Vande Bharat Trian: वंदे भारत ट्रेनचे उत्पादन व सोईसुविधांसाठी सुमारे 18000 कोटीची योजना तयार करण्यात आली आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 69 वंदे भारत गाड्या तयार करायच्या आहेत. ज्याची संख्या आता 75 इतकी झाली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
रेल्वेने वंदे भारत प्रोडक्शन व प्रवासांसाठी योग्य सोई-सुविधांवर भर दिला आहे. पुढील काही महिन्यात रेल्वेकडून 75 वंदे भारत ट्रेन ट्रॅकवर उतरविण्यात येणार आहे. मंत्रालयला ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 69 वंदे भारत गाड्या तयार करायच्या आहेत. ज्याची संख्या आता 75 इतकी झाली आहे. यानुसार दर महिन्याला वंदे भारत ट्रेनची संख्या वाढविण्यासाठी निर्धार या योजनेत करण्यात आला आहे.
योजना काय आहे (What is the Plan)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या भारतीय रेल्वेमध्ये महिन्याला 1 ते 2 वंदे भारत गाड्या तयार केल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामुळे ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत गाड्यांची संख्या 75 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी दर महिन्याला गाड्यांचे उत्पादन वाढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच गाडींची देखभाल, डेपो व दुरूस्तीसारख्या कामांचा देखील यात समावेश आहे. त्याचबरोबर डिझाईन, सीट, जीपीएस, कॅमेरा, टीव्ही अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
75 रेल्वेंची निर्मिती करणार (75 Trains will be Built)
वंदे भारत गाड्यांचे उत्पादन चेन्नईमधील आयसीएफ येथे केले जात असल्याची माहिती आहे. ICF ला अजून 69 गाड्या तयार करायच्या आहेत, त्यासाठी दर महिन्याला उत्पादन वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे 75 गाड्यांचे टार्गेट पूर्ण करता येणार आहे.
या मार्गांवर ट्रेन धावणार (Trains will run on these Routes)
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील 5 मार्गांवर धावत आहे. पहिली वंदे भारत नवी दिल्ली-वाराणासी, दुसरी नवी दिल्ली-श्री वैष्णो देवी माता, तिसरी गांधीनगर ते मुंबई, चौथी नवी दिल्ली ते अंब अंदौरा स्टेशन हिमाचल आणि पाचवी चेन्नई-म्हैसूर, जे दक्षिण भारतातील पहिले वंदे भारत आहे. सहावी वंदे भारत ट्रेन हावडा ते न्यू जलपाईगुडी दरम्यान धावत आहे.