Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vijay Devarakonda Donation: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा गरजू 100 कुटुंबांना वाटणार 1 कोटी रुपये!

Vijay Deverkonda

Vijay Devarakonda Donation: दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याने आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'खुशी' (Khushi) या चित्रपटाचे यश साजरे करताना आपल्या स्वकमाईतील काही भाग 100 गरजू कुटुंबांना वाटणार असल्याचे जाहीर केले.

विजय देवरकोंडा याची मुख्य भूमिका असलेला 'खुशी' हा दक्षिणात्य चित्रपट सध्या टॉलीवूड बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचत आहे. या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी विशाखापट्टणम येथे आयोजित एका कार्यक्रमात विजय देवरकोंडाने, शंभर कुटुंबांना स्वकमाईतून एक कोटी रुपये वाटण्याचे जाहीर केले. त्याने यावर्षीच्या सुरुवातीलाही त्याच्या 100 फॅन्सना स्वखर्चातून मनाली येथे ट्रिपसाठी पाठविले होते.

आपल्याला चांगला पैसा कमवायचा असून आई-वडिलांना खुश ठेवायचे आहे आणि समाजात मान मिळवायचा आहे असेही त्याने यावेळी सांगितले. अनेक नकारात्मक रिव्ह्यूज आणि निगेटिव्ह कमेंट्स नंतरही 'खुशी' चित्रपटाला भरभरून यश मिळवून देणाऱ्या आपल्या फॅन्सचे त्याने यावेळी आभार मानले. आत्तापासून आपण केवळ आपल्या फॅन्ससाठीच काम करणार असल्याचे त्याने नमूद केले. शंभर कुटुंबांना देण्यात येणारी ही रक्कम एका आठवड्यात किंवा दहा दिवसात त्या कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे त्याने जाहीर केले.

'खुशी' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दरम्यान ,दिग्दर्शक शिवा निर्वाणा दिग्दर्शित 'खुशी'  चित्रपट हा एक रोमँटिक कॉमेडी पट असून विजय देवरकोंडा व अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच जगभरातून 71 कोटी रुपयांची कमाई केली असून चित्रपट शंभर कोटींच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असल्याची माहिती 'Mythri movie makers' या film production house कडून जाहीर करण्यात आले.