Penalty for violation of traffic rules: स्मार्टफोन लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच हातात असतात, त्यातील सोशल मिडिया अॅप, अपडेट्स, नवे फीचर्स असे बनवलेले असतात की त्याची भुरळ सगळ्यांनाच पडते. सर्वचजण ते वापरण्यासाठी उत्सुक असतात. तसेच आताच्या ट्रेंडनुसार शॉर्ट्स, रिल्स बनवत असतात. रील्सला मिळणारे व्ह्यूज आणि लाईक्समुळे व्हिडिओ बनवण्याची आवड वाढत चालली आहे. हे रिल्स बनवताना किंवा रिल्स बनवण्यासाठी काही व्यक्तींच्या हातून कळत-नकळतपणे चुकिची कृत्ये घडतात. मात् तरी रिल्सची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. आता जर एखादी व्यक्ती रस्त्यांवर रिल्स बनवताना दिसली तर त्यांना दंड भरावा लागू शकतो, अर्थात जर कोणते नियम मोडले असतील तर, होय, आजकाल कारमधून रस्त्यांवर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक तरुण त्याच्या थार जीपच्या बोनेटवर बसून सिगारेट ओढताना दिसला. हा स्टंट त्याने एका फिल्मी गाण्यासोबत सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करताना आरोपींकडून 29 हजार 500 रुपयांचे चलन कापून घेतले, हा दंड वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हे चालान कापण्यात आले आहे.
अलिकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी लोकांना अनेक हजार रुपये मोजावे लागत आहेत. या आठवड्यात दक्षिण मुंबईतील एका मुलीला दुचाकी मरीन ड्राईव्हजवळ पार्क करून शूट करताना, चुकिच्या ठिकाणी गाडी उभी केल्यामुळे तिला 2 हजार रुपये दंड लावण्यात आला होता. एका रिल्ससाठी दंड भरावा लागला. याआधी गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर एका मुलीला रील बनवण्यासाठी 17 हजार रुपयांचा दंड भरावा लागला होता. एका महिलेने राष्ट्रीय महामार्गावर आपली कार थांबवून काही सेकंदांचा व्हिडिओ बनवला, त्या बदल्यात तिला 5 हजार रुपये भरावे लागले होते.
दंड का आकारला जातो? (Why are fines levied?)
वास्तविक, महामार्गावर वाहन थांबवून असा व्हिडिओ बनवणे बेकायदेशीर आहे. शासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही महामार्गावर असे वाहन उभे करता येत नाही. भरधाव वेगाने वाहने रस्त्यावर थांबवून तुम्ही तुमचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहात. विशिष्ट ठिकाणी, विशेषत: संवेदनशील परिसरामध्ये किंवा पूर्वी जेथे काही संवेदनशील घटना घडल्या आहेत अशा ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, अशा कृत्याला कायद्याचे उल्लंघन मानले जाते आणि असे कृत्य करणाऱ्यांवर पोलीस तात्काळ कारवाई करू शकतात. तसेच परवानगी नसलेल्या ठिकाणी गाडी पार्क करून बाजूला उभे राहिल्यास किंवा गाडीत बसून राहिल्यासदेखील, 10 मिनिटांनंतर नो पार्किंगचा दंड बसतो. संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी नियम आणि कायदे बनवण्यात आलेले आहेत, अन्यथा जीवघेणे अपघात होऊ शकतात.