शेअर बाजाराच्या निकालानंतर 5 कंपन्यांनी चौथ्या तिमाहीच्या निकालांसह प्रतिशेअर 55 टक्क्यांपर्यंत लाभांश जाहीर केलाय. या कंपन्यांमध्ये टिटागड वॅगन्स (Titagarh Wagons), ऑइल इंडिया (Oil India), गार्डन रिच शिपबिल्डर्स (Garden Reach Shipbuilders), ट्रायडन्ट (Trident) आणि साउथर्न पेट्रो (Southern Petro) यांचा समावेश आहे. पहिल्यांदा स्टॉक अॅक्शन आणि दुसरं म्हणजे प्रत्येक शेअरवर धमाकेदार लाभांश प्रॉफिट मिळतोय. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
ऑइल इंडिया लाभांश (Oil India Dividend)
ऑइल इंडिया कंपनीची तिमाहीच्या आधारावरची कामगिरी संमिश्र होती. जानेवारी ते मार्च या कालावधीत 1788.28 कोटी रुपयांचा कंपनीला नफा झाला. तर डिसेंबरच्या तिमाहीत तो 1746.1 कोटी रुपये इतका होता. उत्पन्नात थोडी वाढ नोंदवण्यात आली. उत्पन्न 5376.15 कोटींवरून 5397.9 कोटी रुपयांवर पोहोचलं. कंपनीनं 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर प्रति शेअर 5.5 रुपये लाभांश मंजूर केलाय.
गार्डन रीच शिपबिल्डर्स लाभांश (Garden Reach Shipbuilders Dividend)
गार्डन रीच शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीचा निकाल संमिश्र लागल्याचं दिसतं. वर्षभराच्या कालावधीतला नफा 17 टक्क्यांहून जास्त नोंदवण्यात आला. मार्चच्या तिमाहीत तो 55.29 कोटी रुपये इतका होता. उत्पन्नही वाढून 601.16 कोटी रुपये झालं. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत ते 543.17 कोटी रुपये होतं. एक्स्चेंज फाइलिंगनुसार, 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर कंपनीनं 70 पैशांचा लाभांश मंजूर केलाय.
साउथर्न पेट्रोकेमिकल्स लाभांश (Southern Petro Dividend)
साउथर्न पेट्रोकेमिकल्स कंपनीची वर्षभरातली कामगिरी चांगली होती. एक्स्चेंज फाइलिंगनुसार, मार्चच्या तिमाहीत नफा 393.6 टक्क्यांनी वाढून 25.47 कोटी रुपये झाला. तोच मागच्या वर्षी याच कालावधीत 5.16 कोटी रुपये होता. त्याचबरोबर उत्पन्नातही 150.4 टक्क्यांची सकारात्मक वाढ दिसून आलीय. या निकालानंतर आता कंपनीनं प्रति शेअर 15 टक्क्यांचा लाभांश मंजूर केलाय. म्हणजेच 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर 1.5 रुपयांचा लाभांश मंजूर करण्यात आलाय.
ट्रायडन्ट लाभांश (Trident Dividend)
ट्रायडन्ट ही हॉटेल क्षेत्रातली एक दिग्गज कंपनी आहे. कंपनीनं प्रति शेअर 36 टक्के लाभांश मंजूर केला. या माध्यमातून गुंतवणूकदारांना 1 रुपयाच्या दर्शनी मूल्यावर प्रति शेअर 36 पैसे लाभांशासाठी मान्यता मिळालीय. जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या कालावधीत कंपनीनं 129.7 कोटी रुपयांचा नफा कमावलाय. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तो 181.2 कोटी रुपये इतका होता. उत्पन्न, मार्जिन आणि ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये घट झालीय.
टिटागड वॅगन्स लाभांश (Titagarh Wagons Dividend)
टिटागड वॅगन्स कंपनीनं 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति शेअर 50 पैसे लाभांश जाहीर केला. एक्स्चेंज फाइलिंगनुसार, कंपनीनं 48.23 कोटी रुपयांचा नफा कमावलाय. मागच्या वर्षीच्या याच कालावधीतल्या तिमाहीत 24.94 कोटी रुपयांचा तोटा होता. मार्जिनही 10.9 टक्क्यांवरून 9.8 टक्क्यांवर घसरलं. लाभांशाची रक्कम एजीएमच्या 30 दिवसांच्या आत खात्यात येणार आहे.