Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवीन स्मार्टफोन घेताय! मग या गोष्टी नक्की चेक करा

नवीन स्मार्टफोन घेताय! मग या गोष्टी नक्की चेक करा

Image Source : www.lp2m.uma.ac.id

जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे; पण बाजारातील नेमका कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य आहे. हे तुम्हाला ठरवता येत नसेल तर स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टी नक्की चेक करा.

सध्या बाजारात वेगवेगळ्या किमतीचे, ब्रॅण्डचे आणि बरीच फीचर्स असणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या इतक्या साऱ्या स्मार्टफोनमधून योग्य आणि परवडणारा फोन खरेदी करताना अवघड जात असेल. पण चिंता करू नका. आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजेत, यावर चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी तुमची मोबाईल फोनची गरज कशासाठी आहे ते ठरवणे गरजेचे आहे. आर्थिक बजेट पाहून तुम्ही जर स्मार्टफन खरेदी करणार असाल तर बाजारात सर्व प्रकारच्या किमतीचे फोन उपलब्ध आहेत. साधारण कंपन्यांपासून मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या कंपन्याही परवडणाऱ्या स्मार्टफोनची निर्मिती करतात. स्मार्टफोनच्या किमती अगदी 5 हजार रूपयांपासून 5 लाखापर्यंत आहेत.

स्मार्टफोनचा नेमका वापर कसा असणार

आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी कोणती महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहायला हवीत हे जाणून घेऊ. स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा वापर नेमका कसा असणार आहे? हे पाहिले पाहिजे. जसे की, एखाद्याला फोटोग्राफीची आवड आणि फोनचा सर्वाधिक वापर फोटो काढण्यासाठी केला जाणार असेल तर इतर वैशिष्ट्यांपेक्षा कॅमेराची क्वॉलिटी यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

जर स्मार्टफोनचा वापर फक्त व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियासाठी केला जाणार असेल तर त्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. कमी किमतीत ही अशी वैशिष्ट्ये असलेले फोन मिळतात. पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात माहिती, गाणी, व्हिडिओ, फिल्मस् स्टोअर करायच्या असतील तर भरपूर मेमरी असलेला स्मार्टफोन घ्यावा लागेल आणि स्मार्टफोनचा वापर जर तुम्हाला फक्त गेम खेळण्यासाठी करायचा असेल तर चांगला  प्रोसेसर आणि चांगली बॅटरी असलेला फोन घेणे गरजेचे आहे.

फीचर्सनुसार स्मार्टफोनची निवड करा

डिझाईन : जर तुमच्या स्मार्टफोनचे डिझाईन Handy असेल तर तुम्हाला स्मार्टफोन वापरतांना खूप चांगला अनुभव मिळतो. तसेच, तुम्हाला स्मार्टफोन जड वाटत नाही. अशात नवीन स्मार्टफोन खरेदी करतांना त्याच्या डिझाईनकडे लक्ष देणे देखील महत्वाचे आहे.

फास्ट प्रोसेसर : तुम्ही जर सर्व फीचर्स एकाच फोनमध्ये घेणार असाल तर असा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याचा प्रोसेसर पॉवरफुल आहे ना याची खात्री करून घ्या. कारण, सर्व फीचर्स एकाच फोनमध्ये वापरल्यामुळे स्मार्टफोनची कार्यक्षमता हळुहळु कमी होते आणि परिणामी फोन स्लो होतो. हे सर्व टाळण्यासाठी तुमच्या आवडीच्या फोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर आहे की नाही हे नक्की तपासून घ्या.

पावरफुल बॅटरी : नवीन स्मार्टफोन विकत घेताना फोनची बॅटरी पावरफुल आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh ची नसेल तर तुम्हाला ती सतत चार्ज करावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh पेक्षा कमी नसेल याची कळाजी घ्या.

सेल्फी कॅमेरा आणि रीयर कॅमेरा : आजकाल कोणालाच फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. फोटो काढून तो लगेच सोशल मीडियावर टाकण्यासाठी सर्वांनाच चांगला कॅमेरा असलेल्या फोनची गरज वाटत असते. सध्या बाजारात 50 आणि 64 मेगापिक्सेलच्या कॅमेरांना मोठी मागणी आहे. त्यामुळे फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन घ्यायचा असेल तर असे पर्याय तुम्ही निवडू शकता. 

सिक्युरिटी : स्मार्टफोन वापरताना सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. कारण स्मार्टफोनचा वापर आता सर्व प्रकारच्या कामांसाठी केला जातो. यासाठी त्याची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस लॉक यांसारख्या सुरक्षा असतात. तसेच काही फोन लॉक/अनलॉक बरोबरच काही files, documents किंवा अ‍ॅप्समध्ये प्रवेश करण्यासाठी password विचारतात. सुरक्षिततेसाठी असे फोन निवडणे फायद्याचे ठरू शकते.

कनेक्टिव्हिटी : मोबाईल फोनमधील नेटवर्क कनेक्टीव्हिटी आणि वाय-फाय कनेक्टीव्हिटी तितकीच महत्त्वाची आहे. तसेच हॉटस्पॉटद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी ब्ल्यूटूथ, वायफाय, मोबाईल नेकवर्क, वायफाय कॉलिंग आदी फीचर्स असलेल्या फोनची निवड करू शकता.