Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ved Box Office Collection: सलग तिसऱ्या आठवडयातदेखील 'वेड' चित्रपटाची घौडदौड सुरूच, वीकेंडला ही सुपरफास्ट

Ved Box Office Collection

Ved Marathi Movie : ‘वेड’ या मराठी चित्रपटाने तिसऱ्या आठवडयातदेखील बॉक्स ऑफिसवर राज्य केले आहे. वीकेंडलादेखील या चित्रपटाने आपली जादू कायम ठेवली. चला, तर मग या चित्रपटाची वीकेंड कमाईबाबत जाणून घेवुयात.

Riteish Deshmukh: वेड (Ved) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या जोडीने सलग तिसऱ्या आठवड्यात ही प्रेक्षकांना ‘वेड’ लावण्यास यशस्वी ठरला आहे. आता, ‘वेड’ हा चित्रपट या आठवड्यात 50 कोटींचा टप्पा पार करणार हे नक्की.

वीकेंड कमाई (Weekend Earnings)

तिसऱ्या वीकेंडला देखील ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 1.35 कोटी, शनिवारी 2.72 कोटी आणि रविवारी 2.74 कोटी असा जबरदस्त गल्ला कमविला. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 47.66 कोटींची पैसावसूल कमाई केली आहे. या आठवड्यात ‘वेड’ हा चित्रपट 50 कोटींचा टप्पा पार करणार हे नक्की आहे. हा चित्रपट परराज्यातदेखील आर्वुजन पाहत आहे. या चित्रपटातील गाण्यांनीदेखील सोशलमिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श (Film Analyst Taran Adarsh)

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘वेड’ चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे त्यांच्या सोशलमिडीयावर जाहीर केले आहेत. व्टिटरवर त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होईपर्यंत ‘वेड’ या चित्रपटाची घौडदौड अशीच सुरू राहणार आहे, असा अंदाज त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वर्तवला आहे.

रितेश देशमुखची नवीन घोषणा (New announcement of Riteish Deshmukh)

वेड चित्रपटाची प्रसिध्दी पाहता, रितेश म्हणाला की ‘वेड’ या चित्रपटात श्रावणी आणि सत्याचं पुढे काय झालं, याची कहानी आता लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. ‘वेड’ या चित्रपटाचं नवे गाणेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यातून सत्या आणि श्रावणीची प्रेमकहाणी सांगण्यात येणार आहे. प्रेक्षकदेखील या गाण्याची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे. ‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया देशमुख  रितेश देशमुख, जिया शंकर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर सोबतच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे.