बाजारात भरपूर कंपन्यांचे, स्वस्त, महागडे स्मार्टफोन (Smart Phone) उपलब्ध आहेत. Apple, Samsung, Sony किंवा OnePlus सारख्या फेमस ब्रॅण्डपासून लोकल कंपन्यांचे मोबाईल फोन बाजारात मिळतात. महागडे स्मार्ट फोन आणि स्वस्तातले स्मार्ट फोन यांच्यात अगदी जमीन आस्मानाचा फरक नसला तरी, त्याच्यासारखेच फिचर्स देण्याचा प्रयत्न स्वस्तातल्या कंपन्या करत असतात.
ग्राहकांनाही कमीत कमी पैशांमध्ये जास्तीचा फायदा मिळवायचा असतो. त्यामुळे काही चोखंदळ ग्राहक कमी पैशांमध्ये मिळणाऱ्या स्मार्टफोनला पसंती देतात. पण स्मार्टफोनची नेमकी किंमत किती असते? कंपनीला स्मार्ट फोन बनवण्यासाठी खर्च किती येतो आणि कंपनी तो फोन ग्राहकांना कितीला विकते? हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्याही उत्पादनाची प्रोडक्शन कॉस्ट नेहमीप्रमाणे त्यासाठी येणारा खर्च, कच्चा माल, कर्मचाऱ्यांचा पगार आणि जाहिरातीवरील खर्च यावर अवलंबून असते. त्यानुसार स्मार्ट फोनमध्ये सर्वात महाग पार्ट असतो तो म्हणजे कोर प्रोसेसर, फोनचा डिस्प्ले, मेमरी आणि कॅमेरा मॉड्यूल. हे स्मार्ट फोनमधील सर्वांत महत्त्वाचे पार्ट आहेत. बहुतांश या पार्टच्या किमतीवरच मोबाईलची किंमत ठरत असावी. आपण घेत असलेल्या माहितीत मार्केटिंग, संशोधन आणि विकास, वितरण, कर्मचारी, अॅक्सेसरीज, पॅकेजिंग किंवा सॉफ्टवेअर यासारख्या गोष्टींचा आणि त्यावर होणाऱ्या खर्चाचा विचार करणार नाही आहोत.
स्मार्ट फोनवर होणारा उत्पादन खर्च, लॉन्चच्या वेळी त्याची किरकोळ किंमत आणि कंपनीचे नफ्याचे मार्जिन याबद्दलची माहिती आपण पाहू.

आयफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
भारतात iphone 12 च्या 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 84,900 आहे. तर 64GB स्टोरेजच्या फोनची किंमत 79, 999 रुपये आहे. परंतु, Counterpoint च्या एका रिपोर्टनुसार, iPhone 12 बनवण्यासाठी 30,300 रुपये खर्च येतो.