युटीआय म्युच्युअल फंड हाऊसने गुरूवारी (दि. 20 जुलै) UIT Balanced Advantage Fund या नावाने डायनामिक ॲसेट ॲलोकेशन फंड आणला आहे. हा फंड इक्विटी आणि डेब्ट स्कीम्समध्ये गुंतवणूक करणार आहे. याचा एनएफओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून तो 4 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे.
Table of contents [Show]
या फंडची वैशिष्ट्ये काय आहेत?
इक्विटी आणि डेब्ट स्कीम्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल निर्माण करणे हे या फंडचे उद्दिष्ट आहे. जे गुंतवणूकदार डायनामिक पोर्टफोलिओद्वारे दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करण्यास पसंती देतात. त्यांच्यासाठी हा फंड उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात मोठा निधी उभारता येऊ शकतो. तसेच इक्विटी आणि फिक्स इन्कमच्या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा लाभ यातून मिळू शकतो. या फंडमधील ॲसेट ॲलोकेशनमुळे मार्केटमधील चढ-उतारामुळे होणारी जोखीम कमी होण्यास मदत होणार आहे.
फंड मॅनेजर कोण आहे?
UTI Balanced Advantage Fund मधील इक्विटी भाग हा सचिन त्रिवेदी हे पाहणार आहेत. तर फिक्स इन्कमचा भाग हा अनुराग मित्तल हे पाहणार आहेत.
किमान गुंतवणूक किती?
UTI Balanced Advantage Fund मध्ये किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कंपनीने रेग्युलर आणि डायरेक्ट या दोन्ही प्लॅनमध्ये Growth आणि IDCW हे पर्याय दिले आहेत. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणताही एन्ट्री लोड आकारला जाणार नाही. पण 12 महिन्यात यातून बाहेर पडल्यास त्यावर 10 टक्क्यांपर्यंत एक्झिट लोड लागू शकतो.
काय आहे बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड?
बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड हा म्युच्युअल फंडाचं एक प्रॉडक्ट आहे. इक्विटी आणि डेब्ट या दोन्हींचं ते मिश्रण आहे. बाजारातली परिस्थिती, व्याजदर आणि स्थूल आर्थिक परिस्थिती यानुसार इक्विटी आणि डेब्ट यांच्यात बदल होत राहतात. गुंतवणूकदारांना हे बाजारातल्या परिस्थितीपासून संरक्षित करतात. बाजार खाली असो किंवा नव्या उच्चांकावर, हे फंड समतोल साधून गुंतवणूकदारांसाठी जोखीम कमी करतात.