टीम इंडियाचा स्टार फलंदाज माजी कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T-20 वर्ल्ड कपमध्ये आपली ब्रॅंड व्हॅल्यू दाखवून दिली. विश्वचषकात भारताचा पराभव झाला असला तरी ही टुर्नामेंट विराट कोहलीने गाजवली.कोहलीने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 296 रन्स केल्या आहेत. त्याच्या या दमदार कामगिरीने त्याची ब्रॅंड व्हॅल्यू वाढली आहे.
दैनंदिन वापरातील वस्तू, रिअल इस्टेट प्रोजेक्ट, इन्शुरन्स, मोबाईल, इलेक्ट्ऱॉनिक्स उपकरणे, तयार कपडे, स्पोर्ट्स, फार्मा, वेलनेस यासारख्या सेक्टरमधील उत्पादनांचा विराट कोहली ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. ब्रँड व्हॅल्यू विराटच्या फलंदाजी प्रमाणेच दिवसेंदिवस त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू वाढत आहे. त्याने जाहिरात करावी यासाठी अनेक ब्रॅंड विराटची मनधरणी करत आहेत.टायर निमिर्तीमधील आघाडीची कंपनी असलेल्या MRF कडून विराटला दरवर्षी 12.5 कोटी रुपये इतके जाहिरातीचे मानधन दिले जाते.विराटच्या बॅटवर MRFचा लोगो असतो. 8 वर्षांसाठी 100 कोटी रुपयांचा हा करार करण्यात आला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर याला MRF ने करारबद्ध केले होते.
क्रीडा साहित्य बनवणारी जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी पुमा Puma ( Puma Sign Virat Kohli Worth Rs.110 Crore) या कंपनीने विराट कोहलीसोबत 110 कोटींचा करार केला आहे. 2017-2025 या कालावधीत कोहली पुमाच्या प्रोडक्ट्सची जाहिरात करणार आहे. वर्षाकाठी विराटला सरासरी 13.25 कोटी पुमाकडून मिळणार आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना मायंत्रा या ई-कॉमर्सकडून 10 कोटी रुपयांना साईन करण्यात आले आहे. दोघे मिंत्राची जाहिरात करतात. गेमिंग प्लॅटफॉर्म MPL ने विराटला 12 कोटींसाठी करारबद्ध केले आहे. विशेष म्हणजे ही स्टार्टअप कंपनी असून याच्या पॅरेंट कंपनीमध्ये विराट कोहलीची गुंतवणूक आहे. विराटला प्रॉक्टर अँड गँबलच्या विक्स या ब्रँडसाठी साईन करण्यात आले आहे.
तयार कपड्यांचा ब्रॅंड WROGN चा विराट ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. पेस्सी, फिलिप्स, फास्टट्रॅक, बूस्ट,ऑडी,हिलो,वॉल्वोलिन,यासारख्या अनेक ब्रँडची तो सध्या जाहिरात करत आहे.यातून वर्षाकाठी विराट शेकडो कोटींची कमाई करत आहे. विराट कोहलीने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Galactus Funware Technology Pvt. Ltd, Sport Convo, Digit या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.विराट कोहली 'वन8 कम्यून' नावाची रेस्तराँ चेन देखील चालवतो.
कोहलीचा भाव वधारला
T-20 वर्ल्डकपमधील जबरदस्त कामगिरीनंतर विराट कोहलीची ब्रॅंड व्हॅल्यू वाढली आहे. कोहली वर्षभरापूर्वी एका जाहिरातीसाठी जवळपास एक कोटी रुपयांचे मानधन घेत होता.आचा हा रेट तीन पट वाढल्याचे बोलले जाते. विराट कोहलीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॉलोअर्स आहेत. तो आपल्या या फॅन फॉलोईंगचा वापर विविध कंपन्यांच्या ब्रँडिंगसाठी करतो.यातून देखील त्याची मोठी कमाई होते.