देत आहेत. त्यामुळे डिजिटल लोन घेण्याआधी लेंडर्सची विश्वासार्हता चेक करणे आवश्यक आहे. तुम्ही कायदेशीर आणि अधिकृत लेंडर्सकडून व्यवहार करत असल्याची खात्री करण्यासाठी त्याची पार्श्वभूमी, रिव्ह्यु आणि प्रतिष्ठा याचा रिसर्च करणे गरजेचे आहे. यामुळे फसवणूक होण्यापासून आणि लोनच्या जाळ्यात अडकण्यापासून तुम्ही स्वत: चा बचाव करु शकाल.

डेटा सुरक्षा महत्वाची

डिजिटल लोन घ्यायचे म्हटल्यावर तुम्हाला काही महत्वाचे पेपर्स शेअर करावे लागतील. त्यामुळे तुमच्या पेपर्सचे रक्षण करण्यासाठी बॅंक सक्षम असेल अशा बॅंकेकडूनच लोन घेण्याला प्राधान्य द्या. तसेच, ती बॅंक सुद्धा या सर्व सुविधा देत असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या डेटाचा चुकीचा वापर होऊ शकणार नाही.

नियम व अटी घ्या समजून

आपल्याला पैशांची गरज असते, त्यामुळे आपण कसला ही विचार न करता लोनची प्रक्रिया पूर्ण करतो. मात्र, ही चूक करू नका. यामुळे भविष्यात तुमच्यावर लोनचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे लोन प्रक्रिया पूर्ण करण्याआधी सर्व नियम व अटी समजून घ्या. तसेच, कोणते छुपे चार्जेस नाहीत याची ही खात्री करा. तेव्हाच जो लेंडर तुम्ही निवडला असेल त्याच्याकडून लोन घ्या.

व्याजदर व परतफेडीची सुलभता

तुमच्या मेहनतीचा पैसा सर्व व्याज फेडण्यात जाणार आहे. त्यामुळे लोन घेण्याआधी अन्य लेंडर्सचे व्याजदर चेक करणे फायद्याचे ठरु शकते. त्यानंतर त्यांची तुलना करुन जे लोन तुम्हाला स्वस्तात मिळत आहे. तसेच, इतर छुपे चार्जेस नसल्याची खात्री करुन, तुम्ही त्या लेंडर्सकडून लोन घेण्याचा पर्याय निवडू शकता. तसेच, लोन घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी सुलभता असल्याची खात्री करा. नाहीतर तुमचे लोनचे हप्ते चुकू शकतात. त्यामुळे देखील तुमच्यावर लोनचा बोजा वाढू शकतो

कस्टमर सपोर्ट

लोन घेताना किंवा घेतल्यावरही काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संबंधित ठिकाणी कस्टमर सपोर्टच्या सुविधेत फोन, ई-मेल आणि चॅट सुविधा आहे की नाही चेक करा. यामुळे तुमचा लोन घेण्याचा प्रवास सुखद होऊ शकतो.

या संस्थाकडूनच घ्या लोन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि अन्य वित्तीय नियामक संस्थांनी ठरवलेल्या सर्व संबंधित नियामक आवश्यकतांचे पालन बँक करते की नाही याची खात्री करा. तसेच, रिझर्व्ह बँकेच्या नियमित संस्थांकडून लोन घेतल्यास कोणत्याही वादाच्या प्रसंगी सुरक्षितता आणि मदत मिळणे सहज होते.

डिजिटल लोनमुळे वित्तीय बाबी सहज आणि सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे बिझनेस आणि वैयक्तिक गोष्टींसाठी पैसा जमा करणे सहज झाले आहे. मात्र, त्याआधी  म्हणजे लोनची निवड करण्यापूर्वी सावधगिरी म्हणून योग्य काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जर डायरेक्ट लोन घेतले तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे डिजिटल लोन घेण्यासाठी तुम्हाला ही माहिती नक्कीच कामी येईल.