Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vodafone Idea Diwali Offer: वोडाफोन आयडियाची भन्नाट दिवाळी ऑफर! जाणून घ्या

Vodafone Idea Diwali Offer

Vodafone Idea Diwali Offer: वोडाफोन आयडियाने  2022 ची दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. हे नवीन प्रीपेड प्लॅन नाहीत, परंतु कंपनीने सध्याच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर जोडली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया..

Vodafone Idea Diwali Offer: घरात चपातीसाठी आटा नसेल तरी चालेल पण मोबईलमध्ये डेटा तर पाहिजेच. लहान मुलांपासून तर आजी आजोबा पर्यंत सगळ्यांना मोबाइल हवाहवासा आहे. लहान मुलांना कार्टून, तरुणांना वेब सिरिज, गृहीणींना स्वयंपाकाच्या टिप्स बघण्यासाठी डेटा तर लागतोच. आता वोडाफोन आयडियाने 2022 ची दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू आहे. कंपनीच्या नवीन दिवाळी ऑफर अंतर्गत, निवडक प्रीपेड योजनांच्या रिचार्जवर युजर्सना  बोनस किंवा अतिरिक्त डेटा मिळेल. वोडाफोन आयडियाने अतिरिक्त डेटासह दिलेल्या सर्व योजनांसह सर्व Vi Hero Unlimited ऑफर करणार आहे. जाणून घ्या vi चे प्लॅन.

1. 1449 रुपयांचा प्लॅन 

वोडाफोन आयडियाच्या 1449 रुपयांच्या प्लॅनसह, ग्राहकांना पुढील सुविधा मिळणार, अमर्यादित व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवसाला 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस. हा प्लॅन  180 दिवसांसाठी आहे. ऑफर कालावधी अंतर्गत, या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 50GB अतिरिक्त/बोनस डेटा मिळेल. विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी, आई व आजीला सिरियल बघण्यासाठी या डेटाचा वापर होऊ शकतो.

2. 2899 रुपयांचा प्लॅन 

Vi च्या 2899 रूपयाच्या प्लॅनसह ग्राहकांना पुढील सुविधा ऑफर करते, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, प्रत्येक दिवसाला 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस, हा प्लॅन 365 दिवसांची आहे. Vi च्या वेबसाइटनुसार, या प्लॅनमध्ये रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता 75GB बोनस डेटा मिळेल.

3. 3099 रुपयांचा प्लॅन 

वोडाफोन आयडियाचा Rs 3099 चा प्लॅन ज्यांना जास्त डेटा हवा आहे त्यांच्यासाठी आहे. हा प्लॅन 365 दिवसांसाठी आहे. या प्लॅनसह प्रत्येक दिवसाला 2GB डेटा आणि 100 SMS व अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आहे. Vi Hero अमर्यादित फायदे, Vi Movies & TV VIP, Disney+ Hotstar मोबाईल एक वर्षासाठी आणि 75GB बोनस डेटा मिळतो. हे तीन प्लॅन आहेत जे सध्या ग्राहकांना रिचार्जवर अतिरिक्त डेटा देत आहेत.