Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vinnie Overseas: 3 महिन्यांपूर्वी लिस्टेड झालेली कंपनी विन्नी ओव्हरसीज देणार, बोनस शेअर!

Vinnie Overseas announced bonus shares

Small cap company Vinnie Overseas announced bonus shares: नुकतेच विन्नी ओव्हरसीज कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट करण्यासाठी मान्यता दिली आहे. ही बातमी बाजारात पसरल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे बातमीमध्ये वाचा.

Multibagger Small cap company issue bonus shares: बोनस शेअरः स्मॉल कॅप कंपनी विनी ओव्हरसीज लिमिटेड (Vinnie Overseas) आपल्या गुंतवणूकदारांना, बोनस शेअर्सच्या निमित्ताने नफा देणार आहे. कंपनीच्या संचालक मंनुडळाच्या सदस्यांनी सोमवारी, 16 जानेवारी रोजी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट करण्यास मान्यता दिली. कंपनीचे समभाग (Shares) सोमवारी, 5 टक्क्यांच्या वाढीसह 187.55 रुपयांवर बंद झाले. सध्या कंपनीची मार्केट कॅप 190 कोटी आहे.

कंपनीने काय म्हटले? (What did the company say?)

विन्नी ओव्हरसीज लिमिटेड (Vinnie Overseas) ही कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या संचालक मंडळाने प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्यावर विचार केला आणि मंजूर केला. याचा अर्थ असा की प्रत्येक 10 इक्विटी शेअर्ससाठी कंपनीचे 13 बोनस शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रत्येकी 10 समभागांमध्ये स्टॉक विभाजनास मान्यता देण्यात आली आहे.

शेअर्समध्ये 525 टक्क्यांनी वाढ (525 percent increase in shares)

मागील आठवड्यात, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, कंपनीच्या समभाग वरच्या सर्किटमध्ये पोहोचले होते. यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांपर्यंत वाढली आणि 178.65 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. सोमवारी एनएसईवर (NSE) 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह स्टॉक 187.55 वर बंद झाला होता. कंपनीने 28 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजारात पदार्पण केले. तेव्हा विनी ओव्हरसीज लिमिटेडच्या शेअरची किंमत फक्त 40 रुपये होती. विन्नी ओव्हरसीज (Vinnie Overseas)  स्टॉकमध्ये आतापर्यंत 525.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 मध्ये आतापर्यंत ते 27.37 टक्के वर चढला आहे.

विन्नी ओव्हरसीज कंपनीविषयी (About Vinnie Overseas Company)

विन्नी ओव्हरसीज लिमिटेड (Vinnie Overseas) कंपनीची स्थापना 1992 साली, मोहनलाल पारेख आणि हिरालाल पारेख यांनी केली होती. याआधी ही कंपनी मोहनलाल महावीरचंद इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने व्यापार करत होती. ही कंपनी कापड व्यापारात कार्यरत आहे. कंपनी, डेनिम, कॉटन, पॉलिस्टर, रेयॉन, व्हिसकोस, आर्ट सिल्क बेल्डिंग आदी प्रकारच्या कापडांचे उत्पादन करते. दुबई, बेहरीन, इंडोनेशिया, श्रीलंका, यूएसए, चीन, ब्राझील, ओमान इत्यादी विविध देशांमध्ये कंपनीचे प्रोडक्ट निर्यात होतात.