केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कर्जासाठी तयार करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या पोर्टलवरुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज वितरित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजपणे शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी विद्या लक्ष्मी पोर्टल फायदेशीर ठरत आहे. या पोर्टलवर कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
- विद्यालक्ष्मी पोर्टल शैक्षणिक कर्जासाठी कसे फायदेशीर ठरेल?
- किती बँका विद्या लक्ष्मी योजनेशी जोडलेल्या आहेत?
- विद्यालक्ष्मी पोर्टलमुळे काय बदल झाला?
- कोणत्या कोर्ससाठी विद्या लक्ष्मीमधून शैक्षणिक कर्ज मिळते?
- या शैक्षणिक कर्जावर व्याजदर सवलत मिळते का?
- कर्ज बुडले तर काय कारवाई होते?
- कर्ज मंजुरीसाठी किती कालवधी लागतो?
विद्यालक्ष्मी पोर्टल शैक्षणिक कर्जासाठी कसे फायदेशीर ठरेल?
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालक्ष्मी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येईल. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना एक सोपा अर्ज भरावा लागेल. एकावेळी विद्यार्थ्यांना त्याच्या पंसतीच्या तीन बँकांची शैक्षणिक कर्जासाठी निवड करता येईल. यातून कर्जाची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होईल.
किती बँका विद्या लक्ष्मी योजनेशी जोडलेल्या आहेत?
विद्यालक्ष्मी पोर्टलमध्ये 125 हून अधिक एज्युकेशनल लोनच्या योजनांचा समावेश आहे. या योजनेत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील 40 हून अधिक बँका संलग्न आहेत.
विद्यालक्ष्मी पोर्टलमुळे काय बदल झाला?
विद्यालक्ष्मी पोर्टलमुळे विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन अर्ज करता येतो. यापूर्वी ज्यांना शैक्षणिक कर्ज हवे आहे त्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता विद्यालक्ष्मी पोर्टलच्या माध्यमातून कुठूनही विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करता येईल. ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने पेपरवर्क कमी झाले. कर्जाचा स्टेटस देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी तपासता येणार आहे.
कोणत्या कोर्ससाठी विद्या लक्ष्मीमधून शैक्षणिक कर्ज मिळते?
इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट यासह परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालक्ष्मी पोर्टलवरुन शैक्षणिक कर्ज दिले जाते.
या शैक्षणिक कर्जावर व्याजदर सवलत मिळते का?
बँकांकडून शैक्षणिक कर्जासाठी वेगवेगळा व्याजदर असतो. विद्यालक्ष्मी पोर्टलवर विद्यार्थ्याला एकाच वेळी तीन बँकांकडे अर्ज करण्याची सुविधा आहे. यात व्याजदराची आणि अटी शर्थींची तुलना करुन तो कर्ज घेऊ शकतो.
कर्ज बुडले तर काय कारवाई होते?
विद्यार्थ्याने कर्ज बुडवले तर बँकेच्या नियमानुसार कर्जदारावर कारवाई होते. प्रत्येक बँकांचे बुडीत कर्जाबाबत वेगवेगळे नियम आहेत.
कर्ज मंजुरीसाठी किती कालवधी लागतो?
विद्यालक्ष्मी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सर्वसाधारणपणे 15 दिवसांत कर्ज मंजूर होणे अपेक्षित आहे. मात्र अर्जाची छाननी आणि प्रक्रिया प्रत्येक बँकेची वेगवेगळी आहे.