• 04 Oct, 2022 15:53

विराट कोहलीने गुंतवणूक केलेली गो डिजीट इन्शुरन्स 5,000 कोटींचा IPO आणणार

go digit general insurance

Go Digit General Insurance IPO शेअर मार्केटमध्ये लवकरच गो डिजीट इन्शुरन्स या कंपनीचा आयपीओ दाखल होणार आहे. आयपीओसाठी कंपनीने सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. डिजीट इन्शुरन्समध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची गुंतवणूक आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) सर्वात मोठ्या आयपीओनंतर शेअर मार्केट काहीसे थंड झाले होते. मात्र सेन्सेक्सने नुकताच 60,000 अंकांची पातळी ओलांडली. बाजारात तेजीचे वातावरण असल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी भांडवल उभारणीसाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांची लगबग सुरु झाली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रेटी कपलने गुंतवणूक केलेली (virat kohli investment in digit insurance) गो डिजीट इन्शुरन्स या कंपनीने सेबीकडे आयपीओचा प्रस्ताव दाखल केला आहे. (Go Digit General Insurance IPO)


कॅनडातील बिलेनिअर उद्योजक प्रेम वत्स यांच्या फेअरफॅक्स ग्रुपची कंपनी असलेल्या डिजीट इन्शुरन्सने (go digit ipo news) आयपीओची तयारी केली आहे. गो डिजीट इन्शुरन्सकडून किमान 3,500 कोटी ते 5,000 कोटी या दरम्यान पब्लिक इश्यू आणण्याची शक्यता आहे.  

सेबीला सादर केलेल्या प्रस्तावात कंपनी समभाग विक्रीतून 1,250 कोटींचे भांडवल उभारणार आहे. यासाठी 10.94% शेअरची विक्री केले जाणार आहे. त्याशिवाय ऑफर फॉर सेलमधून कंपनी 10,94,34,783 शेअरची विक्री केली जाणार आहे.ऑफर फॉर सेलमधून जवळपास 3,750 कोटींचा निधी उभारला जाणार आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रत्येकी 2.5 कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र आयपीओमध्ये कोहली हिस्सा विकणार नाही. आयपीओ आणि ऑफर फॉर सेलमध्ये गो डिजीट इन्फोवर्क्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, निकिता मिहिर वखारिया, मिहिर अतुल वखारिया, निकुंज हिरेंद्र शाह, सोहाग शाह, सुब्रमण्यम वासुदेवन आणि शांती सुब्रमण्यम हे प्रवर्तक हिस्सा विक्री करणार आहेत. गो डिजीट इन्शुरन्सचे शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जाणार आहेत.


कंपनीचा डिजिटल विमा व्यवसाय

  • गो डिजीट जनरल इन्शुरन्स ही क्लाऊड आधारित डिजिटल विमा कंपनी आहे. ही एक स्टार्टअप कंपनी असून मोटार विमा, आरोग्य विमा, ट्रॅव्हल इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, मरिन इन्शुरन्स, लायब्लिटी इन्शुरन्स आणि इतर विमा उत्पादनांची विक्री केली जाते.
  • डिजिटल विमा उद्योगात गो डिजीटचा 82.9% वाटा आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीना ग्रॉस प्रिमियम (Gross Written Premiums) 5,268 कोटी इतका होता.
  • आर्थिक वर्ष 2020-22 या काळात कंपनीने 52.9% वृद्धीदर नोंदवला. 31 मार्च 2022 अखेर कंपनीकडे 2,568 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे.  
  • आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 295 कोटींचा तोटा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 3,841 कोटी इतके होते. प्रिमियम उत्पन्नात 62% वाढ झाली.
  • गो डिजीटचे बाजार मूल्य 30,000 कोटी ते 35,000 कोटी या दरम्यान असण्याची शक्यता आहे.(go digit general insurance ipo)
  • गो डिजीटच्या ग्राहकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे.