UTI Innovation Fund: युटीआय म्युच्युअल फंडाने युटीआय इनोव्हेशन फंड ही नवीन ओपन एंडेड स्कीम लॉन्च केली. हा सेक्टरल फंड असून 25 सप्टेंबरपासून याचे सब्सक्रिप्शन सुरू झाले आहे. तर गुंतवणूकदारांना 9 ऑक्टबरपर्यंत या NFO मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
युटीआयने आणलेला हा इनोव्हेशन फंड हा इक्विटी सेगमेंटमधील ओपन एंडेड सेक्टरल फंड आहे. त्यामुळे गंतवणूकदारांना या स्कीममधून हवं तेव्हा बाहेर पडता येणार आहे. या एनएफओमध्ये जमा होणारा निधी हा वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटीव्ह उद्योगधंद्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. जसे की, ई-कॉमर्स, फिनटेक, स्पेशिल केमिकल, हेल्थ सेक्टर, फूड टेक्नॉलॉजी, डिजिटल जाहिरात कंपन्या. कंपनीने या फंडासाठी 3 धोरणांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातील पहिला आहे नाविन्यपूर्ण उपक्रम, दुसरं डेव्हलपमेंट सेक्टर आणि तिसरं आहे क्वॉलिटी. या तीन धोरणांवर आधारित वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.
किमान गुंतवणूक किती?
UTI Innovation Fund मध्ये एकत्रित गुंतवणूक करायची झाल्यास त्यासाठी सुरूवातील किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर 1 हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करता येते. याची एन्ट्री लोड काहीच नाही. पण एक वर्षाच्या आत या स्कीममधून बाहेर पडल्यास त्यावर 1 टक्के एक्झिट लोड आकारला जातो. अंकित अग्रवाल या इनोव्हेशन फंडचे फंड मॅनेजर आहेत.
UTI Innovation Fund हा एक सेक्टरल फंड असल्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना मिडिअम आणि दीर्घकाळाच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा हवा आहे. त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.